Maharashtra University of Health Sciences : वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातील हिवाळी सत्रातील परीक्षांबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या (Maharashtra University of Health Sciences) निर्णयाला आता विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. हिवाळी सत्रातील परीक्षां मधील सलग पेपर न घेता पेपर मध्ये सुट्टी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिपत्रक काढत वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी सत्राच्या परीक्षा एकही दिवस सुट्टी न देता सलग घेण्याचा निर्णय घेतलाय. जेणेकरून एका महिन्याच्या आत या परीक्षा पूर्ण करता येतील, अशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. मात्र या निर्णयाला याला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.
पेपरमध्ये एक दिवसाआड सुट्टी देण्यात यावी, विद्यार्थ्यांची मागणी
असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटरेन्स महाराष्ट्र या संघटनेकडून आरोग्य विज्ञान विद्यापीठाला विनंती करण्यात आली आहे की, एकही दिवस परीक्षेमध्ये गॅप न देण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना मानसिक दडपणाविना, त्रासाविना परीक्षेची पूर्ण तयारी करून पेपर्सला सामोरे जाता येईल. वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण असतो. एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मोठा असून 9 विषयांचे पेपर्स त्यांना द्यावे लागतात. त्यामुळे मानसिक तणाव येऊ नये आणि मोकळ्या वातावरणात ही परीक्षा व्हावी, यासाठी परीक्षांमध्ये एक दिवसाआड सुट्टी देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.
निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर दडपण
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी जाहीर केलेल्या टेन्टेटिव्ह वेळापत्रकानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसारच परीक्षांच्या पेपर मध्ये कुठल्या प्रकारची सुट्टी न देण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला असल्याचं परिपत्रकात सांगितला आहे. परिणामी विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे दडपण आले असून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत या परीक्षांमध्ये एक दिवसाची गॅप द्यावी, अशी मागणी ASMI चे रिजनल कॉर्डिनेटर डॉ. जीशान बागवान यांनी केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन या बाबत काय निर्णय घेतं, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI