Beed : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे  (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला (Vaidyanath Sahkari Sugar Factory) कर्मचाऱ्यांचा 61 लाख 47 हजार रुपये थकीत पीएफ (Provident Fund) न भरल्याने शुक्रवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागच्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्याने ही नोटीस देण्यात आली आहे.


 


यापूर्वी जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस


काही दिवसापूर्वी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने 19 कोटी रुपयांच्या साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस दिली होती. त्यानंतर आता बंद असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्याने जीएसटी कार्यालयानंतर पीएफ कार्यालयाने सुद्धा नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मागच्या अनेक महिन्यापासून पाण्याची कमतरता दुष्काळी या सोबतच वेगवेगळ्या कारणाने बंद आहे. त्यामुळे या सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम ही कार्यालयात अद्यापही भरण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास 19 कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकचळवळीतून 19 कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता.


 


पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का 


मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारला होता. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला होता. त्यांच्या नंतर आता या साखर कारखान्याचे अध्यक्ष या पंकजा मुंडे आहेत. मात्र, मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले. त्यापैकी युनियन बँक ऑफ इंडियाचे देखील 203 कोटी 69 लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता बँकेने नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 


 


कर्जाच्या ओझ्याखाली कारखाना


हा कारखाना व्यवस्थापनातील काही त्रुटींमुळे कर्जाच्या ओझ्याखाली आहे. विविध बँकांचे कारखान्यावर मोठे कर्ज आहे. समर्थकांकडून जीएसटी रकमेसाठी वर्गणी केली जात असली तरी कारखान्यावर इतर बँकांच्या थकलेल्या कर्जाची फेड कशी करायची, असा प्रश्न आहे. कारखान्याला केंद्र सरकारची मदतही मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास 19 कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकचळवळीतून 19 कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता.


 


 


हेही वाचा>>>


7th Pay Commission: EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक 'गुड न्यूज'