एक्स्प्लोर

खंडेरायाची शपथ... मी कोणाला शिवी दिली नाही: महादेव जानकर

मुंबई: भगवानगडावर भाषण करताना कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्यांच्याविरोधात तीव्र निषेध करत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. तसंच जानकरांना बडतर्फ करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर जानकरांनी आज याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. 'खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही.' असं म्हणत जानकरांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. महादेव जानकर यांची प्रतिक्रिया:
  "खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो, पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुषित झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो."
- ना. महादेव जानकर, मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य

महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

  काय आहे संपूर्ण प्रकरण: जानकरांची अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका दसरा मेळाव्याला भगवानगडावर काल भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी, अजित पवार आणि धनंजय मुंडेवर आक्षेपार्ह टीका केली होती. “बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला. त्याविरोधात राज्यभर विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

‘बारामती’चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर

  जानकरांना बडतर्फ करा : मुंडे महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा, असा उल्लेख करत महादेव जानकरांनी विधानपरिषद, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार आहोत, असंही मुंडे म्हणाले. संबंधित बातम्या: अजित पवारांबाबतच्या विधानावर तीन दिवसांनी बोलेन : जानकर

‘बारामती’चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर

बारामती हॉस्टेलमध्ये घुसून पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न

जानकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादी-रासप कार्यकर्त्यांमध्ये घमासान

महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal Adivasi Andolan Pune Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो...; नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
खाऊन पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो...; नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget