Maharashtra Breaking 1st August LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 1st August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 01 Aug 2024 08:56 AM
Maharashtra News: मालेगावातल्या गिरणा धरणात केवळ 15.22 टक्के जलसाठा

Maharashtra News: उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जल साठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणाने आता तळ गाठला आहे. गिरणा धरणात केवळ 15.22 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी जुलैअखेर गिरणा धरणात 31.88 टक्के जलसाठा होता यंदा मात्र अवघा 15 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने खान्देशसह नाशिकच्या मालेगाव आणि नांदगावचीही चिंता वाढलीये.

Hingoli News : ई-पॉस मशिनचं सर्व्हर ठप्प असल्याने हिंगोली जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प

Hingoli News : ई-पॉस मशिनचं सर्व्हर ठप्प असल्याने हिंगोली जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे  49 टक्के धान्य रेशन दुकानात पडून आहे. 31 जुलैपर्यंत जिल्हाभरातील सर्व स्वस्त धान्य वितरित होणे अपेक्षित होतं. परंतु तसे झालं नाही. याचा फटका ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसतोय. 

Central Railway Mega Block : मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द?

Central Railway Mega Block : मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मेगाब्लॉक घेणार आहे. भुसावळ विभागात हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात विविध अभियांत्रिकी कामं पूर्ण होतील. भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल.  सेलू रोड स्थानक येथे 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग'चं काम पूर्ण करण्यात येईल.. वर्धा-नागपूर दरम्यान 'लाँग हॉल लूप लाईन'ला 'कनेक्टिव्हिटी' देण्यात येईल. त्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एक तर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा


Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एक तर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान, तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप


Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा?

Maharashtra Political Updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा हे केंद्रात मंत्री झाल्यावर आता पुढील अध्यक्ष कोण असतील याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यात सर्वात आघाडीवर फडणवीस यांचं नाव असल्याचं समजतंय. नुकतीच फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली होती. त्यामुळे या शक्यतांना बळ मिळालंय. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची चर्चा आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 1st August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता, मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चांना जोर, तर फडणवीसांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती


2. आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार,  मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता


3. सांगलीत कृष्णा नदीने पुन्हा ओलांडली इशारा पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


4. राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड, आव्हान अर्जाला उशीर झाल्याबद्दल बसला दंड


5. भुसावळ विभागात मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा मेगाब्लॉक, आजपासून 11 ऑगस्टपर्यंत  नागपूर-भुसावळ मार्गावर धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द


6.गणपतीला गावाकडे जाण्यासाठी एसटीच्या जादा 4300 बस, गेल्या वर्षीच्या तुलनेत 800 जादा बस, 2 सप्टेंबरला धावणार पहिली बस, मुंबई,ठाणे,पालघर विभागातून निघणार बस


7. वसईमध्ये महावितरणच्या केबलचा भीषण स्फोट, फटाक्यांची माळ उडावी तशा उडत होत्या ठिणग्या, सुदैवानं वित्त वा जीवितहानी नाही


8. दिल्लीत काल संध्याकाळी बेफाम पाऊस,मराठीबहुल मयूरविहार भागात एका तासात 90 तर सहा तासांत 142 मिलीमीटर पाऊस


9. राहुल आणि प्रियांका गांधी वायनाडला रवाना, दुर्घटनेत अजूनही 248 बेपत्ता, मृतांचा आकडा 243 वर, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.