Pune News पुणे : एकाकडे राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्याला घेऊन राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना राज्य शासनातर्फे बार्टी (BARTI), सारथी (Sarathi) महाज्योती (Mahajyoti) टीआरटीआय (TRTI) अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांच्या कामकाजात समानता आणण्याचा निर्णय घेऊनही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून अद्याप वंचित आहेत. त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थी एल्गार करण्याच्या तयारीत असून, 24 जून ते 2 जुलै या कालावधीत पुण्यातील महात्मा फुलेवाडा ते मुंबईतील विधानभवन या मार्गावर पायी फेरी (लाँग मार्ग) काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महात्मा फुलेवाडा ते विधानभवनावर विद्यार्थ्यांचा पायी लाँग मार्च
सारथी, महाज्योती आणि बार्टी या संसथांशी संबंधित पी एच डी धारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढायचं या विद्यार्थ्यांनी ठरवलंय. पुण्यातील महात्मा फुले वाड्यातुन या लाँगमार्चला सुरुवात झाली असून पुढचे काही दिवस पुणे ते मुंबई हे अंतर पायी चालत हे विद्यार्थी विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मुंबईत पोहचणार आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी, तर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती आणि आदिवासी आणि इतर दुर्बल समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी ही संस्था काम करते.
राज्य शासनातर्फे बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय अशा संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र काही महिन्यांपूर्वी या तीन्ही संस्थांचा शिष्यवृत्ती वाटपाचा अधिकार राज्य सरकारने काढुन घेतल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, टीआयटीआय या संस्थांतील संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांत शासनातर्फे शिष्यवृत्ती नाही
एककडे राज्यासह देशात नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता महाराष्ट्र कनेक्शनमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. तर या पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी चौकशी करुन सोडलेला एक शिक्षक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, संजय जाधव हे शिक्षक फरार झाले आहेत. तसेच या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
हे प्रकरण ताजे असताना दुसरीकडे गेल्या गेल्या दोन वर्षांत राज्य शासनातर्फे बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय अशा संस्थांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी शिष्यवृत्तीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करूनही शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. परिणामी, अनेक विद्यार्थिनींना शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून अखेर या विद्यार्थ्यांकडून थेट विधीमंडळ अधिवेशन काळापर्यंत लाँग मार्च काढायचं या विद्यार्थ्यांनी ठरवलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI