Maharashtra Assembly Winter Session:  भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal) यांचा मॉर्फ केलेल्या फोटोचे पडसाद विधानसभेत उमटले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, आमदार जयंत पाटील यांनी केली. यावेळी जयंत पाटील यांनी मोबाइलमधील फोटो सभागृहाला दाखवला. राजकीय पक्षांच्या आयटी सेलकडून, कार्यकर्त्यांकडून विरोधकांची खिल्ली उडवण्यासाठी फोटोशॉप केलेल्या फोटोंचा वापर केला जातो. आता हीच पद्धत आमदारांकडून वापरली जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 
 
जयंत पाटील यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मॉर्फिंग करणे हे निषेधार्ह आहे. सभागृहातील सदस्य, ज्येष्ठ सदस्यांचे फोटो मॉर्फ करत असतील हे निषेधार्ह आणि गंभीर मुद्दा असल्याचे जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटले. मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हा मुद्दा गंभीर असल्याचे म्हटले. जयंत पाटील यांनी मोबाईलद्वारे भातखळकर यांनी मॉर्फ केलेला फोटो आणि सत्य फोटो दाखवला. 


जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. संबंधित ट्वीट खरे आहे का आणि संबंधित व्यक्तीने तक्रार केली आहे का हे पाहावे लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मात्र, हा प्रकार योग्य नसून अशा प्रकारचे मॉर्फिंग करणे चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. 


अतुल भातखळकर याआधीदेखील चर्चेत 


मुंबईतील भाजप आमदार अतुल भातखळकर हे आधीदेखील काही ट्वीटमुळे चर्चेत आले होते. त्यांनी ट्वीट करताना काही वेळेस दिशाभूल करणारे फोटो वापरले होते. त्यावरून युजर्सकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्याशिवाय, भातखळकर हे सोशल मीडियावर आक्रमक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. 


Jayant Patil on Atul Bhatkhalkar : Bhujbal यांचा फोटो मॉर्फ, अतुल भातखळकर यांच्यावर कारवाईची मागणी



इतर महत्त्वाच्या बातम्या: