एक्स्प्लोर

BEED ACCIDENT : बीडमध्ये भरधाव कारची धडक, तिघांचा मृत्यू, विजेचा खांबही पडला

BEED ACCIDENT :  कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बीडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले.

BEED ACCIDENT :  कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बीडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अपघाताची घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या जार जणांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

अंबाजोगाईहून नातेवाईकाचा अंत्यविधी उरकून कार चालक अलिम शेख आणी दीपक वैजनाथ राजारोशे अहंदपूरकडे कार  (एमएच 24 व्ही 2518 ) मध्ये बसून परत जात होते. त्यावेळी  कार चालवणाऱ्या अलिम शेख यांचा ताबा सुटला. नवाबवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस त्याने समोरुन जोराची धडक दिली. त्यानंतर घटनांदूर येथे मुख्य चौकात उभे असलेल्या चौघांना कारने जोराची धडक दिल्याने सौरभ सतीश गिरी(वय १९) लहू बबन काटुळे (वय ३०) हे दोघे जागीच ठार झाले. रमेश विठ्ठल फुलारी(वय ४५) यांना उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्याच त्याचा मृत्यू झाला .

या अपघातात कार चालक अलिम शेख(वय२५) दीपक वैजनाथ राजारोशे (वय ३५) (रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले आहे.  त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने  रस्त्यालगत असलेले लोखंडी खांब खाली पडला. लोखंडी खांब पडतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने घटनांदूर गावात शोकाकुल वातावरण झाले. त्यामुळे गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघातात मृत्यु झालेले लहू बबन काटूळे हे ऑटोरीक्षा चालक होते. त्यांच्या पश्चात आई,वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तर रमेश विठ्ठल फुलारी यांचा फुलाचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी,दोन मुलं असा परिवार आहे. त्यांच्या एकट्याच्या व्यवसायावरच कुटुंब चालायचं. या अपघातात मृत्यु झालेला सौरभ सतीश गिरी यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. एकाच गावातील सर्वसामान्य कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget