Maharashtra Breaking LIVE: लढाखमध्ये नव्या पाच जिल्ह्यांची घोषणा, गृहमंत्रालयाने जाहीर केली यादी
Breaking News Live Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
मोठी बातमी
लढाखमध्ये पाच जिल्ह्यांची घोषणा
गृहमंत्रालयाने जाहीर केली यादी
लडाखमधे आता नवे 5 जिल्हे
गृह मंत्रालयाने जारी केली नव्या जिल्ह्यांची यादी
जांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवे 5 जिल्हे
पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची शरद पवार यांच्या पक्षाकडून मागणी
काल पुण्यातील वानवडी परिसरात पोलीस अधिकाऱ्यावर गुंडांनी केला होता कोयत्याने हल्ला
त्याच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा-ठाकरे गाटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
दोन्ही गटाच्या कार्यकत्यांकडून एकमेकांवर चप्पलफेक
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही आक्रमक
छत्रपती संभाजीनगरमध्ये रामा हॉटेलसमोर भाजपाचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न
शेतकरी आंदोलनाबाबत अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतच वादग्रस्त विधान
शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा कंगनाचा आरोप
कंगनाच्या आरोपामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने केले हे विधान
देशाचे नेतृत्व सशक्त नसतं तर भारताची परिस्थिती बांगलादेश सारखी झाली असती - कंगना
सरकारने कृषी विधेयक मागे घेताच सगळ्यांना धक्का बसला कारण त्या सगळ्यांचं वेगळं खूप प्लॅनिंग सुरू होतं
कंगनाच्या विधानावर काँग्रेस सह विरोधी पक्षांची टीका
शेतकरी आंदोलनाबाबत अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतच वादग्रस्त विधान
शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा कंगनाचा आरोप
कंगनाच्या आरोपामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने केले हे विधान
देशाचे नेतृत्व सशक्त नसतं तर भारताची परिस्थिती बांगलादेश सारखी झाली असती - कंगना
सरकारने कृषी विधेयक मागे घेताच सगळ्यांना धक्का बसला कारण त्या सगळ्यांचं वेगळं खूप प्लॅनिंग सुरू होतं
कंगनाच्या विधानावर काँग्रेस सह विरोधी पक्षांची टीका
पुणे : पुण्यात यंदा लेझर शोविना साजरा होणार दहीहंडी
दहीहंडी उत्सवात लेझरशोला बंदी
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांचे आदेश
लेसरमुळे मागच्या वर्षी अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली त्यामुळे यंदा लेझरवर बंदी करण्यात आली आहे
पुढील साठ दिवस पुणे शहर परिसरात लेझर लाइटला बंदी
आदेशाचा भंग केल्यास योग्य कारवाई करण्यात येणार
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील गाड्या उशिराने
मुंबईकडे येणारी लातूर एक्सप्रेस कळवा स्थानकाजवळ 20 ते 25 मिनिटे रखडल्याने काही गाड्यांवर झाला परिणाम
लातूर एक्सप्रेस मागे दूरंतो एक्सप्रेस आणि बदलापूर हून येणारी फास्ट लोकल होती थांबून
मात्र आता लातूर एक्सप्रेस ठाणे स्थानकात आणून पुढे काढण्यात आली असून, इतरही गाड्या सुरू मात्र विलंबाने
पुणे : पुण्यात आज ऑरेंज अलर्ट आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट
घाटमथ्यावरील अतिवृष्टीने पुणेकरांची धड धड वाढली
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आलाय काल रात्री उशिरा 31 हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपत्रात करण्यात आलाय .
त्यामुळेच शहरातील नदीकाठचा रस्ता जलमय झाला असून हा रस्ता गेल्या दोन दिवसापासून वाहतुकीसाठी बंद आहे.
नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पूर्ण तकतीने प्रचार केला जात आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच पुणे आणि मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -