Maharashtra Rain LIVE Updates: मुंबईत रेड अलर्टचा इशारा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, पालिका प्रशासनाकडून आवाहन
Maharashtra Breaking 25 th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Maharashtra Rain News : महाड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. महाड मधिल सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने बाजारपेठेतील भोई घाट परीसरात थोड्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे रात्री कोणत्याही क्षणी पावसाचा जोर वाढू शकतो या भीतीमुळे महाड शहरांतील नागरिकांनी आपली वाहणे सुरक्षित राहावी याकरिता मुंबई गोवा हायवेवर लावली आहेत त्यामुळे मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच काम रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत, २०२१ ला आलेला महापूर हा महाडकरांसाठी अजूनही डोळ्यासमोर दिसत आहे , या महापुरात अनेक वाहन वाहून गेली होती , याच भीतीपोटी महाडकरांनी ही खबरदारी घेतल्याचं पहायला मिळते आहे
Mumai Rain Latest Update : आज मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, त्याशिवाय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हे पाहता मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या पहिली ते बारावीच्या शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे.
Mumbai-Pune Express : मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
बदलापूर आणि वांगणी दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे.
मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच, शुक्रवारी सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द असतील.
Mumbai Rain : मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रात उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत
दुपारी दोन वाजून 51 मिनिटांनी समुद्रात भरतीची वेळ असून 4.64 मीटरच्या उंच लाटा या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळत आहे
त्यासोबतच ताशी 50 ते 60 किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा समुद्र किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहे
Mumbai Rain : मुंब्रा भीमनगर भागातील रस्ता खचला..
मुंब्रा बायपास जवळील खाडीमशीन भीमनगर भागातील घटना..
मुसळधार पावसामुळे रस्त्याचा एक भाग खचला...
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने धोका ट्टी लावण्यात आलेली आहे.
Raigad Rain : सावित्री नदीने केले रौद्ररूप धारण
महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
आमदार भरत गोगावले यांच्याकडून महाड शहराची पाहणी
प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले आदेश
महाड मधील नदी किनारी भाग पुराच्या विळख्यात ... शहरात ndrf ची टीम तैनात.
शहरांतील दुकानदारांची हळूहळू स्थळांतरकडे वाटचाल
Mumbai Rains : भारतीय हवामान खात्याद्वारे मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
या अनुषंगाने शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून व आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा,
असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Kalyan Rain : कल्याण मधील शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200 हून अधिक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी नागरिकांच्या स्थलांतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केले आहे, मात्र संसार उध्वस्त झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत
Thane Rain : मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर पाणी तुंबले, वाहनांचा वेग मंदावला..
ठाणे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, रस्ते जलमय झाले आहेत.
त्यामुळे कापूर बावडी, वंदना सिनेमा, बस डेपो, मानपाडा, ठाणे मार्केट, ठाणे शहरातील अनेक सखोल भागात पाणी..
Mumbai Rain : भिवंडी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक शाळांना सुट्टी
शहर व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ
ग्रामीण भागातही अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात
कामवारी नदीच्या काठी असलेल्या झोपडपट्ट्यानां प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला
असाच मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास भिवंडीत पूर येण्याची शक्यता
Mumbai Rain : भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाकडून विनंती करण्यात येते की, कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
Mumbai Rains : पश्चिम उपनगरात मागील एक तासापासून सुरू असलेल्या मुसळाधार पावसामुळे अंधेरी सबवे पाणी खाली गेला आहे...
अंधेरी सबवे खाली सहा ते सात फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
Mumbai Rains : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
सद्यस्थितीत विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ६६.७७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.
तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.
मुंबई दिनांक २५: मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाउस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत काही कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे.
पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे.
मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाउस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, माझं आपणास आवाहन आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करीत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दीपक केसरकर काय म्हणाले?
आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस होतोय, विशेषता ठाणे पालघर रायगड येथे सुट्टी जाहिर केली आहे
आज १२ वीचा पेपर होता काही विद्यार्थी पोहचू शकले नाहीत. या विद्यार्थ्यंनी काळजी करू नये त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल
जे केंद्रावर उशिरा पोहचले त्यांना ही परीक्षेत अतिरिक्त वेळ देऊन परीक्षा देता येईल
विद्यार्थ्यानी जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये
मुंबईबाबत आयुक्त निर्णय घेतात, परिस्थिती नियंत्रणात आहे.
सर्व वाॅर्ड आॅफीसर आप आपल्या कार्यालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. तिथेही प्रशासन लक्ष ठेवून आहे
Maharashtra Rain : आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस होतोय, विशेषता ठाणे पालघर रायगड येथे सुट्टी जाहिर केली आहे - दीपक केसरकर
आज 12 वीचा पेपर होता, काही विद्यार्थी पोहचू शकले नाहीत - दीपक केसरकर
या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये त्यांची पून्हा परीक्षा घेण्यात येईल - दीपक केसरकर
जे केंद्रावर उशिरा पोहचले त्यांना ही परीक्षेत अतिरिक्त वेळ देऊन परीक्षा देता येईल - दीपक केसरकर
विद्यार्थ्यानी जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये - दीपक केसरकर
मुंबईबाबत आयुक्त निर्णय घेतात, परिस्थिती नियंत्रणात आहे. - दीपक केसरकर
सर्व वाॅर्ड आॅफीसर आप आपल्या कार्यालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत- दीपक केसरकर
पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. तिथेही प्रशासन लक्ष ठेवून आहे- दीपक केसरकर
Maharashtra Rains : राज्यात पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचावकार्य व्यवस्थित सुरू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज
मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे,
मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत,
ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Mumbai Rains : मुंब्रा - शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस..
गुडघ्यापर्यंत साचलं पाणी...
काहीशा प्रमाणात वाहतूक देखील मंदावली..
Kalyan Rain : मुरबाडमध्ये रायता पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे
कल्याण नगर रस्त्यावरील रायता पुलावरून पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत असल्याने कल्याण मुरबाड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सतत पडणाऱ्या पावसाने गाव पाडे झोडपले असून कल्याण नगर रस्त्यावरील रायता पांजारपोळ नदीवरील पूल पाण्याची पातळी वाढली असून शेजारच्या गावांना अलॅट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे वाहतूक बंद करून बदलापूर टिटवाळा मागेॅ करण्यात आली आहे
Mumbai Rains : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी चार जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत
तानसा तुळशी विहार आणि मोडक सागर हे ४जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत
Mumbai Rains : कोस्टल रोड वर खाजगी वाहनांचा अपघात झालेला असल्यामुळे
पोलिसांमार्फत सकाळी 10.30 वा.पासून डाऊन दिशेत रस्ता बंद केलेला आहे.
त्यामुळे बस मार्ग A- 78 हा ब्रिच कँडी रुग्णालय, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ व तिथून पुढे बसमार्ग 123 ने मरीन ड्राइव्ह असा प्रवर्तीत करण्यात आहे
Vasai Rains : पालघर जिल्ह्यातील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेज ही आल्या आहेत.
सध्या भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तसेच पालघर जिल्ह्यात सध्यस्थितीमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिका-यांनी हा आदेश काढला आहे.
या आदेशान्वये पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार शहरातील सर्व खाजगी, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा आणि कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली आहे.
सकाळी भरलेल्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना सुट्टी देवून, तात्काळ घरी सोडण्यात याव्यात तर दुपार सत्रात भरणाऱ्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घेतला आहे.
Mumbai Rains : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक-सागर तलाव
हा तलाव आज सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
यंदाच्या मोसमातील भरून वाहू लागलेला मोडक-सागर तलाव हा चौथा तलाव आहे.
या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे
Palghar Rain : पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी .
जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुट्टी .
तर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारून सुट्टी जाहीर केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी .
एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळे आदेश काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम .
Mumbai Rains : मीरा भाईंदरमध्ये ही पावसाने जोरदार इनिंग सुरु केली आहे.
शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
मीरा भाईंदर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार कोसळत आहे.
तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी ही बरसत आहे.
मिरा भाईंदरमध्ये आज ॲारेंज अलर्ट आहे.
त्यामुळे दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरात ढगाळ वातावरण आहे.
Mumbai Rains : मुंबईचा पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली अंधेरी पंप हाऊस जवळ MMRDA कडून बनवण्यात आलेल्या नवीन सबवे पाणी खाली गेला आहे.
पंप हाऊस सबवे मध्ये एक ते दीड फूट पाणी भरल्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.....
Mumbai Rains : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला राज्यातील पावसाचा आढावा
पूर सदृश्य भागात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा
सर्व लोकप्रतिनिधींना परिसरातील नागरिकांना मदत करण्याचे आदेश
कुठल्याही मदतीसाठी लगेच संपर्क साधा, फडणवीसांच्या लोकप्रतिनिधींना सूचना
Mumbai Rains : कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल ते चौक दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले
पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे
मुंबईकडे येणारी प्रगती एक्सप्रेस सध्या थांबली असून या एक्सप्रेसला पुन्हा कर्जतला आणून मग कल्याण मार्गे मुंबईकडे आणण्यात येणार आहे,
Mumbai Rains : कल्याण अहमदनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद, उल्हास नदीने इशाराची पातळी गाठली
कल्याण उल्हास नदीने इशाराची पातळी गाठली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तहसीलदार यांच्याकडून नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हा पाऊस असाच कोसळत राहिला तर नदी धोकादायक पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही कल्याण अहमदनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
Thane Rain : ठाण्यात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग
शाळेतील विद्यार्थ्यांना ये जा करण्याची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली आहे .
तर सकाळ सत्रात विद्यार्थी शाळेत आले असतील तर त्यांना सुरक्षित घरी पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना
इ. १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Mumbai Rains : बोरिवलीहून वांद्राच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी
वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे.
पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे.
अशातच या पावसाचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकी सोबतच रस्ते वाहतुकीवर देखील झाला आहे.
बोरिवलीहून वांद्रे च्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मालाड,जोगेश्वरी,गोरेगाव,अंधेरी विलेपार्ले आणि सांताक्रुज पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली असून यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास देखील उशीर होत आहे.
सकाळची वेळ असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामावर पोहोचण्यासाठी लगबग करत आहे मात्र वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना कामावर पोचण्यास विलंब होत आहे.
Mumbai Rain : मुंबई सह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी मालाड गोरेगाव कांदिवली दहिसर विलेपार्ला सांताक्रुझ वांद्रे या परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे...
Raigad Rain : रायगडात महापूर, नागोठण्यात अंबा नदीचे शिरले पुराचे पाणी
संपूर्ण नागोठणे शहराला आंबा नदीचा विळखा
जिल्हा प्रशासन नागोठणे शहर अलर्ट मोडवर
शहरातील मुख्य बाजारपेठ देखील पाण्याखाली
Pune Rain : रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे.
त्यामुळें किमान सहा ते आठ तास रस्ता सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागण्याची शक्यता सबंधित विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
ताम्हिणी घाटातील माणगाव हद्दीत रस्त्यावर आलेली माती जेसीबी द्वारे बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
तर दूसरीकडे पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. - तहसीलदार माणगाव-
Konkan Rain : खेड मधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वर
जगबुडी आणि नारंगी नदीला पुन्हा पूर.
सलग सहा वेळा जगबुडी नदी धोक्याच्या पातळी वरून वाहत असल्याने खेड मधील जनजीवन विस्कळित.
पुराचा वाहतुकीवर देखील होतोय परिणाम. शाळकरी मुलांचे पावसामुळे नुकसान
Thane Rain : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर
आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन,
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील वरिल तालुक्यातील अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर
मुंबई विद्यापीठाच्या आज ( गुरवार) दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या फक्त या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
Palghar Rain : पालघरच्या वाडा विक्रमगड भागात आज मुसळधार पावसाची शक्यता . वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळांनी महाविद्यालयांना सुट्टी जाहीर . जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून दोन्ही तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर . वाडा विक्रमगड परिसरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज .
Kalyan Dombivali Rain : उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली,
जांभूळ पाडा इथे धोक्याची पातळी ओलांडली
धोक्याच्या पातळीच्या वर 1 मीटर वरून वाहत आहे उल्हास नदी
नदीच्या आसपास असणाऱ्या सर्व गावांना, शहरांना सतर्क राहण्याचे आवाहन
सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर होण्याची शक्यता
Mumbai Rain : पश्चिम रेल्वेच्या विरार ते चर्चगेट लोकल सेवा पाच ते दहा मिनिटांनी उशिराने धावत आहे.
त्यामुळे विरार रेल्वे स्थानकात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तोबा गर्दी झाली आहे.
रात्री पासून वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्याचा फटका आता रेल्वे प्रवाशांना ही बसला आहे.
Rain Update : कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस
धरणात प्रतिसेकंदाला 75 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक
धरणातील आवक पहाता कोयना धरणाचे दरवाजे आज उघडणार
आज 4 वाजता दिड फुटाने दरवाजे उघडणार
10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार कोयना नदीपात्रात
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणात 75,26 टीएमसी पाणी साठा
गेल्या 24 तासात कोयना धरण क्षेत्रात 237 मिलिमीटर पाऊस झाला तर महाबळेश्वर परिसरात 307 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 1020 क्युसेक्सने पाण्याचा विसार्ग सुरू आहे. आज 4 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दिड फुटाने उघडणार
Pune Rain : तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू
-पुलाची वाडी परिसरातील घटना
-अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेले असला लागला शॉक
तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जी येथे काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले असता त्यांना विजेचा शॉक लागल्याने तीन जणांना पहाटे पाच वाजता या तिघांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Nashik Rain : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
साडे आठ वाजता 8 हजार 811 कुसेक्स ने पाणी सोडण्यात येणार आहे.
-
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ही तुडुंब भरले
-
नांदूरमध्यमेशवर मधून ही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला
सकाळी 7 वाजल्यापासून 5 हजात 576 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू
-
गंगापूर ,मुकणे धरणांच्या पाणीपातळीत ही झाली वाढ
Pune Rain : पुण्यातील पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संबंधित उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
पुढील 48 तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले आहेत.
Kalyan Dombivali Rain : कालपासून कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहेत
कल्याण स्टेशनजवळ असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहन तळासमोर वाहन काळासमोर पाऊसकाळा सुरू झाल्यापासून
या परिसरात गुडघाभर पाणी साचत आहे
या परिसरात पाणी साचण्याचे कारण माझाने शोधले होते
आता पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे, हे नाले फक्त शो साठी आहेत, हे नाले कुठल्याही मुख्य नाल्याला जोडले नसल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही
Rain Update : उजनी धरण उद्या संध्याकाळी शून्य पातळी ओलांडण्याची शक्यता ..
पारगाव मध्ये 68000 क्युसेक विसर्गणे पाणी येत असून पुण्यात जोरदार पावूस सुरु असल्याने वरच्या धरणातूनही पाणी सोडणे सुरू झाले ..
आज उजनीत सकाळी 47000 क्यूसेक विसर्गाने पाणी येत असून थोड्या वेळात हा विसर्ग वाढेल ..
उजनी धरणाच्या मृत साठ्यात 63 टीएमसी साठवण क्षमता असून जिवंत साठा 53 टीएमसी पाणी क्षमता आहे ..
सध्या उजनी धारण वजा 14 टक्के एवढे असून सध्याची स्थिती पाहता उद्या संध्यकाळी पर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात येण्याची शक्यता
Navi Mumbai Rain L नवी मुंबई, पनवेलमध्ये रात्रभरापासून पाऊस पडत आहे
संततधार पाऊस लागून राहिला आहे.
मात्र मुसळधार पाईस पडत नसल्याने सकल भागात अजून पाणी साचलेले नाही.
सध्या संपूर्ण ढगाळ वातावरण आहे
Kolhapur Rain : कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाला तिन्ही बाजूनं वेढलं
चिखली गावाला जाणाऱ्या मार्गावर आले पाणी
गावातील बहुतांश ग्रामस्थ नवीन चिखली इथं स्थलांतर
Vasai Virar Rain : वसई विरार नालासोपारा परिसरात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी लावली आहे.
सकाळी देखील पावसाची संततधार सुरु आहे.
त्यामुळे सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलं असून,
वाहनचालक, चाकरमनी आणि शाळकरी मुलांची चांगळीच तारांबळ उडाली होती.
नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशन परीसर, तुळींज, विजय नगर, शिर्डी नगर, गाला नगर, आचोळे रोड, विरार पश्चिमेचा ओल्ड विवा कॉलेज रस्ता हे सर्व सखल
भागातूल रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
Mumbai Rain : संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्त्वाचा असणारा विहार तलाव आज मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे.
Kolhapur Rain : कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली
पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटावर पोहचली
जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली
कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी केला बंद
Mumbai Rain : मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सुरू मात्र उशिराने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने
हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने आहेत
तसेच पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 मिनिटे उशिराने धावत आहेत
जोरदार पाऊस असल्याने गाड्यांचा वेग मंदावला असून कर्जत कसारा इथून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस जास्त उशिराने आहेत
Pune Rain : पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे
जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश
खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Pune Rain : पवना नदी दुथडी वाहू लागल्यानं पात्र सोडून पाणी वाहत आहे.
याच नदी लगत वसलेलं पिंपरी चिंचवडमधील मोरया गणपती मंदिर परिसरात पाणी शिरले आहे.
हे पाहता आणि पावसाचा जोर ही कायम असल्याचं पाहून नदी लगतच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Rain : मांजरा धरण जिवंत पाणी साठ्याच्या वर..
आठवडाभरातील रिमझिम पाऊस आला तर मांजरा धरणाला चांगली पाणी आले
आणि म्हणून पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यानंतर सुद्धा हे धरण मृतसाठ्यातच होते
आज अखेर मांजरा धरणाने जिवंत पाणी साठ्याची पातळी ओलांडली आहे..
642 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या मांजरा धरणात 47 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा..
Pune Rain : सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये लोक अडकले.
पाण्याची पातळी वाढत चाललीय
पावसाचा जोर देखील कायम आहे.
त्यामुळे बहुमजली इमारतींच्या बेसमेंट मधे पाणी शिरल्याने लोक फ्लॅट मधे अडकले.
Kolhapur Rain : कोल्हापुरात राधानगरी धरण 100% भरलं,
कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता
स्वयंचलित दरवाजामधून भोगावती नदी पात्रात विसर्ग होऊ शकतो
एका स्वयंचलित दरवाजा मधून सुमारे 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होतो
Mumbai Rain : मुंबईत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल काही संपेनात
मध्य रेल्वे आज १५ ते २० मिनिटे उशिरा , तांत्रिक अडचणी आणि पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकलवर परिणाम
पश्चिम रेल्वे ५ ते १० मि उशिरा
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या नशीबी रोजच उशिर
हार्बर लाईन ५ मि उशिरा
Satara Rain : वीर धरणातून नीरा नदीत दुपारी चार वाजता एक हजार क्युसेकने पाणी सोडणार
वीर धरण सकाळी ६ वाजता ८५.५५ टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस असल्याने
नीरा नदीपात्राशेजारील गावातील नागरिकांनी दक्षता बाळगावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग,फलटण
वीर धरणातून नीरा नदीत दुपारी चार वाजता एक हजार क्युसेकने पाणी सोडणार
Kalyan Dombivali Rain : कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या परिसरात पावसाची संततधार सुरूच
काल पहाटे पासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात साचले
मध्यरात्रीपासून कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू पावसाचा जोर कायम
Pune Rain : मुळशी ताम्हणी घाट येथे मुसळदार पाऊस मुळे दरड कोसळलेली आहे रस्ता बंद आहे
पोलिस अधिकारी स्टाफ , तहसीलदार साहेब , प्रांत अधिकारी यांनी भेट दिली असून दरड काढण्याचे काम चालू आहे
ताम्हिणी घाटात दरड कोसळली. पुणे - कोलाड महामार्ग बंद
Pune Rain : लोणावळ्यात ही रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला. 24 तासांत 370 मिमी पावसाची नोंद, पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं आवाहन
पर्यटननगरी लोणावळ्यात ही रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.
गेल्या चोवीस तासांत इथं 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे.
पावसाचा वाढता जोर पाहता, पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं, आवाहन प्रशासनाने केलेलं आहे.
गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस बरसत आहे.
काल सुद्धा तब्बल 274 मिलीमीटर पाऊस कोसळला होता.
आज ही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे.
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर आहे...
कारण पुढच्या कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठू शकते...
रात्रभर नदीची पाणी पातळी स्थिर असली तरी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे...
सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 11 इंच इतकी आहे...
आणखी एक इंच पाणी वाढल्यास पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली असं आपण म्हणू शकतो...
त्यातच राधानगरी धरण 98 टक्के भरलं आहे...
त्यामुळे राधानगरी धरण 100 टक्के भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात... त्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होणार...
त्यामुळे या नदीच्या काठावरील ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Pune Rain - उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला
- जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
- नद्या ,ओढे ,नाले तुडुंब भरून वाहत आहेत
Mumbai Rain : मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
मुंबईत पहाटेपासूनच पावसाची हजेरी
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
Konkan Rain : खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली पुन्हा धोक्याची पातळी.
पुराचे पाणी खेड मार्केट मध्ये.
खेड नगर परिषदेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
पावसाचा जोर वाढू लागल्याने शहरवासीयांना चिंता.
खेड प्रशासन अलर्ट मोड वर.
Dhule Rain : धुळे शहरासह जिल्ह्यात रात्रभर पावसाची हजेरी लागली
मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने आज धुळे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून आता पावसाने विश्रांती घेतली आहे
Raigad Rain : सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी
महाड शहरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा
महाड नगरपरिषदे कडून शहराला धोक्याची घंटा
पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्रीला पूर येण्याची शक्यता
Pune Rain : पवना धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस, रात्रीत तब्बल 374 मिमी पाऊस कोसळला, धरणात थेट 10 टक्के पाणी साठ्यात वाढ.
पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.
गेल्या बारा तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
पावसाने अशी तुफान बॅटिंग केल्यानं धरणाच्या पाणी साठ्यात ही अवघ्या बारा तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे.
काल सायंकाळी 5 वाजता धरणाचा पाणी साठा 57.70 टक्के इतका होता, तो आता 67.80 टक्के झालाय.
गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.
Pune Rain : पावसाच्या प्रमाणानुसार खडकवासला धरणातून विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता.
शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी. संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
शितळा देवी मंदिर डेक्कन.
संगम पूल पुलासमोरील वस्ती
कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
होळकर पूल परिसर
पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी.
कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे.
Pune Rain : हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे
Vasai : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरण पूर्ण भरले आहे.
धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले असून 20999.94 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा पालधर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Pune Rain : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 27203 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 6:00 वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे
अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलीय.
पाऊस असाच सुरू राहीला तर आणखी पाणी सोडण्यात येणार. ३५६७५ ने क्युसेक्सने विसर्ग करण्यात येणार... अजुनही जोरदार पाऊस सुरू आहे.
Pune Rain : पुण्यात रात्रभर तुफान पाऊस.....
या पावसामुळे खडकवासला धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्ग जो संध्याकाळी 9 हजार क्युसेक्स होता तो वाढवत नेऊन पहाटे पर्यंत 27 हजार क्युसेक्स करण्यात आला.
त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसाट्यांमधे पाणी शिरलंय.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या पावसामुळे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झालाय....
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking 25th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
पुण्यात रात्र भर तुफान पाऊस..... या पावसामुळे खडकवासला धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्ग जो संध्याकाळी 9 हजार क्युसेक्ह होता तो वाढवत नेऊन पहाटे पर्यंत 26 हजार क्युसेक्स करण्यात आला. त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसाट्यांमधे पाणी शिरलेय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या पावसामुळे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झालाय....
मुंबई पूर्व उपनगरात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर दृश्यमानता अत्यंत कमी आहे. हीच परिस्थिती नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली मध्ये आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -