Mahadev Jankar tested corona positive : दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत आहेत. अशातच राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी एका राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. महादेव जानकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
प्रचंड प्रवास व कार्यक्रम यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे कोरोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये राहणार आहे, याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तत्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. आता महादेव जानकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झालेले राजकीय नेते
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेमाजी मंत्री पंकजा मुंडेमंत्री एकनाथ शिंदेमहसूलमंत्री बाळासाहेब थोरातशिक्षण मंत्री वर्षा गायकवाडआदिवासी मंत्री के. सी. पाडवी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेमहिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूरखासदार सुप्रिया सुळेआमदार सागर मेघेआमदार राधाकृष्ण विखे पाटीलआमदार शेखर निकमआमदार गिरीश महाजनआमदार इंद्रनील नाईकआमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)आमदार माधुरी मिसाळमाजी मंत्री दिपक सावंतमाजी मंत्री हर्षवर्धन पाटीलआमदार रोहित पवारआमदार धीरज देशमुख
संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल राज्यात तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात काल 207 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: