एक्स्प्लोर

Beed : विजेचा करंट लागून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

घराच्या अंगणात मुलांसोबत खेळण्यात दंग असलेल्या आदेशाचा अचानक पत्र्याच्या शेडला हात लागला. त्या पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरला होता, पण हे कळण्याअगोदरच आदेश जागीच कोसळला.

बीड : लहान मुलासोबत खेळत असताना एका आठ वर्षांच्या बालकाचा पत्र्याच्या शेडला हात लागला आणि करंट लागून त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गोळेगाव तांडा येथे घडली. आदेश राठोड बालकाचे नाव आहे. घराच्या अंगणात मुलांसोबत खेळण्यात दंग असलेल्या आदेशाचा अचानक पत्र्याच्या शेडला हात लागला. त्या पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरला होता, पण हे कळण्याअगोदरच आदेश जागीच कोसळला.

आदेश राठोड हा गोळेगाव तांडा येथे राहतो त्याचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत आणि ते ऊस तोडणीच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले आहेत. आदेश आणि त्याचा भाऊ हे आजी आजोबा यांच्याकडे शालेय शिक्षण घेण्यासाठी ते राहत होते.

सकाळी इतर मुले खेळत असताना आदेशचा हात अचानक त्यांच्या पत्र्याच्या शेडला लागला आणि आदेश राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे. आजूबाजूचे लोक त्या वेळेस धावत आले, पण नेमके काय झाले हेच कुणाला कळले नाही आणि क्षणार्धात आदेश खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही. दरम्यान आई वडील आल्यानंतर उशिरा आदेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

ऊसतोड कामगारांची मुलं हे आजी-आजोबांच्या ताब्यात
बीड जिल्ह्यातील बहुतांश लोक ऊस तोडणी करण्यासाठी परराज्यात आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात दरवर्षी जात असतात. म्हणजे वर्षातील किमान चार ते सहा महिने हे ऊस तोड मजूर  आपल्या मुलांपासून घरापासून दूर ऊसाच्या फडावर राहतात. या दरम्यान यातील बहुतांश ऊसतोड कामगारांची मुलं ही त्यांच्या आजी-आजोबांसोबत गावी राहतात आणि त्यामुळे वयस्कर आजी-आजोबा या लहान मुलांचे संगोपन करतात. आदेश आणि त्याचा भाऊ सुद्धा आजी-आजोबांकडे राहायचे

पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरला
आदेश इतर मुलासोबत खेळत असताना त्याचा हात पत्र्याच्या शेड लागला, पण त्या पत्र्याच्या शेडमध्ये करंट आहे याची कल्पना तिथे कोणालाच नव्हती. त्यामुळे अचानक पत्र्याच्या शेडमध्ये करंट कसा उतरला हे कळू शकले नाही. करंट लागून आदेश जमिनीवर कोसळल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण विजेचा धक्का इतका जोरात बसला होता की आदेश पुन्हा जागेवरुन उठू शकला नाही.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget