Corona New Cases: देशात कोरोनाची (Corona) तिसरी लाट धडकली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 79 हजार 723 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 146 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात आतापर्यंत 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी 4 लाख 83 हजार 936 वर पोहोचली आहे. याबरोबरच 3 कोटी 45 लाख 172 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 


ओमायक्रॉन रूग्णांमध्ये वाढ
कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 4 हजार 33  ओमायक्रॉनच्या रूग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त रूग्ण राजस्थानमध्ये आढळले  आहेत. राजस्थानध्ये आतापर्यंत 1 हजार 216 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. राजस्थान नंतर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे  रूग्ण आढळले आहेत. 





दरम्यान, वाढत्या कोरोना  रूग्णांच्या पार्श्वभूमीवर देशभरात लशीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आजपासून बुस्टर डोस देण्सासही सुरूवात झाली आहे. देशभरात आतापर्यंत 151 कोटी लोकांचे लशीकरण झाले आहे. देशात रविवारी 13 लाख 52 हजार 717 जणांची कोरोना चाचणी केली. 


 केंद्रीय आरोग्य मंत्री घेणार बैठक
देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था आणि तात्पुरत्या रुग्णालयांची व्यवस्था याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या