Beed Accident : वडिलांच्या मृत्यूनंतर क्रियाकर्म आटोपून येत असताना अंबाजोगाईकडे येत असलेल्या रिक्षाला एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तीन प्रवासी व रिक्षाचालकासह चौघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.


अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात; चार ठार, पाच पेक्षा जास्त जखमी


केज येथील धारूर रोड जवळील भवानी माळ वस्तीवर राहत असलेले नागरिक हे चरणसिंग गोके यांच्या अंत्यविधीनंतरच्या क्रियाकर्मचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अंबाजोगाईकडे रिक्षा क्र. (एम एच-23/ एक्स-5229) जात असताना चंदनसावरगाव ते होळच्या दरम्यान होळ शिवारातील गोसाव्याचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या परिसरात अंबाजोगाई कडून येणाऱ्या एका भरधाव वेगतील इनोव्हा गाडीने क्र. (एम एच 16/सी एन-700) या गाडीने जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की, रिक्षाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले.


जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू


दरम्यान, रिक्षातील मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके, प्रिया दीपकसिंग गोके, वीरसिंग दीपकसिंग गोके (रा. केज) आणि रिक्षाचालक बालाजी मुंडे (रा. पिसेगाव) हे चारजण जागीच ठार झाले तर हरजितसिंग बादलसिंग टाक, चंदाबाई बादलसिंग टाक, मालासिंग दुर्गासिंग (रा. जालना) दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, गोविंदसिंग मच्छिंद्रसिंग गोके (रा. भवानी नगर) केज हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.


संबंधित बातम्या


Nashik Major Accident : नाशिक येथील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भीषण अपघात, सहा जण जागीच ठार


Accident: उत्तराखंडमधील अपघातात औरंगाबादच्या महिला डॉक्टराचा मृत्यू; जखमींमध्ये बहुतांश प्रवासी...


काळ आला होता पण वेळ नाही... कसारा घाटात भीषण अपघात, कंटनेरमध्ये अडकलेल्या चालकाची 40 मिनिटानी सुटका


Sangli Crime : सांगली जिल्ह्यात हत्यांची मालिका; एका आठवड्यात 5 हत्यांच्या घटनांनी खळबळ