Maharashtra Breaking LIVE: INS विक्रांत बचाव मदतनिधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार 

Maharashtra Breaking 13th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2024 01:16 PM
Mumbai News : आयएनएस विक्रांत बचाव मदतनिधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार 

Mumbai News : आयएनएस विक्रांत बचाव मदतनिधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार 


मुंबई पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं फेटाळला


सोमय्या यांच्याविरुद्धच्या आरोपांबाबत अधिक चौकशी गरजेची, कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळताना कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण 


मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टातील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एस. पी. शिंदे यांचा निर्णय


किला कोर्टाच्या या भूमिकेमुळे सोमय्या यांच्यासह मुंबई पोलीसांनाही झटका

Maharashtra News : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा

Maharashtra News : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा


शिवसेना शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बजोरिया यांची तातडीच्या सुनावणीसाठी हायकोर्टात विनंती 


मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठानं येत्या 23 ऑगस्टला यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय


शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी 12 आमदार नियुक्तीप्रकरणी दाखल केलीय हायकोर्टात याचिका

Shiv Sena News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख, 20 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी 

Shiv Sena News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख 


उद्धव ठाकरेंच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिली 20 ऑगस्टची तारीख, 20 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी 


शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले आहेत. त्याविषयी ही सुनावणी होणार आहे

New Delhi : जीएसटी कौन्सिलची बैठक 9 सप्टेंबरला 

New Delhi : नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलची बैठक 9 सप्टेंबरला 


राजधानी दिल्लीत 9 सप्टेंबरला होणार जीएसटी कौन्सिलची 54 वी बैठक


महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का, याकडे लक्ष

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, दोनशे किलोचा हार घालून करणार स्वागत

Manoj Jarange :  मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकच्या तपोवन येथून रॅलीला सुरुवात होईल आणि शहरातील सीबीएस या मुख्य चौकात सभेने रॅलीचा समारोप होणार आहे. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचा स्वागत होणार असून मालेगाव स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जरंगे पाटील यांचा  200 किलोचा 25 फूट फुलांच्या हार घालून स्वागत करण्यात येणार आहे.

Chandrapur News : चंद्रपुरात हर घर तिरंगा अभियानाची उत्साही सुरुवात

Chandrapur News : चंद्रपुरात हर घर तिरंगा अभियानाची आज उत्साही सुरुवात झाली. आजपासून 3 दिवस हे अभियान चालविले जाणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानी सन्मानपूर्वक राष्ट्रीय ध्वज फडकविला. याप्रसंगी सुरक्षा जवानांनी सलामी दिली. राष्ट्रध्वज म्हणजे केवळ चौकोनी तुकडा नसून ही देशाची शान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात असलेले हर घर तिरंगा अभियान सफल करण्याचे आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

Pune Crime News : शेअर बाजारात गुंतवणूक करुन अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून सैन्यातुन सेवानिवृत्त झालेल्या जवानांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक

Pune Crime News : शेअर बाजारात गुंतवणूक करुन अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून सैन्यातुन सेवानिवृत्त झालेल्या जवानांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. फसवणूक झालेल्या 313 जवानांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून फसवणूक झालेल्या माजी सैनिकांची संख्या अधिक असून या घोटाळ्याची व्याप्ती शेंकडों कोटी रुपयांमध्ये असल्याच्या या माजी सैनिकांचा दावा आहे. ज्याने या माजी सैनिकांची फसवणूक केलीय तो सुरेश गाडीवड्डार हा देखील माजी सैनिक असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्या कंपनीतील साथीदार फरार झालेत. आयुष्यभराची कमाई गमाऊन बसलेल्या या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना यामुळे जगणं अवघड झालंय.

Nanded News : सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, उत्पादनात होणार घट

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जवळपास 4 लाख 12 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे, मात्र यातील 30 टक्के क्षेत्रावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यामुळे आता लागवड खर्च ही निघणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai New : मुंबईत सरकार उभारणार अहिल्यभावन

Mumbai New : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा स्मृतीदिन..या निम्मित आज महाराष्ट्र सरकार ने मुंबई मध्ये भव्य दिव्य अहिल्याभवन उभारण्याची घोषणा केली आहे. चेंबूर येथे चेंबूर एज्युकेशन सोसायटी च्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची घोषणा केली.मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती मार्फत 47 कोटी रुपये खर्च करून मानखुर्द येथे बाल कल्याण विभागाच्या जागेवर हे भवन उभारले जाणार आहे. या भवनात अहिल्या देवींचा पूर्णकृती पुतळा, महिला आणि बाल कल्याण विभागाची विविध कार्यालय, सभागृह, महिलांना मार्गदर्शन केंद्र, विश्राम गृह अश्या विविध सुखसुविधा असणार असल्याची माहिती लोढा यांनी या वेळी दिली आहे. 

Nanded News : आमदार कल्याणकर यांना मराठा आंदोलकांनी अडवले, घेराव घालत विचारला जाब 

Nanded News : नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात उत्तर नांदेड मतदार संघातील सोमेश्वर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले. सोमेश्वर येथे विकासकामाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घेराव घालत जाब विचारला. मराठा आरक्षणाच, सगेसोयरे अमंबजावणीच काय झाल. तूम्ही सत्ताधारी आहात, वाशीमध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाच काय झाल. अशी विचारणा मराठा आंदोलकांनी केली.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत विविध दावे प्रतिदावे

Maharashtra Politics : विधानसभेचे पडघम वाजू लागलेत. मुख्यमंत्रीपदावरून सध्या महाविकास आघाडीत विविध दावे प्रतिदावे केले जात आहेत. मविआचं सरकार येईल, त्याचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव ठाकरेच असतील असा वारंवार दावा करणाऱ्या राऊतांना काल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं. त्यावर आता संजय राऊतांनीही पटोेलेंना आव्हान दिलंय. 

Shiv Sena Shinde Group Meeting : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना समन्वय समितीच्या बैठकांना सुरुवात

Shiv Sena Shinde Group Meeting : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना समन्वय समितीच्या बैठकांना सुरुवात

शिंदे गटाच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरील अंतिम बैठका सुरु

दुसऱ्या सर्वेक्षणात 177 जागांवर महायुतीला अनुकूल परिस्थिती

अनुकूलता असली तरी तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी

मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडणार

Nandurbar News : खराब रुग्णवाहिका आणि ढिसाळ आरोग्य सुविधांच्या विषयावरुन सीके पाडवी आक्रमक

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खराब रुग्णवाहिका आणि ढिसाळ आरोग्य सुविधांच्या विषयावर विरोधी सदस्य आक्रमक  झाल्याचं पहायला मिळालंय. तसंच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते सी के पाडवी यांनी केलाय.  पाडवींच्या प्रश्नावर अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी रुग्णवाहिकांच्या त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. मात्र यात रुग्णवाहिका कधी दुरुस्त होतील हा प्रश्न पाडवी यांनी पुन्हा उपस्थित केलाय. 

Maharashtra News : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी

Maharashtra News : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात


आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी


संघ आणि भाजपामध्ये समन्वय राहावे यासाठी अतुल लिमये यांच्याकडे जबाबदारी


लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघात समन्वय पाहायला मिळालं नव्हतं याचा फटका राज्यात बसला होता


तसा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी अतुल लिमये यांच्याकडे महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी


येत्या महिन्यातभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठकांचा आणखी वाढणार

Kolkata Case : राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन

Kolkata Case : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला...या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आजपासून कामबंद आंदोलन केलंय.  या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहणार आहेत या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Maharashtra Politics : मंत्रीपद गेलं तरी सरकारी रुबाब कायम

Maharashtra Politics : केंद्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होऊन महिना उलटला तरी राज्यातील माजी मंत्र्यांचा सरकारी रुबाब अजूनही कायम आहे. हे माजी मंत्री अजुनही सरकारी बंदोबस्तात फिरत असल्याचं समोर आलंय. राज्यातील केंद्रात मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे भागवत कराड भारती पवार आजही वाय दर्जाच्या सेक्युरिटीमध्ये सरकारी बंदोबस्तात फिरतात. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी अक्षेप घेतलाय. तसंच ही सिक्युरिटी तात्काळ काढून घेण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. 

Maharashtra News : शिवस्वराज यात्रेनिमित्त आलेले खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले

Maharashtra News : शिवस्वराज यात्रेनिमित्त आलेले खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते

Mumbai News : मार्मिकचा आज 64वा वर्धापन दिन; ‘मार्मिक’चे संपादक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा

Mumbai News :  मार्मिक’चा आज 64 वा वर्धापन दिन सोहळा; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार - साप्ताहिक ‘मार्मिक’चा 64वा वर्धापन दिन सोहळा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  आणि ‘मार्मिक’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी मंदिरांत होणार आहे

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप, मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील शाळांना आज सुट्टी

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे. नाशिकच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीये. दरम्यान भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगें काय प्रतिउत्तर देणार याकडेही लक्ष लागलंय.

Pune News : पिंपरीतील भाजप आमदाराला भाजपच्या शहराध्यक्षांचे वावडे? प्रदेशाध्यक्षांकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार महेश लांडगेंना शहराध्यक्ष शंकर जगतापांचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत भाजप चिटणीस सचिन काळभोरांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केलीये. भाजप आमदार महेश लांडगे हे शहराध्यक्ष जगतापांचा उल्लेख टाळतात, त्यांचा फोटो कुठेही वापरत नाही, पक्षाच्या बैठकीला हजर राहत नाहीत. अशा पद्धतीने लांडगे प्रोटोकॉल तोडतात. त्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. अशी मागणी थेट प्रदेश भाजपकडे काळभोरांनी केलीये. 

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत काँग्रेसकडून चारही जागांसाठी चाचपणी सुरू

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत काँग्रेसकडून चारही जागांसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या याद्या मागविण्यात आल्या आहेत त्यात परभणीच्या पाथरीमधून सुरेश वरपूडकर यांना नाना पटोले यांनी उमेदवारी जाहीर केलीय

Maharashtra Politics : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत ठाकरे गटातली धुसफूस चव्हाट्यावर

Maharashtra Politics : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत ठाकरे गटातली धुसफूस चव्हाट्यावर आलीय. नाराज पदाधिकाऱ्यांना डावलून ठाकरे गटाकडून कुर्ला विधानसभेत आज नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या कुर्ला विधानसभेत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कुर्ला विधानसभेत विधानसभा प्रमुखपद निर्माण केल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते, नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे जवळपास 18 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता. 

Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार

Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार


राखी पौर्णिमेच्या निमित्तानं फडणवीस राज्यातील बहिणींशी संवाद


लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचं अभियान


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Vidhan Sabha Election 2024 : नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार?

Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असं मानलं जातंय. मात्र आता ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माझाच्या हाती लागलीय. नियमानुसार २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो अशी माहिती समोर येतेय. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 13th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. विधानसभेत भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात, संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी


2. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, दिवाळीनंतर निवडणुका


3. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पीकपाण्यासह लाडकी बहीण आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा घेणार आढावा


4. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली बैठक, विधानसभा निवडणूक, एससी-एसटी आरक्षणात क्रिमिलेअरसह जातगणनेच्या मुद्द्यावर होणार चर्चा


5. मार्मिकचा आज 64 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंची उपस्थिती, मनसेशी पेटलेल्या वादावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष


6. मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.