Latur News : लातूरमध्ये आज 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला आहे. लव्ह जिहादच्या (Love Jihad) विरोधात या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात अनुई जिल्ह्यात सातत्याने 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज लातुरात हा मोर्चा निघाला होता, ज्यात विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.
लातूर शहरातील गंज गोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गंज गोलाई हनुमान चौक, गांधी चौक, टाऊन हॉल, अशोक हॉटेल मार्गानेपुढे जात या मोर्च्याची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता होणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने व्यापारी, शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. व्यापाऱ्यांनी मोर्चा मार्गातील दुकाने बंद ठेवून मोर्च्यात सहभाग घेतला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
'आधी मोर्चा मग व्यापार' असे घोष वाक्य वापरून लातूर शहरातील व्यापाऱ्यांना मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. लातूर शहरासह ग्रामीण भागात सतत लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून, हे थांबवायचे असतील तर जन जागृती आवश्यक आहे. याची सुरुवात स्वतःपासून, स्वताच्या दुकान पासून, स्वताच्या घरा पासून करावी असे आवाहन करत या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या या तीन प्रमुख मुद्द्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात होता.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
लातूर शहरात आज लव्ह जिहादच्या विरोधात 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आल्याने, पोलिसांकडून यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून. मोर्च्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. तर मुख्य चौक आणि रस्त्यात लागणाऱ्या विशेष ठिकाणी देखील पोलिसांचा खास बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
महिलांचाही उपस्थिती...
लव्ह जिहादच्या विरोधात लातूर शहरात काढण्यात आलेल्या आजच्या 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'त महिला आणि तरुणांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. हातात भगवा झेंडा घेऊन अनेक महिला या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. तर लव्ह जिहादच्या विरोधात घोषणा असलेले बोर्ड देखील यावेळी महिलांच्या हातात पाहायला मिळाले.
DCM On Love JIhad :लव्ह जिहादविरोधी कायद्याचा राज्य सरकार अभ्यास करतंय- फडणवीस