Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता

Maharashtra Breaking 26 th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

प्रज्वल ढगे Last Updated: 26 Jul 2024 03:30 PM
पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता

पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू झालाय तर तीनजण बेपत्ता आहेत. तीन युवकांचा डेक्कन भागात शॉक लागून मृत्यू झाला.  एक जण कात्रज भागातून वाहणाऱ्या आंबील ओढ्यात वाहून गेला.  एक जण मुठा नदीत वाहून गेला. एक जण इंद्रायणी नदीत बुडाला. तर ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकचा मृत्यू झाला. तर लवासामध्ये दोन बंगल्यांवर दरड कोसळून तीघेजण बेपत्ता झालेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

वसई  : मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात लेनवर पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.


वसई हद्दीत नायगांव येथील वासमारे ब्रिज ते माळजीपाडा, वर्सोवा ब्रीज पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे.


महामार्गावर सुरु असलेले निकृष्ठ दर्जाचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम, त्यामुळे रस्त्यात पडलेले खड्डे यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे.


मागच्या सहा महिन्यांपासून वाहनधारक वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. मात्र महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे वाहनधारकांना  याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता

ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का 


-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
 
-राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात  प्रवेश करण्याची शक्यता..

पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, एक जूनपासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस

लोणावळा, पुणे 


-पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग  


-गेल्या चोवीस तासांत तब्बल 239 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. म्हणजे 9.41 इंच इतका पाऊस कोसळलाय


-या एक जून पासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2760 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.


-रात्री पासून पावसाने विश्रांती घेतलीय

बीकेसीतील धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीत दिसली 8 फुटी मगर

मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात मगर आढळून आली आहे. मगर आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मगर आढळून आल्याची माहिती वाईल्ड लाईफ ऍनिमल प्रोटेक्शन अंड रेस्क्यू असोसिएशन कडून वन विभाग तसेच RAWW संस्थेचे मानद वन्य-जीव रक्षक यांना देखील माहिती कळविण्यात आली. यानंतर वनविभागाने ताबडतोब मगर आढळून आलेल्या ठिकाणी पाहणी केली. मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पाण्याच्या प्रवाहात ही मगर वाहत आली असावी असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय मगर ही मानवी वस्तीत नसून तिच्या नैसर्गिक अधिवासातच आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सध्या मगरीचा शोध घेण्याचं काम वनविभागाकडून सुरू आहे.

सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन 

सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन 


सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन आणि निदर्शने 


कर्जमाफी न करता शेतकऱ्यांवर राज्य आणी केंद्र शासनाने अन्याय केल्याचा काँग्रेसचा आरोप


या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याची घटना 'देवाची करणी', आरोपींच्या वतीने हायकोर्टात युक्तिवाद

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण


अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुख्य आरोपी भावेश भिंडेच्यावतीनं हायकोर्टात युक्तिवाद


16 मे रोजी उदयपूरला अटक जाहीर करूनही पोलिसांनी 17 मे रोजी अटक दाखवल्याचा वकिलांचा दावा


मात्र राज्य सरकारचा याचिकेत नव्यानं आलेल्या या दाव्याला विरोध


भावेश भिंडेला याचिकेत नव्यानं सुधारणा करण्याची हायकोर्टाकडून मुभा, पुढील सुनावणी 5 ऑगस्टपर्यंत तहकूब


होर्डिंग कोसळल्याची घटना 'देवाची करणी' असल्याचा दावा करत गुन्हा रद्द करण्यासाठी भावेश भिंडेची हायकोर्टात याचिका

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरण, आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांची हायकोर्टात याचिका

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरण


आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची हायकोर्टात याचिका


दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला याचिकेतून आव्हान


पुणे सत्र न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवत सुनावलीय जन्मठेपेची शिक्षा


हायकोर्टानं याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली

Kolhapur Rain Updates : कोल्हापूरसह सीमा भागात पावसाचा जोर कायम, महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरू 

कोल्हापूर ब्रेकिंग 


कर्नाटकात निपाणीनजीक महामार्गावर वेदगंगेचे पाणी 


महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरू 


पाणी वाढल्यास पूर्ण महामार्ग बंद होण्याची शक्यता 


सर्व्हिस रोडवरून सुरू आहे मुख्य वाहतूक 


कोल्हापूरसह सीमा भागात पावसाचा जोर कायम

Palghar Rain Update : पालघरमध्ये पावसाची विश्रांती, भातलावणीला वेग!

पालघर : पालघर जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार बसणाऱ्या  पावसाने आज पूर्णपणे विश्रांती घेतली असून गेले काही दिवस खोळंबलेल्या भात लावण्यांना वेग आला आहे. पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भातशेती केली जाते. हळव्या भात लावण्या जवळपास पूर्ण झाल्या असून सध्या शेतकऱ्यांनी गरव्या भात लावण्यांना सुरुवात केली आहे.

Pune Rain Updates : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अनेक भागांमध्ये कालपासून वीज खंडित, नागरिकांना सोसावा लागतोय त्रास!

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अनेक भागांमध्ये कालपासून वीज खंडित आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अनेक तक्रारीनंतर आता एमएसईबीचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत. मात्र मीटर बोर्ड पाण्यामुळे ओले असल्याने त्यांना लाईट चालू करता येत नाहीये. लोकांना विजेचा धक्का लागण्याची भीती आहे.  

कृष्णा नदीतील आयर्विन पुलाजवळ दोन तरुणांचे रेस्क्यू ऑपरेशन

कृष्णा नदीतील आयर्विन पुलाजवळ दोन तरुणांचे रेस्क्यू ऑपरेशन


कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून नदीपात्रात उडी  मारून पोहणाऱ्या दोन तरुणांना नदीत लागला दम


नदी पात्रातील लाईटच्या खांबाला काही काळ बसले तरुण


आपत्ती बचाव पथकाने रिंगच्या मदतीने दोन तरुणांना काढलं बाहेर

मराठा आरक्षण लढ्यासाठी वैचारिक अभियानाची सुरुवात होणार, खिल भारतीय छावा संघटनेची घोषणा

मराठा आरक्षण लढ्यासाठी वैचारिक अभियानाची सुरुवात होणार


अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची मोठी घोषणा


प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन जावळे पाटील यांनी मांडली भूमिका


येत्या ५ ऑगस्टपासून तुळजापूर येथून अभियानाची सुरूवात होणार


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रवीण दरेकर आणि नानासाहेब जावळे पाटील यांची चर्चा

मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आज ( शुक्रवार) दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या फक्त या जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. 

पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलणार

कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलणार


12 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजातून 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करणार 


साध्या कोयना धरणातून 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे


105 टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणात  81 टीएमसी पाणीसाठा आहे


धरणात प्रतिसेकंद 80 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली, एनडीआरएफ टीम सतर्क

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत चालल्याने एनडीआरएफ टीम सतर्क झाली आहे...


कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफची एक टीम कार्यरत असून गरज पडल्यास आणखी एक टीम बोलावली जाऊ शकते...


सध्या ज्या गावांमध्ये नदीचे पाणी शिरतं त्या ठिकाणी पाहणी करण्याचे काम एनडीआरएफ टीम करत आहे...


 

शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा वाढ

शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा वाढ


आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेले दोन क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्टपासून एकत्रित सुनावणी घेण्यास मुंबई विशेष सत्र न्यायालयाची तयारी


या प्रकरणात आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार असल्याची याचिकाकर्त्यांची माहिती


25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुनावणी सुरू


आर्थिक गुन्हे शाखेनं सुरुवातीला सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता


त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय


या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच सात सहकारी साखर कारखान्यांनी कोर्टात निषेध याचिका दाखल केल्या आहेत

आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीसाठी विनंती

आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव,
तातडीच्या सुनावणीसाठी विनंती


उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका


आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला दिलंय आव्हान


आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती 


मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप


सात महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय?,  उध्दव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांचा आक्षेप


न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित

जरांगे पाटील यांनी पुढील उपोषण येवल्यात करावे, पुरणगाव, एरंडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणादरम्यान वेळ आल्यास येवल्यातही उपोषण करील असे वाक्य वापरले. त्यानंतर नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण पुरणगावात घ्या असा ग्रामसभेत ठराव केला. या उपोषणासाठी लागणाऱ्या परवानग्या व सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली असून यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव व एरंडगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केला आहे..

Kolhapur Rains Updates : पंचगंगा नदीमुळे कोल्हापूर शहरातील सकल भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात

पंचगंगा नदीमुळे कोल्हापूर शहरातील सकल भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली...


कोल्हापूरच्या कुंभार गल्ली येथे पाणी शिरलं असून काही नागरिक स्थलांतरित झाले आहेत


तर अजूनही काही नागरिक आपल्या घरामध्येच थांबून आहेत


 

Vasai Rain Updates : वसई भागात पावसाची विश्रांती, ऑरेंज अलर्टमुळे आजही पावसाची शक्यता!

वसई : काल दिवसभर पावसाने धुंबाधार बॅटिंग केल्यानंतर रात्रीपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे. काल कोसळल्या तुफान पावसानं वसई विरारमधील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रात्रभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज काही सखल भागातील पाणी अजूनही ओसरलेलं नाही.  वसईच्या चुळणा येथील रस्त्यावर साचलेलं पाणी अजून ओसरलेलं नाही. सकाळी कामावर जाणारे चाकरमनी, शाळेतील विद्यार्थीं यांना या साचलेल्या पाण्यातून जावे लागले.  रात्रभर जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज ढगाळ वातावरण असून, ॲारेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची आजही जोरदार पडण्साची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Rain Updates : पुण्यातील सिंहगड परिसरातील एकता नगरमधील वीज अद्याप खंडित

पुणे : पुण्यातील सिंहगड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे..


लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून पोहोचवण्यात आलेलं नाही.. वापरण्यासाठी पाणी नाही... 


या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत...


पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत...

Satara Rain Updates : साताऱ्यात पावसाने घेतली विश्रांती, कृष्णा नदीला महापूर

साताऱ्यातील पाऊस थांबला आहे. कण्हेर धरणातील पाण्याचा प्रवाह वाढला असून कृष्णा नदीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.  

कोयना धरणातील विसर्ग 20 हजाराहून 30 हजार क्युसेक्सवर

सातारा : कोयना धरणातील विसर्ग 20 हजाराहून 30 हजार क्युसेक्स केला आहे.

Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरात पावसाची रात्रीपासून विश्रांती, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुरळीतपणे सुरू

मुंबईसह उपनगरात पावसाची रात्रीपासून विश्रांती


रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुरळीतपणे सुरू

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News 26th July LIVE Updates: : सध्या राज्यात मोठ्या मुंबई, मुंबई उपनगर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले. या भागातील नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्यात तर जोरदार पाऊस होत असून या भागातील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आजदेखील (26 जुलै)  या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागातील पावसासह राज्यभरातील पावसाचे तसेच इतर अपडेट्स तुम्हाला येथे वाचता येतील.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी राजकीय पक्षांनी आतापासून तयारी चालू केली आहे. त्यामुळे राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व घडामोडींचे अपहेट्स वाचा एका क्लीकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.