एक्स्प्लोर

महाड दुर्घटना : बुडालेली दुसरी एसटी बस सापडली

महाड : महाड दुर्घटनेतील सावित्री नदीच्या पात्रात बुडालेली अपघातग्रस्त दुसरी एसटी बस अखेर सापडली आहे. तब्बल 11 दिवसांनी नौदलाच्या जवानांना बेपत्ता एसटीचा शोध लागला आहे. दुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर एसटी सापडली आहे.   नौदलाचे जवान पाणबुडीच्या सहाय्याने पहाटे पाच वाजल्यापासून शोध घेत होते. शोधकार्यादरम्यान, 500 मीटर अंतरावर एसटी असल्याची खात्री पटली. त्यामुळे आता ही एसटी बाहेर काढण्यासाठी वायर रोप आणि क्रेन मागवण्यात आल्या आहेत.   दोनच दिवसांपूर्वी राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली होती. क्रेनच्या सहाय्याने ही एसटी सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आली होती. आता या दुर्घटनेतील दुसरी जयगड-मुंबई ही एसटी शोधण्यात नौदलाला यश आलं आहे.   ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी  2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला. या पुरात 2 बस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले. यामधील 27 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं आहे.   या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.

महाड दुर्घटना : बुडालेली एसटी बस सापडली

  महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.   साधारणपणे 100 वर्षांपासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.   शोध आणि बचावकार्य दुर्घटना झाल्यानंतर शोध आणि बचावकार्य जोरात सुरु आहे. एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दल, रेल्वे आदी विविध पथकाचे जवान शोधकार्य करत आहेत.   संबंधित बातम्या

देवदूत… काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!

महाडचा ‘देवदूत’ बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?

LIVE : महाड पूल दुर्घटना : अंधुक प्रकाशामुळे बचावकार्य थांबलं

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री

महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget