Maharashtra Assembly Winter Session Live Updates: माझ्यावर सभागृहात आरोप झाले, सभागृहातच उत्तर देणार, अब्दुल सत्तारांची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Dec 2022 10:07 PM
Palghar: पालघर महावितरण विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकाने रंगे हात पकडले आहे.

Coronavirus Update: राज्यात 15 नवीन रुग्णांचे निदान, 9 रुग्ण बरे होऊन घरी परतले

आज राज्यात 15 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 9 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 97,87,957 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14% एवढे झाले आहे. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.

रक्तचंदन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड, पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वालीव कामण चौकी येथे रक्तचंदन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड पोलीसांनी केला आहे. कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनसह दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही वालीव पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई आहे. 

Boisar: स्विमिंग पूलमध्ये बुडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

बोईसर पूर्वेस असलेल्या मामाचा गाव या रिसॉर्ट मधील स्विमिंग पूलमध्ये बुडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. 

Shirdi : साईंचरणी 28 लाख रुपये किमतीचा हिरेजडित सोन्याचा मुकूट दान

युरोप येथील अनिवासी भारतीय भाविकाकडून 28 लाख रुपये किमतीचा 368 ग्राम वजनाचा हिरे जडीत मुकुट साईचरणी दान करण्यात आला आहे. किनारी सुबिर पटेल येथील भाविकाकडून सुंदर नक्षीकाम असलेला हिरेजडीत मुकूट दान करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, उद्या सकाळी विधानसभेत आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत अब्दुल सत्तार स्वतः उत्तर देणार

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन


अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण माहिती घेतली


उद्या सकाळी विधानसभेत आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत अब्दुल सत्तार स्वतः उत्तर देणार


सध्या उत्तरांचं ड्राफ्टिंग सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

CM Eknath Shinde LIVE - 'खोदा पहाड निकला चूहा' म्हणतात, पण यांच्याकडून तर 'चूहा' देखील निघाला नाही, आम्ही काम करत राहू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde LIVE - 'खोदा पहाड निकला चूहा' म्हणतात, पण यांच्याकडून तर 'चूहा' देखील निघाला नाही, आम्ही काम करत राहू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



 


CM Eknath Shinde - सरकार स्थापन झाल्यापासून सगळ्यांनी देव पाण्यात ठेवलेत पण सरकार भक्कम, विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde - सरकार स्थापन झाल्यापासून सगळ्यांनी देव पाण्यात ठेवलेत पण सरकार भक्कम, विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय...  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Assembly Winter Session Live Updates - उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक सुरु

 Maharashtra Assembly Winter Session Live Updates - उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक सुरु

Abdul Sattar News: माझ्यावर सभागृहात आरोप झाले, सभागृहातच उत्तर देणार, अब्दुल सत्तारांची एबीपी माझाला माहिती

Abdul Sattar News: माझ्यावर सभागृहात आरोप झाले, सभागृहातच उत्तर देणार, अब्दुल सत्तारांची एबीपी माझाला माहिती

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट, 'वीर बाल दिवसाच्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलो', मुख्यमंत्री शिंदे यांचं स्पष्टीकरण

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट, 'वीर बाल दिवसाच्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलो', मुख्यमंत्री शिंदे यांचं स्पष्टीकरण

सत्तार भाई...वसुली भाई.... विरोधकांची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सत्तार भाई...वसुली भाई.... विरोधकांची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Winter Session: कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लावून धरली आहे. कृषी महोत्सव तिकीट विक्री आणि गायरान जमीन घोटाळा प्रकरणात सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीने विधान परिषदेत उचलून धरली आहे.

Winter Session: कोकणातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर

Winter Session: कोकणातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितलकुमार जाधव निलंबित; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषतदेत केली. जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे निलंबीत करीत असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रशासनाकडून वारंवार पत्र देउन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

ITI Course: आयटीआयमधील कोर्सेसमध्ये बदल करणार; जिल्ह्यातील कंपन्यांना आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण कोर्स सुरू करणार; कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत माहिती

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: आयटीआयमधील कोर्सेसमध्ये बदल करणार असल्याची माहिती कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. आयटीआय संस्था असणाऱ्या जिल्ह्यातील कंपन्यांना आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण कोर्स त्या संबंधित संस्थांमध्ये सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागणी केली. गायरान जमीन कोणाला देता येत नाही. तत्कालीन महसुली राज्यमंत्री असताना त्यांनी 37 एकर गायरान जमीन वाटप करण्याचा निर्णय घेतला. सर्व मियमांच उल्लंघन करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप पवार यांनी केला. 

Uddhav Thackeray: कर्नाटकात जाण्याचा ठराव मंजूर करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Uddhav Thackeray: बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. कर्नाटकात जाण्याचा ठराव मंजूर करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करा आणि केंद्राकडे पाठवावा, उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत मागणी 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: आपलं सरकारं कर्नाटक सरकार सारखी भुमिका माडणार आहे का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरंतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? इथ आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकारं कर्नाटक सरकार सारखी भुमिका माडणार आहे का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Uddhav Thackeray: सीमा प्रश्नी ज्यावेळी लाठ्या खालल्या, त्यावेळी आमच्या पक्षात होता. त्यावेळी लाठी खाल्ली म्हणजे आता शांत बसावे असा अर्थ नाही; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

Uddhav Thackeray: सीमा प्रश्नी ज्यावेळी लाठ्या खालल्या, त्यावेळी आमच्या पक्षात होता. त्यावेळी लाठी खाल्ली म्हणजे आता शांत बसावे असा अर्थ नाही; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सीमा प्रश्नावर एकमत असल्याने सर्वांचे आभार, सीमावादाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे: उद्धव ठाकरे 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सीमा प्रश्नावर एकमत असल्याने सर्वांचे आभार, सीमावादाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे: उद्धव ठाकरे 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: : उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत भाषण सुरू, सीमावादावर सुरू आहे भाषण

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत भाषण सुरू, सीमावादावर सुरू आहे भाषण


Maharashtra Assembly Winter Session Live Updates: विधानसभेत सीमावादाप्रकरणी विरोधक आक्रमक, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचले, विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: विधानसभेत सीमावादाप्रकरणी विरोधक आक्रमक, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचले, विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी; सीमावाद आणि रोजगाराच्या मुद्यांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी; सीमावाद आणि रोजगाराच्या मुद्यांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सीमावाद प्रश्नावर विरोधक आक्रमक होणार, राज्य सरकारने ठराव न आणल्याचा निषेध

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सीमावाद प्रश्नावर आक्रमक होण्याचा विरोधकांनी निर्णय घेतला आहे. कर्नाटकने सीमा प्रश्नी ठराव आणला. परंतु, महाराष्ट्र सरकारने अजूनही ठराव आणला नाही या मुद्यावर विरोधक आक्रमक होणार असल्याची माहिती आहे. विरोधकांची नुकतीच बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: संजय राऊत आणि विरोधकांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे; मंत्री शंभूराज देसाई यांचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: खासदार संजय राऊत आणि विरोधकांचे मानसिक संतुलन ढासळलं असल्याचा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: विधीमंडळात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची तयारी; महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. पहिल्या आठवड्यात विरोधक आक्रमक राहिल्याचे दिसून आले तरी त्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा होती.

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: दिशा सालियन प्रकरणावर विरोधक हक्कभंग आणणार? काँग्रेस नेते नाना पटोले यांचे संकेत

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावर विरोधक हक्कभंग आणणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी दिले आहेत.

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: सीमावासियांचा प्रश्न आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणी विरोधक आज विधान परिषदेमध्ये ठराव आणणार; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची माहिती

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  सीमावासियांचा प्रश्न आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणी विरोधक आज विधान परिषदेमध्ये ठराव आणणार; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची माहिती 

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची होणार बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत विधानभवनातील पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची होणार बैठक


पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत विधानभवनातील पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन


संजय राऊतही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता


सभागृहात सत्ताधा-यांना घेरण्याच्या दृष्टीने रणनितीवर होणार चर्चा


आदित्य ठाकरेंना मागील आठवड्यात टार्गेट करण्यात आल्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक होणार

Maharashtra Assembly Winter Session Live Updates: 15 जानेवारी पर्यंत वाळू लिलावबाबत धोरण जाहीर करणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  15 जानेवारी पर्यंत वाळू लिलावबाबत धोरण जाहीर करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. विधानसभेतल लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. 

Maharashtra Assembly Winter Session: आधी लवंगी फोडा मग बॅाम्ब फोडा, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा संजय राऊतांना टोला

Maharashtra Assembly Winter Session Live Updates:  आधी लवंगी फोडा मग बॅाम्ब फोडा, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. संजय राऊत यांनी नागपूर अधिवेशनात ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. 

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ अवघी 'ठाकरे सेना' आज नागपुरात! अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार! काय 'बॉम्ब' फुटणार?

नागपूरमध्ये (Nagpur News) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Assembly Session) आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात असणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ अवघी 'ठाकरे सेना' आज नागपुरात! अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार! काय 'बॉम्ब' फुटणार?

नागपूरमध्ये (Nagpur News) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Assembly Session) आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात असणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात भेट घेतली. राज ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर होते. पक्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Maharashtra Assembly Winter Session: विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित

Maharashtra Assembly Winter Session: विधानसभेचे आणि विधान परिषदेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विधानसभेच्या कामकाजावर आज विरोधकांनी बहिष्कार घातला होता.

Maharashtra Assembly Winter Session Live: आवाज दाबला तरी आम्ही महाराष्ट्राचा भूखंड विकू देणार नाही, आदित्य ठाकरे कडाडले

Maharashtra Assembly Winter Session Live:  आवाज दाबला तरी आम्ही महाराष्ट्राचा भूखंड विकू देणार नाही, आदित्य ठाकरे कडाडले


Maharashtra Assembly Session Live: विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, जयंत पाटील यांच्यावरील कारवाईनंतर महाविकास आघाडी आक्रमक

Maharashtra Assembly Session Live:  विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Maharashtra Assembly Session Live: बेरोजगारांना पाच हजारांचा बेरोजगार भत्ता द्या, राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांचे आंदोलन

Maharashtra Assembly Session Live: बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रुपये भत्ता द्या या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांना विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. राज्यात 50 लाख बेरोजगार आहेत त्यांच्यासाठीच हा भत्ता सुरू केल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल असं आमदार लंके यांनी म्हटले आहे. 

Maharashtra Assembly Winter Session: भाजपचे आमदार 27 डिसेंबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार, संघाचे नेते करणार मार्गदर्शन

Maharashtra Assembly Winter Session:  भाजपचे आमदार 27 डिसेंबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार 


-  भाजपचे आमदार आद्यसरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या समाधिस्थळाचं दर्शन घेणार 


- सकाळी आठ वाजता भाजपचे आमदार रेशीमबाग येथील स्मृतीमंदिर येथे जाणार 


- संघाचे नेते भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची  माहिती 


- हिवाळी अधिवेशन भाजपचे आमदार नागपूरात असल्याने रेशीमबागेत जाणार 

Maharashtra Assembly Winter Session: विरोधी पक्षांची आज सकाळी 10 वाजता बैठक, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची माहिती

Maharashtra Assembly Winter Session: विरोधी पक्षांची आज सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज कामकाजाबाबत विरोधी पक्ष रणनीति ठरवणार आहे. 

Maharashtra Assembly Winter Session: आजच्या कामकाजावर विरोधक बहिष्कार घालणार? सत्ताधारी आणि विरोधक आज आमने-सामने

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याचे पडसाद आज विधानसभेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. 

Mukta Tilak Death News: नागपूर हिवाळी अधिवेशनात मुक्ता टिळकांना श्रद्धांजली, पायऱ्यांवर मुक्ता टिळक यांना विरोधकांकडून श्रद्धांजली  

Mukta Tilak Death News: नागपूर हिवाळी अधिवेशनात मुक्ता टिळकांना श्रद्धांजली, पायऱ्यांवर मुक्ता टिळक यांना विरोधकांकडून श्रद्धांजली  

पुण्याच्या विकासातील मुक्ताताई टिळक यांचं योगदान कायम लक्षात राहील : अजित पवार

Nagpur news:  "पुण्याच्या माजी महापौर, कसबा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 1992 पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण होती. पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक जीवनाशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. आमदार म्हणून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

जितेद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप 

एनआयटी भुखंड प्रकरणात बुधवारी रात्री भुखंडासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं 


हे प्रतिज्ञापत्र बाहेर येऊ नये यासाठी आज दिवसभर गोंधळ घातला गेला, असा आरोप जितेद्र आव्हाड यांनी केलाय. 


हे प्रतिज्ञापत्र जितेद्र आव्हाड यांनी वाचून दाखवलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे राज्यभर आंदोलन... 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्याचे निलंबन करुन हुकुमशाही पध्दतीने सभागृह चालवणार्‍या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ दिनांक २३ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचारावर सोमय्या बोलत का नाहीत?  - संजय राऊत

प्रताप सरनाईकांची ईडी चौकशी सुरु होती, फाईल का बंद झाली?


तुमच्या घरातल्या फाईल्स उघडायला लावू नका 


आमची चौकशी करता, तुमची चौकशी कोण करणार? 


भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या कुठे गेले?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचारावर सोमय्या बोलत का नाहीत? 

सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब

विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळं पुरवण्या मागण्यांवर चर्चा होऊ शकली नाही त्यामुळं सभापतींनी सत्ताधारी विरोधक चर्चा न होताच विचारात घेतल्याची घोषणा केली आणि सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब केलं

जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन; अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात

जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन; अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात

महिलेवरील बलात्कार प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशीचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले

महिलेवरील बलात्कार प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशीचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. 

Maharashtra Assembly Winter Session: जयंत पाटील संतापले, अध्यक्षांसाठी अपशब्दाचा वापर; सत्ताधाऱ्यांकडून निलंबित करण्याची मागणी, विधानसभेत गदारोळ

Jayant Patil: विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्याने अभूतपूर्व गोेंधळ निर्माण झाला. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी 



 

Maharashtra Assembly Winter Session: 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरले, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Winter Session: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरले असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बदनामी करण्याचे आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. 

Maharashtra Assembly Winter Session: दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session: दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

दिशा सालियानच्या आत्महत्येची चौकशी करावी, भाजप आमदार नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची मागणी

Maharashtra Assembly Winter Session: दिशा सालियानच्या आत्महत्येची चौकशी करावी अशी मागणी विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केली. नितेश राणे हा मुद्दा मांडत असताना विरोधी बाकांवरून घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये उतरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गदारोळ वाढल्यानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

Maharashtra Assembly Winter Session: फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ; विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्षांविरोधात सभात्याग

Maharashtra Assembly Winter Session: फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विधानसभेत आज गदारोळ झाला. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभा अध्यक्षांनी चर्चा नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. 


 

Maharashtra Assembly Winter Session Live: फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक; सरकार बदलानंतर रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट चौकशी न करता का पाठवला, पटोले यांचा सवाल

Maharashtra Assembly Winter Session: फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेस आमदार नाना पटोले आक्रमक झाले आहेत. सरकार बदलानंतर रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट चौकशीनंतर का पाठवला, असा सवाल पटोले यांनी केला. रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट राज्य सरकारने हायकोर्टात दाखल केला. सरकार बदलल्यानंतर हे तात्काळ करण्यात आले. चौकशी न करता हा रिपोर्ट का पाठवला असा सवाल त्यांनी केला. माझा फोनही टॅप करण्यात आला होता, या प्रकरणात मी पीडित असून माझा फोन टॅप करण्यात आला होता. या प्रकरणात गृहमंत्री यांचा थेट हस्तक्षेप असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. 

Maharashtra Assembly Winter Session: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बैठकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फिरवली पाठ

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बैठकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या नेत्यांची पाठ


सरकारविरोधात आक्रमक भुमिका घेत नसल्यामुळे तसेच सभेत सभागृहात बोलायला मिळतं नसल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती


सकाळी 10 वाजता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली

Maharashtra Assembly Winter Session: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Assembly Winter Session:  विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधकांनी हातात भूखंडाचे श्रीखंड असे फलक धरत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 

Maharashtra Assembly Winter Session: 20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाही; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Maharashtra Assembly Winter Session:  20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांंनी विधानसभेत दिली. शिक्षण हक्क अधिकारातंर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे शाळा बंद होणार, असे गैरसमज पसरले होते. तूर्तास या शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. 

Maharashtra Assembly Winter Session: विधानसभेतील कामकाजाला सुरुवात, लक्षवेधीवर प्रश्नांचे सत्र सुरू

Maharashtra Assembly Winter Session: विधानसभेतील कामकाजाला सुरुवात, लक्षवेधीवर प्रश्नांचे सत्र सुरू

Maharashtra Assembly Winter Session: तब्बल 10 तासांनी संगणक परिचालकांचे आंदोलन मागे; नागपूरच्या थंडीत एक हजार मोर्चेकऱ्यांचा ठिय्या

Maharashtra Assembly Winter Session: राज्यातील ग्रामपंचायत मध्ये 'आपले सेवा केंद्र' प्रकल्पातील संगणक परिचालकानी किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाची बुधवारी रात्री 10 वाजता सांगता झाली. दुपारी काढण्यात आलेला मोर्चा दुपारी 1 वाजताच मोर्चा पॉइंटवर पोहचला होता. मात्र, ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे तब्बल दहा तास ठाण मांडून होते. अखरे ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने पुढील 15 दिवसात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मागे घेतला. 

Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस, विरोधकांना प्रत्त्युतर देण्यास सत्ताधारी सज्ज

Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून NIT जमीन विक्री प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तिसऱ्या दिवशी लावून धरली होती. विधान परिषदेत एनआयटीच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आज विधीमंडळात आज विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळात 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.

रोहित पवारांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. कारण माझ्या मतदारसंघातील अनेक कामे स्थगित करण्यात आली. निधी रोखण्यात आला. आणि केवळ माझे राजकिय विरोधक यांच्या सांगण्यावरुन हे सगळं होतं आहे. परन्तु माझ्या एका कामाबाबत माझ्या राजकीय विरोधकांनी अनेक प्रयत्न करून देखील मुख्यमंत्री यांनी माझ्या फाईलवर सही करून मला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, असे रोहीत पवार विधानसभेत म्हणाले.

हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महा असेंब्ली ॲपचा प्रारंभ

अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या 'महा असेंब्ली' या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला. 


विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात  आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Winter Session: एनआयटीच्या मुद्यावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक, सत्ताधारी भाजपा आमदारांकडून हौद्यामध्ये उतरून गोंधळ; कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब

Maharashtra Assembly Winter Session: एनआयटीच्या मुद्यावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांच्याकडून एनआयटी भूखंडा मुद्या मांडला जात असताना सत्ताधारी भाजपा आमदारांकडून हौद्यामध्ये उतरून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. वाढता गोंधळ पाहता कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

Maharashtra Assembly Winter Session: विधान परिषदेत एनआयटी भूखंड प्रकरणात विरोधक आक्रमक; तर सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे

Maharashtra Assembly Winter Session: विधान परिषदेत एनआयटी भूखंड प्रकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे

Maharashtra Assembly Winter Session: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शासस्ती कर रद्द, अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (PCMC) शासस्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेत शासस्ती कर वसूल होतं नाही असं लक्षात येतं नाही. मूळ कर देखील वसूल होतं नाही. महापालिकेचे मोठं नुकसान होतं आहे. मी मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा केली आहे. आम्ही शासस्ती कर रद्द करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. पिंपरी-चिंचवड मधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार असून त्याबाबतची योजना जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. 

Maharashtra Assembly Winter Session: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले 

चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकाचा मुद्दा  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. सरकारने याबाबत तातडीच्या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी त्यांनी केली.  

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर न्यास प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक, विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप

Maharashtra Assembly Winter Session:  नागपूर न्यास प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधान परिषदेत नागपूर न्यास प्रकरणं विषयावर सरकाराला बोलायला परवानगी देण्यात आली त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली आणि विधान सभेत मात्र, तुम्ही आम्हाला चर्चा करू देत नाही. तुम्ही म्हणता कोर्टात केस सुरू आहे. हे असं चालणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले. कोर्टातील विषयवार मंत्र्यांना बोलू देता आणि आम्हाला बोलू दिले जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 

Maharashtra Assembly Winter Session: अस्थिव्यंग, गतिमंद , न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचार सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत सरकार सकारात्मक; सरकारची विधानसभेत माहिती

Maharashtra Assembly Winter Session: अस्थिव्यंग, गतिमंद , न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचार सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. 

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पायऱ्यावर विरोधकांची निदर्शने

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. 

Maharashtra Assembly Winter Session: टीसीएसच्या माध्यमातून लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session: राज्यात लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. 

Maharashtra Assembly Winter Session: टीसीएसच्या माध्यमातून लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती; आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session: राज्यात लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. 

Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळी ठरणार? सत्ताधारी-विरोधक आज पुन्हा आमने-सामने

 Maharashtra Assembly Winter Session:  नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी

Maharashtra Assembly Winter Session: कोणत्याही गैरमार्गाने NIT ला भूखंड दिला नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत निवेदन

Maharashtra Assembly Winter Session: कोणत्याही गैरमार्गाने NIT ला भूखंड दिला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटले. न्यासा भूखंड प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोप फेटाळून लावले. 

Maharashtra Assembly Winter Session: राज्यामध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटीची स्थापना होणार, कर्जत परिसरात होणार विद्यापीठ

Maharashtra Assembly Winter Session: राज्यामध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटीची स्थापना होणार, कर्जत परिसरात होणार विद्यापीठ


उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी शासनाचे प्रयत्न


विद्यापीठाचे विधी संस्थापन विनिमय आणि संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी आज विधान परिषदेत विधेयकम

Maharashtra Assembly Winter Session: समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा विधानसभेत

Maharashtra Assembly Winter Session 2022: समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. 
समृद्धी महामार्गावर टॉयलेट नाही. वाहनांच्या वेग मर्यादे बाबत वाहन चालकांना त्याची कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. त्या दिवशी त्यांच्याकडे मर्सिडीज कार होती. गाड्यांचे हिवाळ्यात टायर फुटत आहेत. समृध्दी महामार्गावर अनेक जनावरांचा अपघाती मृत्यू होत आहे. कितीतरी कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. माकडेदेखील येतात. त्यांचाही अपघात होण्याची भीती आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


यावर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, समृद्धी महामार्गावर या दोन ते तीन महिन्यांत खड्डे पडले नाहीत. गेली अडीच वर्षांपासून हे खड्डे पडलेले आहेत. त्याची ही चौकशी केली जाईल. समृद्धी महामार्गावर 150 किमी प्रति वेगाने वेगाने वाहने चालवू शकतो. पण, आपण 120 किमी प्रति वेग इतकी मर्यादा घातलेली असल्याचे त्यांनी म्हटले. 

49 वे संसदीय अभ्यासवर्ग ;  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद



Winter Assembly Session  Nagpur Update:  राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्य शास्त्र व लोकप्रशासन विषयांवर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 49 वे संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषद सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर विधानसभेसमोरील पायऱ्यांवर मुख्यमंत्री, उपकमुख्यमंत्री आदींसोबत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढण्यात आला.

Maharashtra Assembly Session 2022: विधान परिषदेत कामकाजाला सुरुवात, सभागृहात गोंधळ

Maharashtra Assembly Session 2022: विधान परिषदेत कामकाजाला सुरुवात झाली आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असून गोंधळ उडाला आहे. 

Winter Session: राज्यात 9 महिन्यात 2138 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; विधानसभेत सरकारची माहिती

Maharashtra Assembly Winter Session: राष्ट्रीय गुन्हे नोंदी शाखा अहवालानुसार वर्ष 2021 मध्ये कृषी क्षेत्रात देशात एकूण 10 हजार 881 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत.  त्यापैकी राज्यात 2649 शेतकरी आणि 1424 शेतमजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्ष 2021 मध्ये एकूण 4064 आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ कालावधीत राज्यात 2138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये अमरावती 817, नागपूरमध्ये 260 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबादमध्ये 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या एकूण 2138 प्रकरणांपैकी 1159 प्रकरणे जिल्हा समितीने मदतीसाठी पात्र ठरवली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 


 

Live: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण, पाहा

Live: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण, पाहा...


Winter Session: विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कामाच्या स्थगितीवरून खडाजंगी

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना तुम्ही कामे रोखली होती. अडीच वर्षात भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही. आम्ही सूडाचे राजकारण करत नाही. आम्ही विरोधकांवर अन्याय करणार नाही, आवश्यक ती कामे सुरू झाली आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

विधान भवनाच्या पाऱ्यांवर भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडी आमने-सामने

Nagpur : महाविकास आघाडीची बैठक संपताच महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत विधान भवन परिसरात पोहोचले. तेवढ्यातच भाजपच्या पक्ष कार्यालयातून भाजप आणि शिंदे गटाचे आमदार 'भारत माता की जय'च्या च्या घोषणा देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर पोहोचले. राज्य सरकार आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये घोषणेची स्पर्धाच सुरु झाली...

Winter Session: विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांचेही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन; संतांचा कथित अपमान आणि इतर मुद्यांवरून भाजप-शिंदे गटाचे आंदोलन

Winter Session: विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले आहे. संतांबाबत कथित अपमानास्पद वक्तव्ये आणि इतर मुद्यांवरून भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या आरोपांना सभागृहातही उत्तर देणार असल्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

Winter Session: गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी! विरोधी पक्षाच्या आमदारांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

Winter Session: गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनात महाविकास आघाडीमधील अनेक आमदार यात सहभागी झाले आहेत.

Winter Session: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीवरून विरोधक आक्रमक होण्याचे संकेत

Winter Session: श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरदेखील विरोधक आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत.

महाविकास आघाडीची व्यूहरचना ठरली, राज्य सरकारला घेरणार...



Nagpur News Update : नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाज सुरु होण्यापूर्वी, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत, विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली. तसेच सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, एकनाथराव खडसे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अनिल परब आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Winter Session: विधान भवनात महाविकास आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

Winter Session: महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि आमदार पोहचले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे बैठकीला पोहचणार

Winter Session: महाविकास आघाडीची आज सकाळी 9.30 वाजता विधान भवनात बैठक, अधिवेशनातील रणनीती ठरणार

Winter Session: महाविकास आघाडीची आज सकाळी 9.30 वाजता विधान भवनात बैठक होणार आहे. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तिन्ही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत तिन्ही पक्षांची रणनीती ठरवली जाणार आहे. 

Winter Assembly Session : यंदा प्रथमच विधान भवन परिसरात 'इंक पेन'वर बंदी

Nagpur News Update : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक नंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

Winter Assembly Session: विधानसभा आणि विधान परिषदेचे दिवसभरातील कामकाज स्थगित

Winter Assembly Session: विधानसभा आणि विधान परिषदेचे दिवसभरातील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. 

Saroj Ahire : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे बाळाला घेऊन अधिवेशनात, पाहा व्हिडिओ

Maharashtra Assembly Winter Session: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे बाळाला घेऊन अधिवेशनात, पाहा व्हिडिओ


 


महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठिशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केली भूमिका

CM Ekanth Shinde: सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने पहिल्यांदात या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. याचे तुम्ही स्वागत करायला हवे असेही त्यांनी म्हटले. मागील अडीच वर्षात आधीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या असल्याचे त्यांनी म्हटले.

Maharashtra Assembly Session: विधीमंडळ अधिवेशनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. 

Winter Assembly Session: विरोधी पक्ष आंदोलन करण्याआधीच सत्ताधारी पक्ष करणार आंदोलन, सुषमा अंधारे यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक

Winter Assembly Session: शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात आहेत. थोड्याच वेळात विधानभवनाच्या पाय-यांवर सर्व मंत्री आणि आमदार आंदोलन करणार आहेत. 

Winter Assembly Session : आजपासून हिवाळी अधिवेशन; नागपूर शहरातील या मार्गांवर वाहतूक बंद

Winter Assembly Session: आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सात मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...



 

Shiv Sena: नागपूर विधानभवनातील शिवसेना कार्यालय दोन्ही गटांमध्ये विभागणी,

Shiv Sena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी शिवसेनेच्या कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे. दोन्हीही कार्यालये आजूबाजूला असणार. 

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Winter Session:  नागपूर येथे सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा आज सहावा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 6)


आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. आज विधीमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. तर, राऊत यांचे बॉम्ब फुसके असल्याचे प्रतिहल्ला भाजपने केला होता. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई, सीमा प्रश्न, एनआयटी भूखंड प्रकरण आदी मुद्यांवर आजही विरोधक सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा आज पाचवा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 5)


महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याचे पडसाद आज विधानसभेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घालत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दिवसभर आंदोलन होण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 4)


विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून NIT जमीन विक्री प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तिसऱ्या दिवशी लावून धरली होती. विधान परिषदेत एनआयटीच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आज विधीमंडळात आज विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळात 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.


 


विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 3rd)


नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी एनआयटी जमीन विक्री प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून निवदेन सादर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. आज तिसऱ्या दिवशीदेखील विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारी असणार आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतवून लावण्यास सत्ताधाऱ्यांकडून रणनीति ठरवण्यात आली आहे. 


अधिवेशनाचा आज दुसरा दिवस


हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विरोधक सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यावरून आक्रमक होणार आहेत. सीमा वादाचा प्रश्न ,शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या सर्व मुद्द्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक साडेदहा वाजता आंदोलन करतील आणि सभागृहातही आक्रमक राहणार आहेत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीनही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत तीनही पक्षांची स्ट्रॅटेजी ठरवली जाईल. श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर या विषयासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरती विरोधक आक्रमक होणार आहेत.


या मुद्यांवर विरोधक आक्रमक होणार?


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. 


महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.


23 विधेयके प्रस्तावित 


सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयके आहेत. तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयके आहेत. 


1. विधानसभा विधेयक -  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग), 


2. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, 2022 ( सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग). 


3. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग). 


4. विधानसभा विधेयक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 , (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


5. विधानसभा विधेयक- . जे.एस.पी.एम. युनिव्हर्सिटी विधेयक, 2022 ( नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग). 


6.  महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा ( विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 ( शिक्षेची तरतूद कमी करण्याबाबत) (गृह विभाग).


7. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र औद्योगिक संबंध, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण), महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, 2022 (मुख्य अधिनियमातील तुरंगवासाच्या तरतुदीऐवजी दंडाची तरतूद वाढविण्याकरिता) (उद्योग, ऊर्जा व कामगार).


8. विधानपरिषद विधेयक - युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग). 


9. विधानपरिषद विधेयक -  पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).


10. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग).


11. विधानसभा विधेयक - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, 2022 (नगर विकास विभाग)


12. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग).

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.