Corona in Delhi : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना संसर्गात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 501 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच, कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 7.79 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे हा संसर्ग दर आज जानेवारीनंतर सर्वाधिक नोंदला गेला आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1729 आहे. ही मार्चनंतरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत कोरोना संसर्गामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या राजधानीत 1729 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच रुग्णांमध्ये वाढ झाल्याने, होम क्वारंटाईनची संख्या देखील वाढली आहे.


महाराष्ट्रातही रुग्ण वाढ सुरुच
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 59 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 78 लाख 75 हजार 904 वर पोहोचली. तर, दिल्लीत गेल्या 24 तासांत 501 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये 290 बरे झाले असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.


रविवारी 147 रुग्णांची नोंद
कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी 127 प्रकरणे नोंदवली गेली. राज्यात कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 77 लाख 27 हजार 443 लोक बरे झाले असून 634 रुग्ण उपचार घेत आहेत. सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, वाशीम, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही. मुंबईत सोमवारी 43 नवीन रुग्ण आढळले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha