Beed News : माजलगावच्या पोलीस स्टेशन मध्ये डीवायएसपी, हवालदारांत चांगलीच जुंपली, यानंतर हवालदाराने पोलीस अधिकाऱ्यावर अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे, नेमके प्रकरण काय?
अनेकांची वाट लावली, आता तुझी पण वाट लावतो, डीवायएसपींवर शिवीगाळ केल्याचा आरोपमाजलगाव ग्रामीण ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये हे पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी हवालदार एस.एच.राठोड हे शनिवारी दुपारी कर्तव्यावर होते. त्यांनी राठोड यांना ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत, तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले, असे विचारले. राठोड यांनी अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी, तर काही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे सांगितले. परंतु, जायभाये यांना असमाधानकारक उत्तर वाटल्याने त्यांनी येथील सिमेंट बाकडे तोडण्याचे फर्मान काढले तसेच शिवीगाळही केली.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, कारवाईकडे लक्षहवालदार राठोड यांना तर सर्वांसमक्ष आई-बहिणीवर शिवीगाळ करत सिमेंटचे बेंच तोड म्हणू लागले. माझा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगताच तुझा दुसरा पायही फ्रॅक्चर करून टाकीन. तुला सस्पेंड करीन, मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावली, आता तुझी पण वाट लावतो, असे म्हणत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आता जायभाये चांगलीच अडचणीत सापडले असून यात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आल्याचे समजते.
इतर महत्वाच्या बातम्या
New Army Chief : भारतीय लष्कराला लाभले पाठोपाठ दोन मराठमोळे लष्करप्रमुख! देशाचे पुढील लष्करप्रमुखही मराठीच, जाणून घ्या
Beed News : पाटोद्यात गावकऱ्यांकडून सर्वधर्म समभावतेचा संदेश, अखंड हरिनाम सप्ताहातच मुस्लिम बांधवांसाठी पंगत
NPC Recruitment 2022 : सरकारी नोकरी हवीये? प्रति माह 25 ते 50 हजार कमावण्याची संधी, बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक
Coronavirus : दिल्लीमध्ये कोरोनाचा आलेख वाढताच, नव्या रुग्णांची संख्या 500 पार