New Army Chief : भारतीय लष्कराला एका पाठोपाठ एक दोन मराठमोळे लष्करप्रमुख लाभले आहेत. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हे देखील मराठमोळे असून ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आणखी एका मराठी लेफ्टनंट जनरल यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपविण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt gen Manoj Pande) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Chief of the Army) असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे.


देशाचे नवे लष्करप्रमुख असणार मराठमोळे मनोज पांडे


30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपविण्यात येणार आहे. नरवणे यांचा 28 महिन्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्कराचे उपप्रमुख आहेत. जनरल एमएम नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पहिले अभियंता असतील जे भारतीय लष्कराची कमान सांभाळतील. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आधी इस्टन कमांडचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ पदही भूषवले आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळवलं आहे.


पाठोपाठ दोन मराठी लष्करप्रमुख
मनोज पांडे यांचा नागपुरचा जन्म असून त्यांचे वडील सी जी पांडे हे नागपूर विद्यापीठात consulting सायकोथरपिस्ट आणि एच ओ डी सायकॉलॉजी होते. आई प्रेमा पांडे आकाशवाणीच्या अनाऊंसर होत्या. त्यांना एक लहान भाऊ आहे, त्यांचे नाव कर्नल संकेत पांडे असून ते परिवारासह पुण्यात राहतात, आणखी एक धाकटे भाऊ नागपुरात राहत होते, पण आता ते सध्या आफ्रिकेला राहतात.


 






अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांची निवृत्ती

गेल्या तीन महिन्यांत काही उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर पांडे हे संरक्षण क्षेत्रात सर्वात ज्येष्ठ अधिकारी बनले आहेत. आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला 31 मार्च रोजी निवृत्त झाले. अन्य काही ज्येष्ठ जानेवारीअखेर निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी 31 जानेवारीला निवृत्त झाले.


ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय


लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर 1982 मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरले (यूके) पदवीधर आहे आणि त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभागी झाले होते.


संबंधित बातम्या


New Army Chief: लेफ्टनंट जनरल 'मनोज पांडे' असतील देशाचे पुढील लष्करप्रमुख