Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? नागपुरात ठिकठिकाणी पोस्टर्स

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: मराठा आरक्षणावर विधानसभेत सकाळी 11 पासून चर्चेला सुरुवात होणार आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार आहेत

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Dec 2023 09:41 AM
Government Employees Strike : जुन्या पेन्शनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन,घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन

Government Employees Strike : जुन्या पेन्शनसाठी छ. संभाजीनगरमध्ये आंदोलन आले आहे. घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन सुरू आहे. जुन्या पेन्शनसाठी राज्यातील 17  लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.  आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती आहे.


 


Nagpur Banner : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? नागपुरात बॅनरबाजी

Nagpur Banner : सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. याच अधिवेशनात आता एका बॅनरची चर्चा होतेय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? अशा आशयाचे बॅनर्स विधीमंडळ परिसरासमोर लागलेत. तसंच 'किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली?' असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय.


 


Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी बोलवली भाजप आमदारांची बैठक

Devendra Fadnavis:  देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदारांची बैठक बोलवली आहे. विधीमंडळ रणनितीसंदर्भात आढावा बैठक घेतली आहे.  देवगिरी येथे बैठक होणार आहे. 

Winter Assembly Session: हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस

Winter Assembly Session:  हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. आज नागपूर विधानभवनात राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील 17 लाख शासकीय संपावर गेले आहेत.. सरकार आणि संघटनांमध्ये कुठलाहा तोडगा निघालेला नाही.  त्यामुळे आज याच मुद्द्यावरुन गदारोळ माजण्याची शक्यता आहे..

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates:   आज  सकाळी 9  वाजता विशेष बैठक होणार आहे. यावेळी लक्षवेधी होतील. त्यानंतर पुन्हा 11 वाजता विधानसभा नियमित कामकाजाला सुरुवात होईल. प्रश्नोत्तरे तास संपल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण वरती चर्चा सुरु होईल. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होतील. भुजबळ यांच्या भूमिकेवर टीका होण्याची शक्यता आहे. सायंकाळी 6 वाजता मंत्रीमंडळ बैठक होणार आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.