Maharashtra Assembly Session 2021 LIVE : विधानसभा कामकाज संपले असून  पुढील अधिवेशन 7 डिसेंबरला

Maharashtra Assembly Session 2021 LIVE UPDATES : आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. कालचा दिवस गोंधळ, निलंबनानं गाजला, दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jul 2021 04:11 PM
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुढील तीन तासात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत विजांच्या कडकटाडासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेडमध्ये देखील वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज, विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : राज्य सरकार केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करणारे विधेयक मांडत आहे

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : राज्य सरकार केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करणारे विधेयक मांडत आहेत. 



  • जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम 2021

  • शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण  आश्वसित किंमत आणि शेतीसेवा विषयम करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021 

  • शेतकरी उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम 2020


ही तीन विधेयक सभागृहात मांडली जात आहेत. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : ओबीसींचे आरक्षणासंदर्भात आज कोर्टात सुनावणी झाली, अजित पवारांची सभागृहात माहिती

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : ओबीसींचे आरक्षण संदर्भात आज कोर्टात सुनावणी झाली असून कोर्टाने निवडणूक आयोगाला सूचना केली आहे की कोरोनाच्या काळामध्ये निवडणूक घ्याव्यात की नाही याबाबत विचारणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाला पत्र द्यायला सांगितलं आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाने मंजुरी दिली असल्याची घोषणाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Session 2021 : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Maharashtra Assembly Session 2021 : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागानं मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसरी दिवशी सभागृहात बोलताना केली.

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल : गृहमंत्री

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक खुलासा एबीपी माझानं केला होता. याच फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. 

Maharashtra Assembly Session 2021 : प्रतिअधिवेशनातील माईक काढून घेण्यात आले, ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे; देवेंद्र फडणवीस

लोकशाहीत विरोधी पक्ष आणि माध्यमांना कुलुप लावण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे, ही राज्यातील आणीबाणी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सभागृहाच्या आवारात भाजपचं प्रतिअधिवेशन सुरु असताना तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर त्यांचे माईक काढून घेण्यात आले होते. 

Maharashtra Assembly Session 2021 : भाजप आमदारांकडून माईक काढून घेण्यात आला, तालिका अध्यक्षांच्या आदेशनंतर कारवाई

अध्यक्ष तालिकेंच्या आदेशानंतर भाजपच्या प्रतिअधिवेशनाचे माईक काढून घेण्यात आले. भाजपने सभागृहाच्या बाहेरच प्रतिअधिवेशन सुरु केलं आहे. आता त्यातील माईक काढून घेण्यात आले आहेत.

विधीमंडळ परिसरात स्पीकर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : विधीमंडळ परिसरात स्पीकर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर अभिरुप विधानसभेतील स्पीकर जप्त करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे सुरक्षा यंत्रणेला आदेश दिले आहेत. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राज्य सरकार विधेयक आणणार
Maharashtra Assembly Session 2021 LIVE : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राज्य सरकार विधेयक आणणार आहे. कॅबिनेट बैठकीत विधेयकाला मंजुरी मिळणार असून त्यानंतर आज हे विधेयक सभागृहात मांडले जाणार आहे. काँग्रेसने या विधेयकबाबत आग्रहाची भूमिका मांडली होती. 
भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात नागपुरात आंदोलन

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसींचे आरक्षण काढून ते धनधांडग्यांना देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

Maharashtra Assembly Session 2021 : आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.  अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.  

मराठा आरक्षण संबंधित महत्वाचे निर्णय

मराठा आरक्षण संबंधित महत्वाचे निर्णय


SEBC आरक्षण बाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे ज्या नोकरभरती प्रक्रिया रखडल्या होत्या, त्या भरती प्रक्रियेतील SEBC उमेदवारांना वय मर्यादा  38 वरून 43 वर्षापर्यंत सवलत देण्यात आली. 2014 चा ESBC कायद्याला उच्च न्यायालय स्थगिती आल्यामुळे  ज्या उमेदवारांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या देण्यात आले होते त्यांना कायम करण्याचा निर्णय

विरोधी पक्षातील 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई 

  • आशिष शेलार

  • पराग आळवणी

  • योगेश सागर

  • राम सातपुते

  • नारायण कुचे

  • बंटी भागाडीया

  • हरीश पिपळे

  • जयकुमार रावल, सिंदखेडा

  • अभिमन्यू पवार, औसा

  • पराग आळवणी, विलेपार्ले

  • अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व

  • संजय कुटे, जळगाव जामोद, (बुलडाणा)

संजय कुटे, अभिमन्यु पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर,  राम सातपुते, नारायण कुचे यांनी अर्वाच्य वर्तणूक केली, त्यामुळे त्यांचं एक वर्ष सदस्यत्व निलंबित

संजय कुटे, अभिमन्यु पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर,  राम सातपुते, नारायण कुचे यांनी अर्वाच्य वर्तणूक केली, त्यामुळे त्यांचं एक वर्ष सदस्यत्व निलंबित, अनिल परब यांची माहिती

Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण, विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन होण्याची शक्यता

तालिका अध्यक्ष यांच्या बरोबर धक्काबुक्की ,शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन होणार आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष मारेती आप्पा या आमदारांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. 

तालिका अध्यक्षांना कोणतीही धक्काबुक्की झाली नाही, फडणवीसांचे प्रत्युत्तर

तालिका अध्यक्षांच्या दालनात कोणतीही धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं

Maharashtra Assembly Session 2021 : विरोधी पक्षनेत्यांचा तोल सुटला, तालिका अध्यक्षांच्या धक्काबुक्कीवरुन नाना पटोलेंचा आरोप

भाजपकडून ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. ओबीसी मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा तोल सुटला असून भाजपला ओबीसींचा रोष असल्याचं स्पष्ट झालंय. 


 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गोंधळ; आरक्षणासाठी केंद्रानं इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव मंजूर

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आहे. परंतु, विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितलं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, सरकारचा ठराव. ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव पटलावर. मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितलं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार असल्याची माहिती आहे.  ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. 

राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही: सुधीर मुनगंटीवार 

पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकते असंही ते म्हणाले.

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळानं आक्षेप व्यक्त केला. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात

आजपासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार नाही, विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत निवडणुकीसंदर्भात उल्लेख नाही

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार नाही. विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत निवडणुकीसंदर्भात कोणताही उल्लेख नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदावरुन काँग्रेसची निराशा झाली असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. 

Maharashtra Assembly Session 2021 : पावसाळी अधिवेशनाच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचं संकेत

विधानसभा कार्यक्रम पत्रिकेत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाचा कोणताही उल्लेख नसल्याने या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक, नवी मुंबई ते विधानभवन मनसैनिक चालत जाऊन सरकारचा निषेध करणार

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. यावरुन राज्य सरकारचा निषेध करत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन विधानभवनाच्या दिशेनं निघाले आहेत. पायी निघालेल्या या मोर्च्यामध्ये मनसेचे 150 ते 200 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 


याबाबत बोलताना गजानन काळे म्हणाले की, "स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर सरकारने केवळ एक समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु ज्या एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सदस्यांचं पुरेसं संख्याबळ नाही. सध्या केवळ दोन सदस्य याचं काम पाहत आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत आम्ही आता विधानभवनाच्या दिशेनं निघालो आहोत. आज हजारो एमपीएससी उत्तीर्ण मुलं नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये असे अनेक जण आहेत ज्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास करुन मुलाखती देखील दिल्या आहेत. मात्र त्यांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. सध्या सोशल मीडियावर देखील 'मी तहसीलदार,मी बेरोजगार' असे बोर्ड घेऊन असणाऱ्या तरुणांचे फोटो व्हायरल होतं आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल सरकार घेणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही."

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : अधिवेशनात विरोधी पक्षाच्या 'उद्योगां'चाही भांडाफोड करा : सामना

Maharashtra Assembly Session 2021 LIVE : दोन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनात खडाजंगी रंगण्याची शक्यता आहे. विरोधक मंत्री आणि नेत्यांना घेरण्याची शक्यता असल्यानं सत्ताधारीही भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून असे संकेतही मिळाले आहेत. राज्य सरकारनं स्मार्ट सिटी घोटाळ्यात कारवाई करावी अशी मागणी करत सामनातून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला जातोय. 


"अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करुन महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही.", असं म्हणत सामना अग्रलेखातून विरोधकांवर तोफ डागण्यात आली आहे. तसेच भाजपचे उपरे पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. ईडीनं याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचं ठरवलं असेल, तर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागानं तत्काळ कारवाई करावी.", अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 : पीक विमा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानभवनासमोर घोषणाबाजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे व प्रशांत डीक्कर यांनी आज विधानभवनासमोर पीक विम्यासाठी आंदोलन केले. पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा अश्या घोषणा दिल्या. स्वाभिमानी संघटनेच्या शेतकरी आघाडीच्या नेत्या पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Maharashtra Assembly Session 2021 : पीक विमा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानभवनासमोर घोषणाबाजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे व प्रशांत डीक्कर यांनी आज विधानभवनासमोर पीक विम्यासाठी आंदोलन केले. पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा अश्या घोषणा दिल्या. स्वाभिमानी संघटनेच्या शेतकरी आघाडीच्या नेत्या पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Maharashtra Assembly Session 2021 : पीक विमा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानभवनासमोर घोषणाबाजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे व प्रशांत डीक्कर यांनी आज विधानभवनासमोर पीक विम्यासाठी आंदोलन केले. पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा अश्या घोषणा दिल्या. स्वाभिमानी संघटनेच्या शेतकरी आघाडीच्या नेत्या पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Maharashtra Assembly Session 2021 : पीक विमा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानभवनासमोर घोषणाबाजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे व प्रशांत डीक्कर यांनी आज विधानभवनासमोर पीक विम्यासाठी आंदोलन केले. पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा अश्या घोषणा दिल्या. स्वाभिमानी संघटनेच्या शेतकरी आघाडीच्या नेत्या पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Maharashtra Assembly Session 2021 : सकाळी दहा वाजता विधीमंडळात काँग्रेस पक्षाची बैठक 

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजता काँग्रेस पक्षाची विधीमंडळातील पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीस काँग्रेसचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थितीत राहणार आहेत.अधिवेशनात काँग्रेस आमदाराची भूमिका यावर बैठकीत चर्चा होईल. 

 Maharashtra Assembly Session 2021 LIVE : अधिवेशनात काँग्रेस आमदारांची भूमिका काय असणार?, यासाठी विधीमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक

 Maharashtra Assembly Session 2021 LIVE : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता विधीमंडळात काँग्रेस पक्षाची बैठक पार पडणार आहे. विधीमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थितीत राहणार आहेत. अधिवेशनात काँग्रेस आमदारांची भूमिका काय असणार यावर चर्चा होईल.

Maharashtra Assembly Session 2021 : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

Maharashtra Assembly Session 2021 : महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन आजपासून म्हणजेच, 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे.  राज्यात आता कोरोना दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र तरी देखील राज्यावरील संकट मात्र काही कमी झालेले नाही. आता तर राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण देखील आढळून आले असून, एका रुग्णांचा यामुळे मृत्यू देखील झाला. हा धोका ओळखून ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 : दोन दिवसीय अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी

Maharashtra Assembly Session 2021 : दोन दिवसाच्या या अधिवेशनात खालील विधेयकं आणि अध्यादेश ठेवण्यात येणार आहेत. अधिवेशनाचा अवधी कमी असल्याने यातील किती विधेयकांवर चर्चा होते आणि मंजूर होतात याकडे लक्ष असणार आहे. 


1. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या नसल्यामुळे बरेच सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)


2. इनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व रोख वसूल केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी आहे.  म्हणून, शासनास, अशा इनाम किंवा वतन जमिनीवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, अर्नजित उत्पन्नाची एकुण रक्कम आणि द्रव्यदंडाची रक्कम वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा इनाम किंवा वतन जमिनीच्या मूल्याच्या पंचवीस टक्के इतकी कमी करण्यासाठी तरतूद करण्याकरिता  महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) यासाठी (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (महसुल व वने विभाग)


3. महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत दिनांक 19.12.2020 रोजी संपुष्टात आल्याने आणि परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी व परिषदेची निवडणूक घेण्यासाठी प्रशासकाला पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, 1966 याच्या कलम 40 च्या पोट-कलम (३) मध्ये परंतुक जादा दाखल करणे. तसेच प्रशासकाने दि. 19.12.2020 पासून परिषदेच्या कामकाजाबाबत घेतलेले निर्णय, घटना व कृती यांना कायदेशीर संरक्षण देणेकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र परिचारीका (सुधारणा) विधेयक, 2021 (वैद्यकीय शिक्षण विभाग)


4. राज्यातील हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021  (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग)


5. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2021 (वित्त विभाग).
 
संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके- महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलामांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 हिवाळी अधिवेशन 2020 मध्ये आणण्यात आला.  (गृह विभाग)
 
विधानसभेत प्रलंबित विधेयक - शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक, 2020 आणण्यात आले. याअंतर्गत महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. (गृह विभाग).

Maharashtra Assembly Session 2021 : आज दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस, हे मुद्दे वादळी ठरण्याची शक्यता

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातील प्रमुख मुद्दे : 



  • विधानसभा अध्यक्षपदाची निवड

  • मंत्र्यांवरचे गंभीर आरोप

  • कोरोनाकाळातली परिस्थिती

  • मराठा, ओबीसी आरक्षण 

  • केंद्रातला राज्य सरकारवरचा दबाव 

  • राज्यपाल नियुक्त 12 नावं 

Maharashtra Monsoon Session : आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन

Maharashtra Monsoon Session : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज, 5 जुलै आणि उद्या, 6 जुलै अशा दोन दिवसांत हे अधिवेशन पार पडणार आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत. यंदा पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम झाला नाही, कोरोनामुळं हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळाली. मात्र परंपरा मोडीत काढत पूर्वसंध्येला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील झाली नाही. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने मात्र पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोपांची डोफ डागली आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Session 2021 : आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.  अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.  


'भाजप आमदारांनी मला शिव्या दिल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला!': भास्कर जाधव


शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष  भास्कर जाधव यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम भाजपा आमदारांनी केलं आहे.  जी घटना घडली ती मी सभागृहात सांगितली, फडणवीस यांना खोटं बोलण्याची सवय आहे. माझं म्हणणं आहे की आणखी आमदारांना निलंबित केलं पाहिजे, असं जाधव म्हणाले. पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की,  महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला, पंरपरेला आणि महाराष्ट्राच्या एक वैचारिक विचारसरणीला काळीमा फासण्याचं पाप भाजपाच्या आमदारांनी केलं. मी सभागृहाचं कामकाज संपवून सभागृह दहा मिनिटं स्थगित केलं. स्थगित केल्यानंतर विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्या दालनात बसतात आणि काही त्यातून मार्ग काढतात. या उद्देशाने कुणीही न सांगता दहा मिनिटांसाठी मी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं, कारण मला देखील इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मी नुसता अध्यक्षांच्या दालनात आलो, तर त्यावेळी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सगळे वरिष्ठ आमदार व नवनिर्वाचित आमदार हे सगळे माझ्या एकट्यावर तुटून पडले, असं जाधव म्हणाले. 


31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं, तसेच स्वप्निलच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहा या प्रकरणी मोठी घोषणा केली. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. 


राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.