१. राज्यात मध्यरात्रीपासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी, मुंबईत रात्रीच्या संचारबंदी वेळी अनेकांवर कारवाई
२. राज्यभरात अनेक बाजार समित्यांमध्ये धडकी भरवणारी गर्दी; नियमांनाही हरताळ, शासकीय यंत्रणाही गायब
Maharashtra Market croud : राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने राज्य सरकारनं नवी नियमावली लागू केली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने पसरतो आहे मात्र दुसरीकडे बाजार समित्यांमधील भाजी खरेदी करणाऱ्यांची गर्दी काही कमी व्हायला तयार नाही. राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये आज तुफान गर्दी पाहायला मिळाली. त्यात नागरिक कोरोना नियमांचं पालन करत नसल्याचंही अनेक ठिकाणी दिसून आलं.
३. आजपासून देशात बूस्टर डोसला सुरुवात होणार, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस मिळणार, विनानोंदणी लसीकरणासाठी जाण्याची मुभा
Booster Dose : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मा त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
४. मराठवाड्यासह विदर्भात पुढील दोन दिवस यलो अलर्ट, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता तर मुंबईत पारा घसरला
५. घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, जुलैमध्ये मुंबईतील ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी, २२ लाखांत मिळणार वन बीएचके फ्लॅट
६. 'सह्याद्री देवराई'ला सातारा पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारली, एबीपी माझाच्या बातमीची गृहराज्यमंत्र्यांकडून दखल, तोडगा काढण्याचं आश्वासन
७. राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद, एकाच दिवसात ओमायक्रॉन 207 नव्या रुग्णांची नोंद
८. मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव; अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी बाधित
९. परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ, अनुप डांगे प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग
१०. मुकेश अंबानींची न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता, पंचतारांकित मँडरिन हॉटेलची ७२८ कोटी रुपयांत खरेदी