Ravikant Tupkar : सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. सध्या कापूस आणि सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं तातडीने केंद्र सरकारशी चर्चा करावी, पत्रव्यवहार करावा अशी मागणी तुपकरांनी केली आहे. या आधी राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळा अन्यता पुन्हा आंदोलन करु अशा इशारा देखील तुपकरांनी दिली आहे.


राज्य सरकारनं केंद्र सरकारशी चर्चा करावी


सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांची रविकांत तुपकरांनी  (Ravikant Tupkar) भेट घेतली. सोयाबीनचा जर साडेपाच हजाराच्या पुढे सरकायला तयार नाही. तर मागील दोन दिवसात कापसाच्या दरात प्रतिक्विंटल दीड हजार रुपयांची घसरण झाली असल्याचे तुपकर म्हणाले. त्यामुळं या प्रश्नी राज्य सरकारनं तातडीनं केंद्र सरकारशी चर्चा करावी अशी मागणी यावेळी तुपकरांनी केली. कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, सोयाबीनवरील पाच टक्के GST रद्द करावा अशा मागण्या तुपकरांनी केल्या आहेत.


शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना जाब विचारला पाहिजे


विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये अधिवेशन घेतले जाते. परंतू, विदर्भातल्या प्रश्नावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये कुठलीही ठोस चर्चा झाली नसल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. विशेषत: विदर्भामध्ये सोयाबीन, कापूस आणि तांदळाचा पट्टा येतो. या प्रश्नावर कुठेही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. जे लोकप्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातून निवडून येतात, त्या लोकप्रतिनीधी सुद्धा सभागृहात आवाज उठवत नसल्याचे तुपकर म्हणाले. नागपूरचे अधिवेशन म्हणजे मौज-मजा करण्यासाठी आणि पिकनिक म्हणून  लोकप्रतिनिधी आल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढी संदर्भामध्ये, पीक विम्याच्या प्रश्नावर ज्या लोकप्रतिनीधींनी भूमिका घेतली नाही त्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे असे तुपकर म्हणाले. जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही तोडगा काढला नाहीतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.


कापसाच्या दरात मोठी घसरण


सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी  चिंतेत आहेत. कारण सातत्यानं कापसाच्या दरात (Cotton Price) घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे दर हे नऊ हजार रुपयांवरुन 7 हजार 500 ते 7 हजार 800 रुपयांवर आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस बाजारात आणलेला नसतानाही गेल्या दहा दिवसात कापसाच्या दरात एवढी घसरण झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Cotton Procurement : खरेदी सुरु मात्र दराच काय? नंदूरबारमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात