Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरण, शत्रुघ्न सिन्हा यांचं मांसाहार बंदीबाबतचं वक्तव्य, यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडी राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरत आहेत.

नामदेव जगताप Last Updated: 06 Feb 2025 02:40 PM
Nagpur : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे अधिवेशन नागपुरात

गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर मुख्यालयात 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी दुसरे अधिवेशन होणार आहे. 24 मार्चला दुपारनंतर खुले अधिवेशन होणार असून 120 तालुक्यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी हजर राहणार आहेत. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न, अनुशेष यावर चर्चा तसेच विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक भूमिका मांडणार आहेत. प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले विदर्भाचा अर्थसंकल्प जनतेसमोर सादर करणार आहेत. या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.

Kirit Somaiya : किरीट सोमय्या अकोल्यात दाखल

भाजपा नेते किरीट सोमय्या अकोला येथे दाखल झाले आहेत. अकोल्यातील रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात साडेपंधरा हजार बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी आरोप केलाय. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांकडे याबाबत तक्रार दिली होती. अमरावती, नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज सोमय्या यांनी अकोला येथील रामदास पेठ पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. 

Kalyan Crime : शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

कल्याण : शिवाजी महाराज चौकात लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर सकाळी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. बारक्या राजाराम मढवी असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून कल्याणमध्ये खाजगी रुग्णालयात शेतकऱ्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  बैलासाठी मक्याची सालं घेण्यासाठी शेतकरी मार्केटमध्ये गेला होता. मक्याची साल घेत असताना अज्ञातांनी शेतकऱ्यावर कोयत्याचे वार केले. प्राणघातक हल्ला का केला आणि कोणी केला? हे अद्याप अस्पष्ट आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. 

Andheri : अंधेरीत वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची तोडक कारवाई 

अंधेरीत वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची तोडक कारवाई 


अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सहार जंक्शन येथील 29 घरांवर मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व विभागाकडून तोडक कारवाई, 


5 जेसीबी आणि महापालिकेच्या 40 कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली झोपड्यांवर तोडक कारवाई,


महापालिकेने झोपडीधारकांचे पुनर्वसन करून आज केली तोडक कारवाई,


या तोडक कारवाईमुळे अंधेरी सहार रोड ची वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार 

शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, कल्याणमधील धक्कादायक घटना

कल्याण शिवाजी महाराज चौकात लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर सकाळी कोयत्याने जीवघेणा हल्ला,


या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी,


बारक्या राजाराम मढवी असे जखमी शेतकऱ्याचे नाव, असून कल्याणातील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल 


बैलासाठी मक्याची सालं घेण्यासाठी गेला होता मार्केटमध्ये,


मक्याची साल घेत असताना अज्ञातांनी केला कोयत्याचे वार,


कोयत्याचे वार शरीराच्या सर्व अगांवर असून चेहऱ्यावर देखील तीन वार असल्याचे निष्पन्न,


संपूर्ण प्रकाराचा तपास महात्मा फुले पोलीस स् करत आहे, 


प्राण घातक हल्ला का केला आणि कोणी केला हे अद्याप अस्पष्ट,


सीसीटीव्ही च्या आधारे मारेकऱ्यांचा पोलिसांचा शोध सुरू केला आहे,

धनंजय मुंडे यांचा कारभार एकदम स्वच्छ, विरोधकांकडून राजकीय आरोप - संताेष बांगर

धनंजय मुंडे यांचा कारभार एकदम स्वच्छ, विरोधकांकडून राजकीय आरोप


शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण 


सरकारच्या कुठल्याही योजना बंद होणार नाही 


राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार त्यामुळे निधीची कमतरता नाही 


नांदेड येथे हा एकनाथ शिंदे यांच्या आभारी यात्रेसाठी संतोष बांगर दाखल 

भाजप आमदार रणजितसिॅह मोहिते पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 

भाजप आमदार रणजितसिॅह मोहिते पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 


रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार असतानाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 


मुख्यमंत्र्यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून तलवार देखील भेट 


काल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा


दोन दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची माहिती

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू


आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट एन्काऊंटरमध्ये झाल्याचा न्यायालयीन चौकशीत ठपका


दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली?


न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या कोर्टात सुनावणी 



5 पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवलंय


संबंधित पोलीस अधिका-यांचाही याप्रकरणी हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय 


याचिकाकर्ते अण्णा शिंदे यांचीही राज्य सरकारविरोधात हायकोर्टात याचिका


सरकारी वकिलांकडून उत्तर देण्याकरता मागितली होती मुदतवाढ


यात विशेष सरकारी वकील म्हणून अमित देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ८८६ लगेज ट्रॉली बॅग खरेदी करण्याचा निर्णय महायुती सरकारने केला रद्द

राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ८८६ लगेज ट्रॉली बॅग खरेदी करण्याचा निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे अशी माहिती मिळत आहे.


लोकप्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या बॅगसाठी ८१.९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता.


मोठ्या चार चाकी ट्रॉली बॅगऐवजी ब्रिफकेस देण्याची शक्यता आहे


अर्थसंकल्पीय कागदपत्रांचे वाटप पेन ड्राइव्हच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळ बॅग कशाला असा प्रश्न उपस्थित होता

आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा..आमिषाला बळी पडू नका भक्कमतेने लढा - उद्धव ठाकरे 

आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा... अजून देखिल तुम्हाला अनेक आमिष येतील त्याला बळी पडू नका भक्कमतेने लढा - उद्धव ठाकरे 


मुंबई महानगर पालिकेचा बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी साधला ऑनलाईन संवाद... 


काहीजण मुंबई लुटायला आले आहेत... पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे उद्धव ठाकरे यांच शाखा प्रमुखांना मार्गदर्शन...


आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा... अजून देखिल तुम्हाला अनेक आमिष येतील त्याला बळी पडू नका भक्कमतेने लढा - उद्धव ठाकरे 


7 तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण होणार आहे... मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमला जाणार असून हा निरीक्षक शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घेणार आहे... 


मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक असे निरीक्षक मुंबईत प्रत्येक शाखेत जाऊन आढावा घेतील... 


त्याच सोबतच निरीक्षक शाखा बांधणीचा आढावा देखील घेणार आहेत 


शाखेचे पदाधिकारी आहेत की नाहीत कोणती आणि किती पद खाली आहेत याचा अहवाल हा निरीक्षक शिवसेना भवन येथे सादर करणार आहे... 


ठाकरे गट आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची सूत्रांची माहिती...

लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज, बच्चू कडूंचा सरकारवर फसवणूकीचा आरोप

बच्चू कडू ऑन लाडकी बहीण योजना


लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहे यावर बच्चू कडू म्हणाले की यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे,.


डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेट मधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे, ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती, सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले


तुम्ही निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले मग आता म्हणता की त्या पात्र नाही, मग पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचं हाय मोठा प्रश्न आहे... हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे...


सरकारने मतं घेतले मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे...

मुंबई मनपाच्या दुय्यम व कनिष्ठ अभियंता पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार

मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी  ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे


 9 फेब्रुवारी, दोन तीन आठ आणि नऊ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेत असताना  परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे


या परीक्षा  TCS ION सेंटरवरच मुंबई महापालिकेकडून घेतल्या जाव्यात अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे


या परीक्षांचे सेंटर TCS ION सोबत इतर इंटरनेट कॅफे सेंटर म्हणून घेण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी ज्याप्रकारे तलाठी आणि इतर ऑनलाइन परीक्षेमध्ये घोटाळा झाला तशा प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता उमेदवारांकडून वर्तवली जात आहे 


 त्यामुळे यामध्ये मोठा गोंधळ आणि घोटाळा होऊ नये यासाठी आधीच या परीक्षाचे सेंटर  TCS ION करावे अशी मागणी करण्यात आली आहे

पुणे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच , एकूण ५ आरोपी अटकेत

पुणे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच , एकूण ५ आरोपी अटकेत


शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड


पुण्यातील येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 


परवा रात्री बिबेवाडी परिसरात 50 ते 60 वाहनांची करण्यात आली होती तोडफोड


काल रात्री पुन्हा शहरात तीन ठिकाणी आरोपींकडून गाड्यांची तोडफोड 


येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मी नगर येथे वाहन तोडफोडीची घ्टणा 


घटनास्थळी अज्ञात इसमांनी एकूण 20 ते 22वाहनांची तोडफोड 


तर फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कागदीपुरा साततोटी चौकी येथे 4 ते 5 वाहनाची तोडफोडीचा प्रकार आहे


या प्रकरणात एकूण ५ आरोपी अटकेत

नांदेड शहरात अशोक चव्हाण यांची मोनोपॉली, आमदार हेमंत पाटलांचा आरोप

नांदेड शहरात अशोक चव्हाण यांची मोनोपॉली, अधिकारी नियुक्तीत मोनोपॉली, शिवसेना आमदार हेमंत पाटलांचा आरोप


महायुतीत नीट संवाद साधणार नसाल तर महायुतीत मिठाचा खडा पडेल, हेमंत पाटलांचा सूचक इशारा


चव्हाण साहेब मोठे नेते त्यांनी युती धर्म पाळला पाहिजे 


काँग्रेस पक्षात त्यांनी स्वतः चा गट निर्माण केला होता, भाजपमध्ये तसाच गट निर्माण करण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न असल्याचा आरोप


अशोक चव्हाण यांना योग्य समज द्यावी अशी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती. एकनाथ शिंदेंनाही माहिती देणार 


युती केल्यावर हातात हात घालून चालले पाहिजे, क्लेश विसरले पाहिजेत, मात्र विधानसभेत बंडखोरी केलेल्या लोकांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होत त्यांना सहा दिवसात पक्षात घेतलं. 

रिक्षा आणि टॅक्सी रीकॅलिबरेशन साठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत

रिक्षा आणि टॅक्सी रीकॅलिबरेशन साठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत


राज्य परिवहन विभागाने त्यासाठी 700 रुपयांचे दर निश्चित केले आहेत 


1 फेब्रुवारी पासून रिक्षा आणि टॅक्सी दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे 


मात्र त्यासोबत मीटर मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, ते करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे, 


जर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मीटर मध्ये सुधारणा केली नाही तर 1 मे पासून दर दिवसाला 50 रुपये असा दंड आकारण्यात येणार आहे


मुंबई महानगर क्षेत्रात 3.5 लाख पेक्षा जास्त रिक्षा आणि टॅक्सी आहेत, या सर्वांना मीटर मध्ये नवीन दरानुसार सुधारणा करणे आवश्यक आहे

मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण पडण्याची शक्यता, एकूण 56 प्रकल्पांसाठी 1 लाख 93 हजार कोटींची देणी

मुंबई महापालिकेला महत्त्वाच्या एकूण 56 प्रकल्पांसाठी 1 लाख 93 हजार कोटींची देणी


वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रस्ते कॉंक्रिटीकरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांची मुंबई महापालिकेला देणी


यंदाच्या वर्षीच्या महापालिका बजेटमध्ये यात 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे 


मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी सध्या 82 हजार कोटींच्या जवळपास आहेत याच्या जवळपास अडीच पट मुंबई महापालिकेला विविध प्रकल्पांची देणी आहेत 


 मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे आणि प्रकल्पांच्या संख्यामुळे त्याला लागणारा खर्च आणि मुंबई महापालिकेचे उत्पन्न यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे


 उत्पन्नापेक्षा प्रकल्पांवर होणारा खर्च जास्त आहे, आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे  

अतिक्रमण काढल्याच्या रागातून तरुणानं स्वत:सह पथकावर पेट्राेल ओतलं, जळगावात खळबळ

मनपाच्या अतिक्रमन विभागाने  आपल्या घराचे अतिक्रमण काढल्याच्या रागातून  शेख सदाब या तरुणाचा स्वतःच्या सह पथकावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.


जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात मनपाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली,या मोहिमेच्या दरम्यान शेख सादाब या तरुणाच्या घराचे मनपाच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात करताच ,शेख सदाब या तरुणाने त्यास तीव्र स्वरूपाचा विरोध करत मोठा गोंधळ घातला,शेख सदाब याच्या विरोधा नंतर ही ,अतिक्रमण विभागाने कारवाई कायम ठेवल्याने, शेख सदाब याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
हे करत असताना,मनपा पथकावर देखील त्याचे पेट्रोल टाकल्याचा आरोप मनपा कर्मचारी यांनी केला आहे.
या घटने नंतर मनपा कर्मचाऱ्यांनी शेब सदाब यास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या दर्यापूरात दाखल, बांग्लादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्रावरून पुढचं पाऊल?

बांग्लादेशी / रोहिंग्यांना देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या अंजनगाव सुर्जीला..


किरीट सोमय्या पुराव्यांसह तक्रार करण्यासाठी स्वतः अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत.. 


अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात 2024 मध्ये 1484 अर्ज आले. त्या अजपैिकी एकही अर्ज फेटाळण्यात आले नाही.. मोठ्या प्रमाणात अपात्र, बांग्लादेशी लोकांना भ्रष्टरित्या, बेकायदेशीर पद्धतीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आले असा आरोप सोमय्या यांनी केला असून त्यासंदर्भात पुराव्यांसह तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या स्वतः  अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत...

नाशिकच्या सिडको परिसरात कोयत्याने तरुणावर वार

- नाशिकच्या सिडको परिसरात कोयत्याने तरुणावर वार
- हातात कोयता घेऊन तडीपार गुंडाची परिसरात दहशत

- पवन वायाळ आणि त्याच्या इतर 2/3 साथीदारवर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी फरार

- मागील भांडणाची कुरपात काढून हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय
- दहशत माजवून गुंड फरार, कोयता घेऊन दहशत माजविणारे cctv मध्ये कैद


  
- हल्ला करून परिसरात मद्यधुंद अवस्थेत  दहशत माजवण्याचा प्रयत्न


-  घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात केली होती गर्दी
- हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची केली मागणी


- विशेष म्हणजे काल याच भागात  पोलीस आपल्या दारी उपक्रम पार पडला  होता

बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला – तरुण गंभीर जखमी

बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला – तरुण गंभीर जखमी.. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..


बीड शहराच्या मोमिनपुरा भागात दिवसाढवळ्या मारहाण करतानाचा प्रकार समोर आला आहे. मोहम्मद खलील राशिद या तरुणावर नजीब खान उस्मान खान आणि खिजर खान शरीफ खान या दोघांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे


 आरोपी आणि जखमी हे एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोर रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरूनच आरोपींनी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल

मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का 


एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन यांची नियुक्ती 


गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल


याआधी परिवहन मंत्रीच एसटीचे अध्यक्ष होते, मात्र त्यात बदल करत भरत गोगावले यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती 


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची निवड झाल्यानंतर सरनाईकांच्या हाती होते स्टेअरींग 


मात्र, आता परिवहन अपर मुख्य सचिव संजीव सेठींच्या हाती एसटीची धुरा

शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता?

राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता


शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद करायच्या का यावरतीही सरकारचा विचार सुरू


वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 


जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी  अनेक योजना बंद कराव्या लागणार


आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागानिहाय बैठकामध्ये या योजना बंद करायच्या का याची ही चाचपणी सुरु


शिवभोजन थाळी बंद करू नये असं माजी मंत्री छगन भुजबळ यांच मुख्यमंत्र्यांना पत्र


शिव भोजन थाळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केली होती सुरू


मात्र लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर सरकारच्या तिजोरीवर भार वाढल्याने या योजना बंद करायच्या का याची चाचपणी राज्य सरकारकडून सुरु 


अर्थसंकल्पाच्या आधी यावरती निर्णय घेण्यासाठी सरकारच्याही हालचाली सुरू

'मिस यू भाई .. 'आरोपीच्या स्टेटसला वाढदिवसानिमित्त कृष्णा आंधळेचा फोटो

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा काल वाढदिवस होता .वाढदिवसानिमित्त वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन आरोपींनी कृष्णा आंधळे ला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवले होते .दरम्यान याचवेळी अशोक मोहिते या तरुणाला मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील बातम्या का पाहतोस ?असा जाब विचारत या दोन्ही आरोपींनी त्यास बेदम मारहाण केली होती .मारहाण करत हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत .या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे .आरोपीच्या शोधासाठी एक पथकही रवाना झाले आहे .एकीकडे कृष्णा आंधळे (Krushna Andhale) तपास यंत्रणेला सापडत नाही. दुसरीकडे त्याचं समर्थन करत कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.त्यामुळे याची दखल पोलीस प्रशासन नेमकी कशी घेते असा सवाल उपस्थित होत आहे 

पुणे शहरात अनेक ठिकाणी आज पाणीपुरवठा बंद 

पुणे शहरात अनेक ठिकाणी आज पाणीपुरवठा बंद 


 शहरातील मुख्य भागांमध्ये आज दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद 


शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी शहरात पाणीपुरवठा बंद 


तर 7 फेब्रुवारीला उशिराने येणार पाणी 


पुण्यातील कात्रज परिसर, सहकारनगर परिसर ,बिबवेवाडी आणि सातारा रस्त्यावर असणाऱ्या काही भागांमध्ये पाणी पूर्वठा बंद

10 वी-12 वीत कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली

१० व १२ वीच्या शालांत परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ दरम्यान मुंबईतील ८७१ परीक्षा केंद्रावर घेतल्या जाणार आहेत


या परीक्षांमध्ये काॅपी बहाद्दर यांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली आहे


अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून अनेक काॅपी बहद्दर हे परीक्षा केंद्रावर येत असल्याचे अनेक कारवाईतून समोर आले आहे


यात प्रामुख्याने मुन्नाभाई MBBS चित्रपटात दाखवल्या प्रमाणे ब्ल्यूटूथच्या माध्यमाचा जास्त वापर केला जात आहे


खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी आता परीक्षा केंद्राबाहेरील १०० मीटर परिसरातील  STD, ISD, टेलिफोन बुथ, फॅक्स, झेराॅक्स मोबाइल फोन, लॅपटाॅप ब्लूतूथ, इॉटरनेट प्रसार माध्यमे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत


तसेच परीक्षा केंद्रावर मोबाइल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर रेडिओ, कॅलक्यूलेटर लॅपटाॅप व इतर संपर्क साधणे परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात वापरण्यास प्रतिबंधक केले आहे

माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांच्या हस्ते गडचिरोलीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 

 माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांच्या हस्ते गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गडचिरोलीतील एमआयडीसीच्या मैदानावर भव्य असे स्टेडियम उभारण्यात आले असून 40 हजार प्रेक्षकांना बसण्याची सोय येथे करण्यात आली आहे. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीतर्फे ही लीग आयोजित करण्यात आली असून 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

काल तब्बल 17 तास चौकशी, आयकर विभागाच्या धाडीनंतर संजीवराजे निंबाळकरांनी केलं शांततेचं आवाहन

फलटण येथे काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी


आज सकाळपासून पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात


काल रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत करीत होते अधिकारी चौकशी


काल रात्री चौकशीनंतर संजीवराजे यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे केले आवाहन. 


संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांचा बंदोबस्त...

Mumbai Crime : मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्ही कर्मचार्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Mumbai Crime : मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्ही कर्मचार्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ


सुनिल पाचार (23) असे या मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे


सुनिल पाचर हा दोन दिवसापासून बोटीवरून बेपत्ता होता. बोटीवरील कर्मचार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाचार हा बोटीच्या डेकवर रात्री झोपला होता


सकाळी तो बोचीच्या डेकवर दिसून आला नाही. सर्वत्र बोटीवर शोध घेऊनही पाचार न आढळून आल्याने बोटीवरील कर्मचार्यांनी यलोगेट पोलिसात मिसिंगची तक्रार नोंदवली


नोव्हेंबर 2024 पासून पाचार या बोटीवर काम करत होता. ३ फेब्रुवारीच्या सकाळपासून तो बेपत्ता आहे


दरम्यान 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 च्या सुमारास ससून डाॅकजवळ पाचारचा मृतदेह स्थानिकांना आढळून आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला


सुनिल पाचारचा मृतदेह शवविच्छेदमासाठी सेंट जाॅर्ज रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच पाचार याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फराळ आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस? असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूर मधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचे एक पथक मागावर आहे. त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केल्या आहेत. तर आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे.

Saif Ali Khan Attack Case : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपी शरीफुल्ल इस्लामला सैफच्या घरातील दोन महिला कर्मचार्यांनी ओळखलं

Saif Ali Khan Attack Case : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपी शरीफुल्ल इस्लामला सैफच्या घरातील दोन महिला कर्मचार्यांनी ओळखले


हल्याच्या वेळी शरीफुल्लचं सैफच्या घरी आला होता. त्यानेच सैफवर हल्ला केल्याची कबूली या दोन महिला कर्मचार्यांनी दिली आहे


इलियामा फिलिप 56, जुनू अशी या दोन महिला कर्मचार्यांची नावे असून हल्याच्या रात्री या दोघी सैफच्या घरी होत्या


या प्रकरणात सीसीटिव्हीतील व्यक्ती आणि प्रत्यक्षातील व्यक्ती वेगळा असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता


यानंतर पोलिसांनी आरोपीचे फेस रेकगनाईजेशन केले त्या अहवालातूनही आरोपी शरीफ्फुल असल्याचे स्पष्ट झाले आहे


तसेच रक्त व हाताच्या ठस्यांचा अहवाल हा अद्याप आलेला नाही.


दरम्यान पुरावे आणखी भक्कम करण्यासाठी वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इलियामा व जुनू यांना आर्थररोड कारागृहात नेहले


शरीफ्फुल सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला आर्थररोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.


नुकतीच कारागृह अधिकारी यांच्या परवानगीने तहशीलदार यांच्या परवानगीने आरोपी आणि दोन साक्षीदारांची ओळख परेड झाली त्यावेळी दोघींनी त्याला पाहून हा तोच आरोपी असल्याची खात्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra 6th February Breaking News Live Updates: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहता येणार आहेत.


अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मांसाहार बंदीबाबत केलेलं वक्तव्य, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेलं आक्षेपार्ह्य वक्तव्य आणि त्यानंतर मागितलेली माफी यांसारख्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच परदेशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये संक्षिप्त स्वरुपात घेता येणार आहे...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.