NIA, ATS Raids Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये, महाराष्ट्रातसह देशभरात छापेमारी, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....
NIA, ATS Raids Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात छापेमारी करण्यात येत आहे. देशातील 10 राज्यांमध्ये NIA ने छापे टाकले आहेत. या प्रकरणी प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
NIA Raids PFI Maharashtra: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. ज्यात औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India-PFI) या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर NIA, ATS आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात 'PFI'च्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पीएफआयचं महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.
महाराष्ट्र एटीएसने पीएफआय संघटनेविरुद्ध चार गुन्हेही दाखल केले आहेत. औरंगाबाद, बीड, परभणी, मालेगाव, मुंबई आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज महाराष्ट्र एटीएसचे छापे सुरू आहेत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भिवंडी : NIA ने देशभरात PFI या संघटनेवर सुरू केलेल्या कारवाईत भिवंडीतुन मोईनुद्दीन मोमीन बंगालपुरा याला ताब्यात घेतलं.
NIA आणि ATS ची कारवाई
महाराष्ट्रात 20 जण ताब्यात
औरंगाबादमधून पाच जण ताब्यात
तर नांदेडमध्येही पाच जण ताब्यात
मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला आज पहाटे चारच्या सुमारास एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलं. त्याच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन भद्रकाली परिसरातील एटीएस कार्यालयात त्याला आणण्यात आलय. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाकडून कार्यालयात त्याची कसून चौकशी केली जातीय. सैफुरवर मालेगावला यापूर्वी काही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. PFI चा नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यसंघटनेचेही त्याच्याकडे पद असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांच्या कारावाईवर प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल. जी काही छापेमारी सुरू आहे, ती कॉर्डीनेटेड स्वरूपाची ॲक्शन आहे, त्या ॲक्शनवर आता बोलणं योग्य नाही, योग्य वेळी मी बोलेन, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
नवी मुंबईमधील पॅाप्यूलर फ्रंट ॲाफ इंडीया या कार्यालयात काम करणाऱ्या असिफ नामक व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. सुखमनी निवास या इमारतीमध्ये असिफ रहिवासी आहे. या इमारतीच्या बाजूलाच पॅाप्यूलर फ्रंट ॲाफ इंडियाचे कार्यालय आहे.
कोल्हापूर : दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोप प्रकरणात कोल्हापुरातही छापेमारी करण्यात आली आहे. पीएफआय संघटनेचा पदाधिकारी अब्दुल मौला याला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जवाहरनगर मधील सिरत मोहल्ला येथून अब्दुल मौला याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नवी मुंबई : पाएफआयशी संबंधीत एका व्यक्तीला पनवेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र ATS आणि NIA ने टाकलेल्या छाप्यात या व्यक्तीकडे काही संशयात्मक कागदपत्रे आढळल्याने त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बुधवारी रात्रीपासून या व्यक्तीची चौकशी चालू होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीनंतर देशभरात NIA आणि ATS कडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप प्रकरणी ही कारवाई सुरु आहे.
NIA Raids in Maharashtra: एनआयए, एटीएस आणि इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेली कारवाई ही दडपशाही असून दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप एसडीपीआयने केला आहे. आज सकाळपासून देशभरात पीएफआय आणि एसडीपीआयच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू आहे.
औरंगाबाद येथून पीएफआयच्या 3 सदस्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. सय्यद फैसल असं एका सदस्याचं नाव असून तो नॅशनल कॉलनी येथील रहिवासी आहे. तर शेख इरफान आणि परवेझ खान हे दोघे बायजीपुरा येथील रहिवासी आहेत.
देशभरात केंद्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी सुरु आहे. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई सुरु आहे. या संदर्भात कारवाई करत NIAने 10 राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) संघटनेचे पदाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. केरळमध्ये एनआयएकडून सुमारे 50 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ही संपूर्ण कारवाई टेरर फंडिंग प्रकरणावरून म्हणजेच दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. सुरू आहे. देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई सुरु आहे. केरळमधील मांजेरी, मल्लापुरम या भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही केंद्रीय तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आहेत.
NIA Raids in India : केद्रीय तपास यंत्रणांकडून 10 राज्यांमध्ये छापेमारी करण्यात येत आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी म्हणजे टेरेर फंडिंगप्रकरणी ही कारवाई सुरु आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
NIA Raids PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी 15 हून अधिकजणांना ताब्यात घेतले आहे.
पार्श्वभूमी
NIA, ATS Raids Maharashtra Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणांकडून दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याप्रकरणी छापेमारी करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये एनआयए (NIA) आणि ईडीकडून छापेमारी सुरु आहे. गुरुवारी पहाटेपासून एनआयएकडून राज्यात छापेमारी सुरु आहे. या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसी आणि यूएपीएच्या विविध कलमांनुसार दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये समाजात तेढ निर्माण करणे आणि असा कट रचणे याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले.
देशभरात केंद्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी सुरु आहे. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई सुरु आहे. या संदर्भात कारवाई करत NIAने 10 राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) संघटनेचे पदाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. केरळमध्ये एनआयएकडून सुमारे 50 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ही संपूर्ण कारवाई टेरर फंडिंग प्रकरणावरून म्हणजेच दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. सुरू आहे. देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई सुरु आहे. केरळमधील मांजेरी, मल्लापुरम या भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही केंद्रीय तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -