एक्स्प्लोर

Soni Murder Case : भंडाऱ्याच्या सोनी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप, लेकीला अश्रू आनावर, म्हणाली...

Soni Murder Case: भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 2014 मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर नऊ वर्षांनंतर निकाल लागल .  सातही आरोपींना  जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

भंडरा:  भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा (Soni Murder Case) आज अंतिम निकाल लागला. महाराष्ट्राला हादरवून सोडणारं  सोनी हत्याकांड प्रकरणातील सातही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 2014 मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर 9 वर्षांनंतर निकाल लागल .  सातही आरोपींना  जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला. कोर्टाने निकाल जाहीर करताच  आई- वडील आणि लहान भावाच्या आठवणीनं मुलीला अश्रू आवरता आले नाही. 

हे हत्याकांड 26 फेब्रुवारी 2014 रोजी झालं.  तुमसर येथील सोने-चांदी आणि हिऱ्याचे व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पूनम आणि बारा वर्षीय मुलगा धृमील यांची निर्घृणपणे हत्या करून घरातील तिजोरीतील सुमारे पाच कोटींच्या दागिन्यांसह आरोपीनं पोबारा केला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला. विश्वासू चालकानेच सोनी कुटुंबाचा घात केल्याचं सिद्ध झालं. या प्रकरणी 275 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं. तर 800 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं आणि पाच वर्ष हा खटला चालला

कोर्टात सुनवणी सुरू होताच मुलगी हिरणला भावनांचा इतका वेळ रोखून ठेवलेला बांध हळूहळू फुटायला लागला होता. न्यायाधीशांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताच  मुलीला अश्रू अनावर झाले हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले. विशेष म्हणजे, या तिहेरी हत्याकांडात ज्या निरागस धृमीलची हत्या झाली, त्याचा आज जन्मदिवस आहे. मृतक लहान भावाच्या जन्मदिवसीच न्यायालयाचा निकाल आल्यानं आई - वडिलांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळाले असावे, अशी प्रतिक्रिया या मृतक संजय आणि पुनम यांची मुलगी हिरण हिनं दिली.

 तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संजय सोनी (42), त्यांची पत्नी पूनम सोनी (40) बारा वर्षीय मुलगा धृमिल सोनी यांची अत्यंत निर्घृणपणे त्यांचा चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यानं हत्या केली होती. या हत्याकांडानंतर आरोपींनी सोनी यांच्या घरातील आजच्या बाजार भावानुसार सुमारे पाच कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले होते. 26 फेब्रुवारी 2024 ला संजय सोनी हे त्यांच्या चालकासह वाहनाने गोंदिया येथे सोने आणि चांदी खरेदी आणि विक्रीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाट्यावर चालकाने संजय सोनी यांचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर वाहनामध्ये मृतदेह टाकून चालक घरी पोहोचला. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने सुनी यांची पत्नी पूनम आणि मुलगा धृमील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून दागिने पळविले होते.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 MVA: मविआचं विधानपरिषदेचं जागावाटप पूर्ण, ठाकरे गट 6, शरद पवार गट 3, काँग्रेस कोणत्या 8 जागांवर लढणार?
मविआचं विधानपरिषदेचं जागावाटप पूर्ण, ठाकरे गट 6, शरद पवार गट 3, काँग्रेस कोणत्या 8 जागांवर लढणार?
Maharashtra News Live Updates: प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अहिल्यानगर परिषदेची जागा दिली जाणार असल्याची माहिती
Maharashtra News Live Updates: प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अहिल्यानगर परिषदेची जागा दिली जाणार असल्याची माहिती
Pimpri Crime liquor poisoning: पोलिसांकडे वारंवार तक्रारी, मात्र हप्ते मिळत असल्याने केवळ नावाला कारवाई; पुण्यातील दारुकांड प्रकरणी स्थानिकांचा गंभीर आरोप
पोलिसांकडे वारंवार तक्रारी, मात्र हप्ते मिळत असल्याने केवळ नावाला कारवाई; पुण्यातील दारुकांड प्रकरणी स्थानिकांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यानांही लक्ष घालण्याची विनंती
मोठी बातमी: शरद पवारांचा फोन आला अन्...; पुणे विधान परिषदेसाठी या नावावर शिक्कामोर्तब! आत भरणार उमेदवारी अर्ज
शरद पवारांचा फोन आला अन्...; पुणे विधान परिषदेसाठी या नावावर शिक्कामोर्तब! आत भरणार उमेदवारी अर्ज

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Crime liquor poisoning: पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
RBI : रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: 'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा डाऊनफॉल, दु:ख विसरण्यासाठी हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकासोबत रोमँटिक डेटवर, शर्टलेस PHOTOs शेअर
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा डाऊनफॉल, दु:ख विसरण्यासाठी हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकासोबत रोमँटिक डेटवर, शर्टलेस PHOTOs शेअर
Gold Silver Rate : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का, दोन दिवसांच्या घसरणीनंतर दर भडकले, सोनं 4 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी महागली
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का, सोनं 4 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी महागली, जाणून घ्या नवे दर
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
Embed widget