Pakistan MP Video : सध्या पाकिस्तानमधील एका महिला खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या महिला खासदाराला रोमँटिक खासदार सुद्धा म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी संसदेच्या आत त्यांनी सभापतींना डोळ्यात डोळे घालून बोलण्यास सांगितले होते. हा व्हिडिओ समोर येताच तो वणव्यासारखा पसरत आहे. या पाकिस्तानी खासदाराचे नाव जरताज गुल असून ते इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदार आहेत.


जरताज गुल स्पीकरला काय म्हणाल्या?


पाकिस्तानी खासदार जरताज गुल संसदेत आपले मत मांडत होत्या. यावेळी त्यांनी सभापतींना जे काही सांगितले ते व्हायरल झाले आहे. जरताज म्हणाल्या की, “स्पीकर साहेब, मला तुमचे लक्ष हवे आहे. माझ्या नेत्याने मला डोळ्यात डोळे घालून बोलायला शिकवले आहे. सर, जर डोळ्यात डोळे घालून बोलणार नसाल, तर मी बोलू शकत नाही.



सभापती म्हणाले की, "मी ऐकेन, पाहणार नाही." महिलांच्या डोळ्यांशी संपर्क चांगलं वाटत नाही'' यानंतर संपूर्ण सभागृह संसद हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. लोकांना ते खूपच रोमँटिक वाटले आणि म्हणूनच जरताज यांना रोमँटिक खासदार असे नाव देण्यात आले.


लोक काय म्हणाले


या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, "पाकिस्तान सुंदर आहे, पण जवळ जाताच बॉम्बचा स्फोट झाला."  एकाने लिहिले, ''म्हणूनच ते हॅप्पी इंडेक्समध्ये आहेत.'' अन्य एकाने लिहिले, ''इथं वेगळ्याच प्रकारचे दु:ख सुरू आहे.'' लोक सतत अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या