Maharashtra Breaking 26th June LIVE Updates: आवाजी मतदानानं ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 26 Jun 2024 12:08 PM
Rohit Pawar on Nashik Teacher Poll: नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान, रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar on Nashik Teacher Poll: नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे, याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय. महायुतीचा विचार केला, तर कोण कोणत्या पक्षाचाआहे आणि कोण कुणाचा उमेदवार आहे हेच कळायला मार्ग नाही असा टोला रोहित पवार यांनी लगावला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी साड्या आणि नथ वाटपाचे आरोप झाले. यावरून रोहित पवार यांनी महायुतीवर निशाणा साधत, त्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील पैशाचा वापर केला. तसाच वापर आत्ता देखील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी केला जातोय. मात्र मतदार हा सुज्ञ असून , लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर करणाऱ्या आणि दमदाटी करणाऱ्या उमेदवारांना लोकांनी बाजूला सरलं तशाच पद्धतीने याही निवडणुकीत होईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Parliament Session: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी NDA कडून ओम बिर्ला रिंगणात, तर काँग्रेसकडून के. सुरेश रिंगणात

Parliament Session: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांनी अर्ज भरलाय. भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय. ओम बिर्लाच्या समर्थनार्थ 13 पक्षांनी प्रस्ताव सादर केलाय.  पीएम मोदी हे बिर्लांचे पहिले प्रस्तावक आहेत. अमित शाह, जीतन राम मांझी, चिराग पासवानही प्रस्तावक आहेत. स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. थोड्याच वेळात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वी कुटुंबीयांनी ओम बिर्ला यांचं औक्षण केलं.

Sindhudurg News: कोकण पदवीधरसाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात, निरंजन डावखरे आणि रमेश कीर यांच्यात लढत, मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात


Sindhudurg News: कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांच्यासह एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पदवीधर मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 मतदान केंद्रांवर 18 हजार 551 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीकरिता 182 निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. 


Mumbai News:  महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी

Mumbai News: महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची  मंजुरी


महालक्ष्मी रेसकोर्स ची 120 एक्कर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन साठी जागा वापरली जाणार आहे. 


 दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेस कोर्सची एकूण 211 एक्कर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ 1914 साली भाडेकरारावर देण्यात आली होती. 99 वर्षाचा हा करार 2013 साली संपुष्टात आला. 


आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपेक्षा 120 एकर जागा राज्य सरकार मार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता  देण्यात आली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर उर्वरित 91 एकर जागा  रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर देण्यात येणार आहे. 


राज्य सरकारनं दिलेल्या या मंजुरीमुळे  मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस साठी सुविधा करण्यात येणार आहेत अडग्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Maharashtra News: आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार

Maharashtra News: आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. या बैठकीत सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचं समर्थन असेल असं शरद पवार म्हणालेत. राज्य सरकारनं सामंजस्यातून या प्रश्नावर मार्ग काढावा असं आवाहन पवारांनी केलंय. दरम्यान, आरक्षण प्रश्नी पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. पवारांना फक्त जातीजातीत भांडणं लावायची आहेत असं शिरसाट म्हणाले आहेत. 

Maharashtra News : लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे आजपासून तीन दिवसाचा अभिवादन दौरा

Maharashtra News : लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे आजपासून तीन दिवसाचा अभिवादन दौरा करणार आहेत. जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा इथून दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी आणि त्यानंतर गोपीनाथगड आणि भगवानगडाचा दौरा केला जाईल,  पुढे चौंडीमध्ये दौऱ्याची सांगता होईल. 

Maharashtra News: धनगर बांधवांना किंवा त्यांच्या नेत्याला मी विरोधक मानत नाही : मनोज जरांगे

Maharashtra News: धनगर बांधवांना किंवा त्यांच्या नेत्याला मी विरोधक मानत नाही असं जरांगे म्हणालेत. फक्त मराठ्यांवर डाव टाकू नका, आम्हाला फसवू नका असा इशारा जरांगेंनी लक्ष्मण हाके यांना नाव न घेता दिला. जरांगेंनी केलेल्या टीकेवर लक्ष्मण हाके यांनीही पलटवार केलाय. जरांगेंच्या आंदोलनामागे खूप मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप हाकेंनी केलाय. 

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. दंगल घडवणं हे भुजबळांचं स्वप्न आहे.. पण ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं जरांगे पाटील म्हणालेत.आपल्या विरोधात कितीही जातीवाद झाला तरी आपण जातीवाद करायचा नाही, कुठल्याही ओबीसी बांधवांना त्रास द्यायचा नाही असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचे संकेतही जरांगे पाटलांनी दिले आहेत. पुन्हा मुंबईत आंदोलन करणं किंवा 288 जागांवर उमेदवार देणं हे दोन पर्याय आमच्यासमोर असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत.

Parliament Session 2024 : लोकसभेच्या अध्यक्षपदाची चुरस, इंडिया आघाडीकडूनही उमेदवार रिंगणात

Lok Sabha Speaker Election: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यावेळी निवडणूक होणार आहे. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांनी अर्ज भरलाय. भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय. स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. आज सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 

Maharashtra Politics: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये दीड तास बैठक

Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. साधारण दीड तास झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय... शुक्रवारपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन,  राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ  विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक होत सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, त्याला महायुती म्हणून कसं सामोरे जायचं यावर रणनीती आखण्यात आली. 

Mumbai News: बेस्ट बसच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू; बोरिवली पश्चिम शिंपोली परिसर येथील दुर्घटना

Mumbai News: नातीला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या आजोबांच्या दुचाकीला बेस्टने धडक दिल्याची दुर्घटना काल (मंगळवारी) सकाळी बोरीवली पश्चिम शिंपोली परिसरात घडली आहे. या धडकेत शाळकरी चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर बोरीवली पोलिसांनी बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यास अटक केलेली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती बोरीवली पोलिसांनी दिली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी 11 वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस


2. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.