Maharashtra Breaking 29th June LIVE Updates: अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणा, सुत्रांची माहिती
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Kolhapur News: अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या दोन दौऱ्यात ए. वाय पाटील यांचा सहभाग होता. ए. वाय. पाटील शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझानं सर्वात आधी दाखवली होती, ए वाय पाटील हे शरद पवार यांच्यासोबत जाण्याची बातमी.
Ashadhi Ekadashi: पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनसाठी आज रायगडमधील श्रीवर्धन हरिहरेश्वर भरडखोल मधुन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं अनेक वारकरी या दिंडीत सहभागी होऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करू लागलेत गेल्या 47 वर्षांची परंपरा जपत आलेल्या या वारकऱ्यांचा वेगळाच उत्साह पहायला मिळतोय. महाड भोर पुणे मार्गे हे वारकरी पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान उद्योगपती प्रीतेश बाबेल यांच्या कडून दिंडीच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या वेळी दीडीकराना अल्पोहरची व्यवस्था आणि मेडीसिनच्या किट देखील सोबत देण्यात आल्या.
Mumbai News: मुंबई-दुबई स्पाइस जेट ची फ्लाईट रात्री 2 वाजता मुंबई वरून टेक ऑफ होणार होती, मात्र सुमारे सहा तास उलटून ही फ्लाइट नसल्याने प्रवासी त्रस्त, 150 ते 200 प्रवासी यात आहेत.विमानातून तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देत प्रवाश्यांना अजून ही काही वेळ दुसरे विमान अरेंज करे पर्यंत थांबण्यास सांगण्यात आल्याने प्रवाशाचा संताप.
Ashadhi Ekadashi: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम असेल.
Samriddhi Highway Accident: जालना : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात (Accident Updates) झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील (Jalna) कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात (Accident Latest Updates) झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, चारजण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपूरहुन (Nagpur News) मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या कारला राँग साईडनं येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.
NEET Exam : राष्ट्रीय चाचणी संस्थेने रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यात कथित अनियमिततेच्या आरोपांवरून वादात सापडलेल्या यूजीसी नेटचा समावेश आहे. संयुक्त सीएसआयआर-यूजीसी नेट 25 ते 27 जुलैदरम्यान आयोजित केली जाईल, तर यूजीसी नेट जून 2024 परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान घेतली जाईल.
World Cup Final 2024, IND vs SA Final: ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. ट्वेन्टी ट्वेन्टी किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
Pune Accident: पुणे : पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) आणखी एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील (Pune Latest Updates) वानवडीत (Vadavani Accident) आणखी एक भीषण अपघात. धक्कादायक बाब म्हणजे, टँकरच्या धडकेत इतरही काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एक 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. त्यानं टँकरनं अनेकांना धडक दिली. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या मुलानं धडक दिली आहे. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबई,ठाणे,नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार. आजपासून नवे दर लागू
2. अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका, तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर
3. अर्थसंकल्प म्हणजे लोकसभा पराभवाचं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका, तर राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर
4. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट, साडे सात हॉर्सपॉवरपर्यंतच्या 46 लाख कृषी पंपांची वीज बिलं माफ
5. मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, 8 लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार
6. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा, 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या 1 तारखेपासून अंमलबजावणी
7. महाराष्ट्रात ड्रग्ज घेणारे, विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा, संपूर्ण राज्यात बुलडोझर, जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही
8. पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप..रेट कार्ड वाचून दाखवत विरोधीपक्षनेते वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -