Mahashivratri 2021 Live : भीमाशंकरमध्ये महाशिवरात्र संपन्न, कोरोनामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाविधी

Mahashivratri Puja Vidhi Shubh Muhurat LIVE Updates : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. आज देशासह राज्यभरात महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळं भक्तांची गर्दी मात्र नाही.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Mar 2021 08:30 AM
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्लेश्वरला महाशिवरात्री अत्यंत साधेपणानं साजरी

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मार्लेश्वरच्या ठिकाणी देखील महाशिवरात्र अत्यंत साधेपणानं साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाविकांनी देखील या ठिकाणी न येण्याचं आवाहन करण्यात आलं. शंभुमहादेवाच्या प्रसिद्ध अशा मार्लेश्वरच्या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे केवळ  शंकराची पूजाअर्चा करत आजची महाशिवरात्र साधेपणानं साजरी करण्यात आली.

भीमाशंकरमध्ये महाशिवरात्र संपन्न, कोरोनामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाविधी

बारा जोतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर येथे महाशिवरात्र संपन्न झाली. कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच व्यक्तींना उपस्थिती लावता आली. कोणताही खंड पडू न देता परंपरागत सर्व पूजा मात्र पार पडत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांच्या हस्ते दुग्धाभिषेक पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली, तर विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झगमगून गेलाय.

51 किलो चक्क्यापासून शंकराची पिंड

आज महाशिवरात्री. या निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध श्री लक्ष्मी बाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये 51 किलो चक्क्यापासून शंकराची पिंड तयार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने पिंड साकारण्याचे यंदाचे सहावे वर्ष आहे. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मंदिरं भाविकांसाठी बंद आहे. अनेक मंदिरांमध्ये भाविकांना ऑनलाईन दर्शनाची  सुविधा उपलब्ध करण्यात आहे.  

 बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे मंदिर आज बंद

 बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे मंदिर आज बंद ठेवण्यात आलंय. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट आहे. शिवभक्तांना मंदिराच्या बाहेरच दर्शन घेऊन परतावे लागतंय. महाशिवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानं दरवर्षी दिसणारी शिवभक्तांची गर्दी मात्र यंदा दिसत नाही. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठीची खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं मंदिर बंद ठेवण्यात आलंय. महाशिवरात्रीला देशभरातील शिवभक्त वेरूळला लाखोच्या संख्येने येत असतात. महाशिवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या गृहविभागाच्या सुचना आहेत. तसेच दरवर्षी होणारे कार्यक्रम यंदा होणार नाहीत.

इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना औंढ्यात महाशिवरात्री उत्सव

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव इतिहासात पहिल्यांदाच भक्तां विना होतोय औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव देशभरात परिचित आहे.दरवर्षी महाशिवरातत्री ला मंदिर परिसरामध्ये नागनाथाची रथामध्ये परिक्रमा करण्यात येते त्याला देशभरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर तहसीलदार कृष्णा कानगुले विस्वस्थ ऍड राजेश पतंगे या तिघांनीही सपत्नीक महापुजा याठिकाणी केली त्यानंतर परत मंदिर बंद करण्यात आले आहे.मंदिर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांनी बाराकॅट लावले आहेत.औंढा शहरातही सर्वत्र पोलिस मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ज्यामुळे दरवर्षी ज्या औंढ्यात आजच्या दिवशी पाय ठेवायला जागा नसते तिथं शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात शुकशुकाट

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील सुमारे 900 वर्ष प्राचीन असलेले शिव मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे .महाशिवरात्री निमित्त या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात .महाशिवरात्री निमित्त मंदीर परिसरात जत्रा भरते .यंदा राज्यात कोरोनाचे थैमान घातले असून महाशिवरात्री निमित्त होनारी गर्दी लक्षात येता यंदा मंदिर प्रशासनाने उत्सव रद्द केला असून यंदा महाशिवरात्री निमित्त भाविकांना प्रवेश बंदी केलीय .पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आज मंदिरात फक्त पोलीस दिसत असून ,मंदिर आवारात पूर्णपणे शुकशुकाट दिसत आहे.

235 वर्षात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

 


मंदिराच्या आतील गर्भगृहात सजावट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला, मंदिराच्या आतील गर्भगृहात सजावट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील वडणगे गावात मध्यरात्रीपासून प्रवेश बंदी

कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावात महाशिवरात्रीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा भरत असते... मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडणगे गावात मध्यरात्रीपासून प्रवेश बंदी घालण्यात आली आहे... गावात येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत...गावातीलच व्यक्तीला ओळखपत्र दाखवल्यास आत सोडले जाणार आहे... दरवर्षी हजारो भाविक महाशिवरात्रिनिमित्ताने वडणगेमध्ये येत असतात...यंदा मात्र बॅरिकेट्स लावून गावात प्रवेश बंदी घातली आहे.. पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावाच्या सीमेवर तैनात करण्यात आला आहे

साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथे रामेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

सातारा:  साताऱ्यातील क्षेत्रमाहुली येथे रामेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांना बंदी असली तरी घरबसल्या शंभू महादेवाचे दर्शन व्हावे यासाठी गावातीलच रामेश्वर मंदीर,क्षेत्रमाहुली ग्रामंपचायत, सरपंच गृप यांनी हा उपक्रम राबविला आहे. मंदिराला केलेली विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी आहेच शिवाय कृष्णा नदीत पडलेले प्रतिबिंब हे तर आणखीच आकर्षक दिसत आहे. हे मंदीर 1703 सालात बांधले असून अजूनही सुस्थितीत आहे.

परळीत वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेटिंग  

 


कोविड 19च्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळावी यासाठी महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ दर्शन बंद करण्यात आलेले आहे. मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने शिवभक्त, भाविक मंदिर पायऱ्यांचे दर्शन घेऊन समाधानी होते. मात्र पायरीचे दर्शनही बंद करण्यात आले आहे.वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. तसेच भाविकांना अर्धा किमी अलीकडेच रोखले जात आहे.

लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा रद्द

 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाची महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिराचे विश्वस्त आणि प्रशासनाने घेतला आहे. महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजाअर्चा मात्र करण्यात आली. शिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ 5 व्यक्तींच्या उपस्थितीत झाला.  सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल.त्यानंतर पाच लोकांच्या उपस्थितीतच माळी समाजाचा पुष्पाभिषेक संपन्न होईल.

 महाशिवरात्रीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला पांढरी शेवंती व बेलपत्राची आकर्षक सजावट 

विठुरायाने मस्तकी पिंडी धारण केली असल्याने विठ्ठल हा हरी-हर असा भेद नसलेला देव अशी शेकडो वर्षाची मान्यता आहे. यामुळेच आज महाशिवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणी  गाभाऱ्यासह मंदिराला पंढरपूर येथील भाविक अनंत नंदकुमार कटप यांनी शेवंती व बेलपत्राच्या साहाय्याने अतिशय कल्पकतेने सजविण्याची सेवा दिली आहे. महादेवाला पांढरे फुल आणि बेलपत्र प्रिय असते म्हणून शेवंती व बेलपत्राचा वापर या सजावटीत करताना बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमाही अत्यंत आकर्षकरित्या फुल सजावटीत वापरण्यात आल्या आहेत . एकादशी प्रमाणेच विठ्ठल मंदिरात महाशिवरात्रीलाही वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते . दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव देखील साजरा होतो मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे केवळ फुल सजावट करीत धार्मिक परंपरा साजऱ्या केल्या जाणार आहेत .

महाशिवरात्रीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील विविध मंदिरात भरणाऱ्या यात्रा रद्द 

दरवर्षी  महाशिवरात्रि निमित्य बुलडाणा जिल्ह्यातील विविध महादेवाच्या मंदिर परिसरात मोठ मोठ्या यात्रा भरतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या सर्व यात्रा जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशामुळं रद्द करण्यात आल्या आहेत. तसे मंदिर संस्थानच्या वतीने पत्रक काढून कळविण्यात आले आहे. त्यामुळे राजुर येथील रामेश्वर मंदिर, कोलवड येथील महादेव मंदिर, मेहेकर तालुक्यातील ओलांडेश्वर मंदिर येथील भरणाऱ्या यात्रा प्रथमच रद्द करण्यात आल्या आहेत.  

इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना औंढ्यात महाशिवरात्री उत्सव 

 


बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना होतोय. औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव देशभरात परिचित आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिर परिसरामध्ये नागनाथाची रथामध्ये परिक्रमा करण्यात येते. त्याला देशभरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर, तहसीलदार कृष्णा कानगुले,  ऍड राजेश पतंगे या तिघांनीही सपत्नीक महापुजा याठिकाणी केली, त्यानंतर परत मंदिर बंद करण्यात आले आहे.मंदिर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. औंढा शहरातही सर्वत्र पोलिस मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ज्यामुळे दरवर्षी ज्या औंढ्यात आजच्या दिवशी पाय ठेवायला जागा नसते तिथं शुकशुकाट पाहायला मिळत आहे.  

पार्श्वभूमी

Maha Shivaratri 2021 : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस.  माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते.  यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या वाईट प्रवृत्तींपासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.