एक्स्प्लोर

Ehnath Shinde : शिवसैनिकाला सत्तेचा फायदा कुठे? मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल व्हायचे; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसैनिकांना त्रास दिला जायचा, त्यांना पक्षात येण्यासाठी धमक्या दिल्या जायच्या असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

मुंबई: महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत असूनही शिवसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या, त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आता मी मुख्यमंत्री आहे, प्रत्येकाला न्याय देणार असंही ते म्हणाले. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सत्तेचा फायदा हा तळागाळातल्या शिवसैनिकाला झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री पक्षाचा असताना जर शिवसैनिकाला उभं करायचं नाही तर कधी करायचं असा सवाल होतं. पण सत्तेत असलेल्या शिवसैनिकाला काय मिळालं? शिवसैनिकाला सत्तेचा फायदा कुठे मिळाला? शिवसैनिकांना सत्तेत असूनही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "जयंत पाटील ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणचा आमदार हा राष्ट्रवादीचा असणार असं म्हणायचे. अनेक ठिकाणच्या शिवसैनिकांना धमक्या दिल्या जायच्या, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जायचं. त्यावेळी राष्ट्रवादीत या मग गुन्हे मागे घेऊ असा दम दिला जायचा. त्यावेळी त्या ठिकाणचा शिवसेनेचा आमदार बिथरायचा, कार्यकर्ते बिथरायचे. ते माझ्याकडे यायचे आणि व्यथा मांडायचे. त्यावेळी मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करायचो." 

आता शिवसैनिकांना हक्काचा माणूस मिळाला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची कामं होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेससोबत जाणार नाही. ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत जाईन त्या दिवशीच राजकारणाचं हे दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. 



महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Legislative Council Video : 'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
Operation Tiger: नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, 5 कोटींच्या आमिषाचा पर्दाफाश करत ठाकरेंचे नगरसेवक एकत्र जमले; गटनेत्यांचा थेट 'ऑपरेशन तुडवा'चा इशारा, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, 5 कोटींच्या आमिषाचा पर्दाफाश करत ठाकरेंचे नगरसेवक एकत्र जमले; गटनेत्यांचा थेट 'ऑपरेशन तुडवा'चा इशारा, नेमकं काय घडलं?
Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं?
निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BEST bus Shevpuri: मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget