Maharashtra Breaking 19th June LIVE Updates: तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू,पाठीत वार केलात तर वाघनखे काढू : उद्धव ठाकरे
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Uddhav Thackeray : भगव्यात भेद करणारे तुम्ही... आपल्या भगव्यात चिन्ह टाकायच नाही, भगवा पवित्र शिवरायांचा आहे तो भगवाच असला पाहिजे. छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करणार्यांना आपल्याला गाडायचंय: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : तुम्ही जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नख काढू, मुनगंटीवार यांचे नख चंद्रपूरमध्ये उखडले आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे वाघनखे आणताय? शिवसेनेचा भगवा भगवा असला पाहिजे त्यावर कुठलेही चिन्ह टाकू नका, तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू, पाठीत वार केलात तर वाघनखे काढू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray: मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा... माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या.. या मिंदेला बाजूला ठेवा, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray: मराठी हिंदू मत मिळाली नाही...शिवसेनेला मुस्लिम मत मिळाली.. हो आहे जरूर पडले आहेत... सर्व देशभक्तांचे मते शिवसेनेला मिळाले आहेत. डोम कावळे तिकडे बसलेत आता त्यांचा पिंडदान सुद्धा आलाय. नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे. 2014 आणि 2019 चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा! आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत ... चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत? आम्ही पाठीमागून वार करणारे नाही.. समोरून वार करणारे आम्ही आहोत. अनेक युट्युबरनी आम्हाला साथ दिली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : मला विरोध करण्यासाठी काही, उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला आहे.
Uddhav Thackeray : आठवड्यात मविआची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले. पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित या सर्वांना, मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो. सलामीला भास्कर जाधव, मधल्या फळीत संजय राऊत यांनी भाषणं केली. आता शेवटचा बोलर फलंदाजीला आल्यावर काय परिस्थिती होते, तशी अवस्था माझी झाली आहे.
Uddhav Thackeray : लोकसभेत यश माझ्यामुळे आले असे मी कधीच म्हणार नाही. मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात
आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुला कोणी रोकू शकत नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे.
अहंकार जो मोदीमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार आहे, ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं?
Sanjay Raut : आजचा दिवस ऐताहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली. हा शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या फडतूस माणसा समोर आम्ही झुकणार नाही. मोदी जन्माला आल्यावर चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आला होता. 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे मोदींचा खुळखुळा तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे.
Sanjay Raut : भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. ४०० पार करणार होते तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे... अरे तुम्ही हरलाय... आणि आभार यात्रा काय काढताय. मोदी हा ब्रँड होता आता ब्रॅन्डी झाली आहे. ही आता देशी ब्रॅन्डी झाली आहे
Shiv Sena Vardhapan Din: शिवसेनेचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनेनं शक्तिप्रदर्शानाची जोरदार तयारी केलीय. शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथं वर्धापन दिन साजरा करतेय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडतोय. पक्षफुटीनतर दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्याची ही दुसरी वेळ आहे. वर्धापन दिनाच्या निमित्तानं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फोडला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या या कार्यक्रमात दोन्ही नेते एकमेकांबद्दल काय बोलणार, याचीही उत्सुकता आहे.
पाहा मेळावा लाईव्ह (Uddhav Thackeray Melava Live)
NEET Exam : नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला त्या विरोधात आम आदमी पक्षाकडून आंदोलन केलं जातंय. दादर स्टेशन परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. घोटाळ्यावर मोदी सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येतीये.
Chandrapur News: चंद्रपुरातील कर्नाटक-एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आली. खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं होते. आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. चर्चेदरम्यान आंदोलक आणि व्यवस्थापक यांच्यात मागण्यांच्या पुर्ततेवरुन आधी शाब्दिक चकमक आणि नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडलं.
Kolhapur News: करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू झाली आहे. आजपासून पुढचे पंधरा दिवस देवीच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांची मोजदाद सुरू राहील. मोजदाद पूर्ण झाल्यानंतर हे सर्व दागिने करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यामध्ये ठेवले जातील. त्यानंतर याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात येईल.
Maharashtra News: गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट.
Navi Mumbai Vegitable Price Hike: नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ मार्केटला भाजीपाल्यांचे दर 200 रूपये किलोवर जावून पोचले आहेत. प्रत्येक भाजीचे दर दुप्पट- तिप्पट वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पटोलेंच्या कृत्यावर टीकेचे झोड उठत आहेत. नाना पटोलेंच्या या कृत्याविरोधात राज्यभरात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन केलं जात आहे. नाशिक, नागपूर, मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी नाना पटोलेंचा विरोध केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून आजसुध्दा पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनरचा एक विचित्र अपघात झालाय. या अपघातात एक खासगी बस ही मुंबईकडून पोलादपूर कडे जात असताना बसमधील प्रवाशी उतरण्याकरिता थांबली होती मात्र त्याच क्षणाला मागून येणाऱ्या एका ट्रेलरणे या बसला जोरदार धडक दिली यामध्ये बसला मोठा धक्का पोहचल्याने बसमधून खाली उतरत असलेल्या एका प्रवाशाचा या प्रसंगी जागीच मृत्यु झाला आहे. रवींद्र यशवंत सकपाळ वय वर्ष 55 अस या व्यक्तीचे नाव असुन अपघातानंतर ट्रेलर चालक मात्र हा घटनस्थळावरून फरार झाला आहे त्याचा पोलादपूर पोलिस शोध घेत आहेत.
Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह असलेल्या नरहरी झिरवळांनी मविआचे संदीप गुळवे यांच्या पाठीशी ताकद उभी केलीय. नाशिक शिक्षकमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असूनही त्यांनी मविआच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. मात्र कौटुंबीक संबंधांमुळे मविआच्या संदीप गुळवेंना पाठिंबा दिल्याचं झिरवाळ म्हणाले.
Sharad Pawar Baramati Daura: शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.. दुसऱ्या दिवशी शरद पवार सहा गावांत शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत.. विशेष म्हणजे अजित पवारांचं घर असलेल्या काटेवाडीत शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा आहे. आज सकाळी पवारांनी गोविंदबागेत जनता दरबार घेतला. पवारांनी बारामतीकरांच्या समस्या जाणून घेतला. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला. नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवर पवार बोलले. प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातात दिलं पाहीजे अशी साद पवारांनी घातली.
Chhagan Bhujbal on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना अतिशय सूचक वक्तव्य केलंय. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे असं भुजबळ म्हणाले. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी भुजबळांशी फोनवरून संवाद साधला. त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. भुजबळ दुसऱ्या पक्षात जाणार अशा चर्चा अनेक माध्यमांवर होती. मात्र एबीपी माझानं तशी बातमी दाखवली नाही. आम्ही उलट आधी भुजबळांशी संपर्क साधला, आणि त्यांची बाजू जाणून घेतली. राज्यसभेसाठी डावललं जाणं, पक्षात आधीपासून होणारी कुचंबणा, ओबीसी आरक्षणाबद्दल घेतलेल्या भूमिकेबाबत पक्षातून पाठिंबा न मिळणे अशा अनेक कारणांनं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर होण्याअगोदर पक्षाच्या बैठकीत त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहे, असं म्हणणं बरंच काही सूचित करून जातं.
Shiv Sena Vardhaman Din : शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे.
Chandrapur News LIVE: विहिरीतून पाणी काढतांना पाय घसरून आजोबा आणि नातीचा चंद्रपूर जिल्ह्यात दुर्दैवी मृत्यू झालाय. जिवती तालुक्यातील टाटाकवडा शेतशिवारातील ही घटना असून शंकर गेडाम (50) आणि पूर्वी गेडाम (14) अशी मृतांची नावं आहेत. काल दुपारी गेडाम कुटुंबीय शेतात काम करत असतांना पाणी काढण्यासाठी शंकर गेडाम हे विहिरीत उतरले मात्र त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. सोबत असलेल्या नातीने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता ती देखील पाय घसरून विहिरीत पडली आणि दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Sharad Pawar Baramati Visit : शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी शरद पवार सहा गावांचा शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत. अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या काटेवाडी गावात शरद पवार आज शेतकरी जनसंवाद दौरा करणार. सोबत युगेंद्र पवार देखील उपस्थित असणार आहेत तर दुपारनंतरच्या दौऱ्यात सुप्रिया देखील सहभागी होणार आहेत. शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. शरद पवार काटेवाडीत काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
Nashik News: नांदगाव : नाशिक नांदगाव तालुक्यातील खादगाव येथे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या विलास गायकवाड यांच्या कुटूंबियांची आमदार सुहास कांदे यांनी भेट घेऊन सांत्वन केले..घरातील कर्ता पुरुष वीज पडून मृत्युमुखी पडल्याने गायकवाड परिवार उघड्यावर आला. आमदार सुहास कांदे यांनी पन्नास हजार रोख रकमेसह सहा महिने पुरेल इतके अन्नधान्य आणि किराणा देऊन या कुटुंबीयांचा संसार सावरला. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती मधून 4 लाखांची शासकीय मदत लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी पीडित कुटुंबीयांना आ.कांदे यांनी दिले.
Shiva Rajyabhishek Ceremony: रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तिथीनुसार उद्या 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक सोहळा थाटामाटात पार पडणार आहे.
Techers Online Transfer: राज्य शासनाने पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता राहणार असून अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळणार आहे. विशेष संवर्गाअंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढचे तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. दरम्यान बदलीस पात्र होण्यासाठी सलग सेवा 10 वर्षे आणि विद्यमान शाळेवर पाच वर्षे सेवा झालेली असावी लागणार आहे. दरम्यान या ऑनलाईन पद्धतीमुळे बदल्या भ्रष्टाचारमुक्त होतील.
Police Bharati 2024: संपूर्ण राज्यभरात रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त सापडलाय. आजपासून पोलीस भरतीला सुरूवात झालीय. राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांकडून भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आलंय. 17 हजार जागांसाठी 17 लाख अर्ज आलेत. आज पहाटेपासून मैदानी चाचण्यांना सुरूवात झालीय. पोलीस दलांनी भरती प्रक्रियेसाठी विशेष नियोजन केलंय. नाशिक शहर हद्दीत 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीत 32 जागांसाठी मैदानी चाचणी घेतली जातेय. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 754 जागांसाठी पोलिसांची भरती सुरू आहे यासाठी तब्बल 97 हजार 847 मुलांनी अर्ज केले आहेत. अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीण 207 असे एकूण 281 जागांसाठी भरती सुरू आहे. शहरातल्या जागांसाठी साडेचार हजारांहून अधिक तर ग्रामीण भागातल्या जागांसाठी 25 हजारांहून अधिक परीक्षार्थी दाखल झालेत.
Akola Rain Updates: सध्या राज्यातील पाऊस अनियमित आहे तसंच अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये, असा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनं राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय.
Maharashtra Rain Updates: जूनच्या सुरूवातीला दमदार आगमन करणाऱ्या पावसाने आता दडी मारलीय. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. राज्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात अवघ्या 5.69 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तापमानात पुन्हा वाढ झालीय, उन्हाचे चटके बसू लागलेत. पीकनिहाय विचार करता, सरासरीच्या तुलनेत भात, बाजरी, नाचणी, तूर, उडीद आणि भुईमूगाची दोन टक्के, ज्वारी, अन्य तृणधान्यांची एक टक्का पेरणी झाली आहे. मक्याची सात टक्के, सोयाबीन आणि अन्य तेलबियांची पेरणी सरासरीच्या चार टक्केच झाली आहे. कापूस पिकाची सर्वांधिक 11 टक्के पेरणी झालीय. कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. भाताच तरवे जगवण्यासाठी धडपड सुरू आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीहून जास्त पाऊस झालाय. मात्र पावसाने गेल्या आठ दिवसांत विश्रांती घेतलीय. त्यामुळे कापूस सोयाबीन लागवड रखडलीय.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ
2. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, 17 हजार जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज, 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित
3. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार, दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार न्याय
4. आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार
5. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक वक्तव्य
6. कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया
7. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासह मंथन, मित्रपक्षांना सोबत घेत निवडणूक जिंकण्याचा निर्धार
8. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती, दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही
9. 200 हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार
10. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -