Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

Maharashtra Assembly Monsoon Session : टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, महायुतीतली धुसपूस, महाविकास आघाडीतली पडलेली फूट, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jul 2023 02:20 PM
Maharashtra Politics : मोठी बातमी! अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, थोरल्या पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न?
Maharashtra NCP Political Crisis : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पोहोचले आहेत. Read More
निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधानभवन सचिवांना पत्र

Notice To Nilam Gorhe And Manisha Kayande : विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधानभवन सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील 14 दिवसांत उत्तर द्यायचे आहे.

Maharashtra Assembly Session : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

Maharashtra Assembly Session : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

Maharashtra Assembly Session : विरोधी बाकावरुन थेट सत्तेत जायचं हे न पटणारं : यशोमती ठाकूर

Maharashtra Assembly Session : विरोधी बाकावरुन थेट सत्तेत जायचं हे न पटणारं : यशोमती ठाकूर


- विधानसभेचे संख्या आमची जास्त आहे


- विरोधी पक्षनेता विधानसभेत कामकाजात असला पाहिजे


- ज्याप्रकारे पक्ष फोडाफोडीचे राजकारण होतंय ते जनतेला पटणार नाही


- युवकांचे प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही


- स्वतःपुरतं राजकारण आणि स्वतःसाठी काही पण


- विरोधी बाकावरुन थेट सत्तेत जायचं हे पटणार नाही


- विधानसभा विरोधी पक्ष नेते संदर्भात पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील

शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम, ते निर्णय बदलणार नाहीत असं मला वाटतं : सुनील भुसारा

Maharashtra Assembly Session : शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम, ते निर्णय बदलणार नाहीत असं मला वाटतं : सुनील भुसारा


- हे असं पहिल्यांदाच होतंय की आम्ही एकाच पक्षात असून दोन गट पडले आहेत


- आधी शिवसेनेचे आमदारांसोबत झालं ते आता या अधिवेशनात आमच्या आमदारांसोबत होणार आहे


- आम्ही शरद पवारांसोबत आहोत आणि विरोधी पक्षात आम्ही बसणार आहोत


- आमच्याकडे किती आमदार आहेत याची संख्या मला माहित नाही, जयंत पाटील यासंदर्भात बोलतील


- अजित पवार गट शरद पवार यांना भेटला त्यांचे चर्चा केली मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत ते कुठल्याही प्रकारे आपला निर्णय बदलणार नाहीत असं मला वाटतं

Maharashtra Assembly Session : विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आमचा होईल : अशोक चव्हाण

Maharashtra Assembly Session : विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आमचा होईल : अशोक चव्हाण


विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी सर्व नेत्यांनी जायला हवं


विरोधी पक्षनेते संदर्भात कोण बनेल याबाबत दिल्लीचे नेते ठरवतील


विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आमचा होईल 


या संदर्भातील निर्णय लवकरच होईल

काँग्रेस पक्षच विरोधी पक्षात बसणार : बाळासाहेब थोरात

Maharashtra Assembly Session : काँग्रेस पक्षच विरोधी पक्षात बसणार : बाळासाहेब थोरात



- काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात बसणार. 


- दिल्लीचं मार्गदर्शन आम्ही विरोधी पक्षनेते पदासाठी मागत आहोत. 


- अजून नाव निश्चित नाही.


- पहिला दिवस आहे. फार कामकाज होणार नाही. आम्ही सगळे आहोत काही अडचण येणार नाही.


- नवा विरोधी पक्ष नेता कोण याचा निर्णय कधीही येऊ शकतो 


- पत्राची गरज नाही. मोठा गट म्हणून आम्ही बसतच आहोत.


- आम्ही कोणाचं नाव सुचवलं नाही.


- विधानपरिषदेवर विरोधी पक्ष नेतेपदाचा विचार केला नाही.


- अनेकदा नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते त्यानुसार निर्णय सुद्धा घेतले जातात त्यामुळे त्या संदर्भातील नाव लवकरच निश्चित होईल आज-उद्या या संदर्भातला निर्णय होईल

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Monsoon Session : या महिन्याभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये अजित पवारांचं (Ajit Pawar) बंड होऊन सरकारमध्ये येणं, नव्या मंत्र्यांना खातेवाटप व होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं…अशा एक ना अनेक घडामोडींवरुन महाराष्ट्राचं राजकारण चर्चेत राहिलं. पण आता ही सगळी मंडळी पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, महायुतीतली धुसपूस, महाविकास आघाडीतली पडलेली फूट, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा सभागृहात फक्त गद्दार आणि खोके ऐकायला मिळायचे. यंदा त्याच घोषणा अजित पवारांच्या विरोधात ऐकायला मिळण्याची नाकारता येत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जरी संयमी भूमिका असली तरी काँग्रेस आणि ठाकरे गट मात्र आक्रमक असणार आहेत. 


महाविकास आघाडीतील अजितदादा बाजूला झाले आहेत पण विरोधी आपली वज्रमूठ करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत तर सत्ताधारी विरोधकांना चितपट करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांचा धोधो पाऊस पडताना दिसेल.



  • राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै 2023 रोजी सुरू होणार आहे. 

  • हे अधिवेशन 4 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. 

  • या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवस आहेत. 

  • शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत

  • पंधरा दिवसांच्या या पावसाळी अधिवेशनात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

  • त्यातले अर्धे दिवस तर आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृह बंद पाडण्यातच जातील. 


यंदाच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांची संख्या खूपच कमी असणार आहेयत्यामुळे विधीमंडळातील आसन व्यवस्था लक्षणीय असणार आहे, कारण आधी विरोधात बसणारे अजित दादा अँड टीम सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी-विरोधक कसे बसणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत राहणार 


अडीच वर्ष अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद साभांळताना सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे काम केलं होतं. मात्र आता अजित पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत विरोधातून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता विरोधी पक्षनेताच नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा देखील मुद्दा या अधिवेशनात चर्चेत राहणार आहे.


पावसाळी अधिवेशन कमी विरोधकांमध्ये पार पडणार आहे. मात्र विरोधकांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखलेली आहे. आपल्या पुरवणी मागण्यांबरोबरच सवाल सभागृहात विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतील त्यामुळे हे अधिवेशन पावसाळी की वादळी ठरतं हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल


दरवर्षी अधिवेशन होतं, आरोप प्रत्यारोप होतात अधिवेशन संपताच सगळे आमदार मंत्री घरी जातात पण जनतेच्या प्रश्नाचे काय? कधी हिंदुत्वाचा मुद्दा, कधी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा तर कधी वंदे मातरम् कर कधी भारतातल्या विविध मुद्द्यांवर खडाजंगी रंगलेली आपण अनेक वेळा पाहली आहे. त्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनता खूश नाहीय त्यामुळे या अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचे जनतेच्या हिताचे काहीतरी व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.