Kasara Ghat  Accident : नवीन कसारा घाटात नाशिकहून मुबंईकडे जाण्यासाठी घाट उतरत  असताना  कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.  कंटेनर  घाटातील लतिफवाडीच्या वळणावर पलटी झाल. रविवारी सकाळी हा घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाचे प्राण वाचवले. 


चालक अपघातग्रस्त कंटेनरमध्ये अडकल्याची  माहिती  माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलिस  कर्मचाऱ्यांसह क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला वाचवण्यात यश मिळाले. मात्र  अपघातात चालकाच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे  पाय निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.रवींद्र सिंग असे चालकाचं नाव असून तो गोरखपूरला राहणारा आहे. तर क्लीनर अमित कुमार शुक्ला हा  किरकोळ जखमी झाला आहे. 


रविवारी सकाळी 10  वाजून 15 मिनीटांनी कसारा घाट महामार्ग पोलिस केंद्रचे अधिकारी वालझडे यांनी आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ यांच्याशी संपर्क करून  नवीन घाटात शेवटच्या वळणावर  MH 04 JK 0315 क्रमांकाचा  कंटेनर अचानक पलटी झाला आहे.  त्यात चालक गंभीर जखमी असून तो कंटेनरमध्ये अडकला असून टीमची  मदत लागेल असा निरोप दिला. त्यानंतर  तातडीने  टीम सदस्य शाम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, बाळू मांगे, अक्षय लाडके, स्वप्नील कळंत्री, विनोद आयरे, सनी चिले,प्रसाद दोरे घटनास्थळी दाखल होऊन  क्षणाचा विलंब न करता जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने  चालकाला  सुरक्षित काढण्याचे काम सुरु केले. तब्बल 40  मिनिटे शर्थीचे प्रयत्न करून जखमी चालकास बाहेर काढून  रुग्णवाहिकेतून  इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल  केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या :