पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील नराधम(Pcmc News) संस्था चालकाच्या निवासी शाळेवर आज हातोडा पडला. नराधम नौशाद शेखने क्रिएटिव्ह ऍकॅडमीमध्ये अनधिकृत बांधकाम केलं होतं. ते बांधकाम आज महापालिकेने हटवले. मात्र भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ही निवासी शाळा जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने अद्याप कारवाई झालेली नाही.


नौशाद शेखने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं आणि त्यांना धमकावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुरुवातीला त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर आणखी चार मुलींनी गुन्हे दाखल केलेत. क्रिएटिव्ह अकॅडमी अर्थात निवासी शाळेतच त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. 2014 मध्ये ही नौशाद शेखवर असाच एक गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यातून तो बाहेर पडला होता. तरी तो काही सुधारला नाहीच. त्याची ही मस्ती जिरवण्यासाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी नराधम नौशाद शेखची संस्था जमीनदोस्त करावी अशी मागणी केली होती. त्याअनुषंगाने आज क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर हातोडा चालवण्यात आला. पण अद्याप भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनुसार निवासी शाळा जमीनदोस्त मात्र करण्यात आलेली नाही.


नेमकं काय आहे प्रकरण?


2 फेब्रुवारीला क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख  (Naushad Sheikh)याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी नौशाद याला अटक करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी ही निवासी शाळा चालवतो. 2021 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन लाख 26 हजार रुपये मोजले होते. मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नौशाद शेख राहायचा. पीडित मुलगी 14 वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले. 2022 मध्ये फ्लॅटवर बोलवून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शेख याला प्रतिकार केला. त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली. 


लैंगिक अत्याचारप्रकरणी नौशाद शेख याला याआधीही अटक झाली होती. 10 वर्षांपूर्वी पोलिसांनी त्याला बेठ्या ठोकल्या होत्या. शेखविरोधातील अॅकॅडमीतील एका विद्यार्थीनीने 30 ऑक्टोबर 2014 रोजी लौंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्यावेळी शेख फरार झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी शेख याला बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा शेख याला अटक कऱण्यात आली आहे.


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar on Baramati : तेव्हा अजितदादा म्हणाले 'वरिष्ठ' भावनिक करतील आता तेच दादा म्हणतात, बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये!