मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात हा शिवसेना ठाकरे गटाकडून अक्षरश: चिरफाड करण्यात आली. जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांच्याकडून नाकारण्यात आली, तीच घटनादुरुस्ती, त्यामधील झालेले ठराव या महापत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले. यावेळी 2018 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. हा पुरावाच यावेळी सादर करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी नेतेपदी निवड होताच उद्धव ठाकरे यांचे पाय धरल्याचे दिसून येते.
महा पत्रकार परिषदेत यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून 2013 मध्ये झालेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमधील ठराव सुद्धा सादर करण्यात आले. यावेळी शिवसैनिक म्हणून राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीतील ठराव सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वाचून दाखवले.
काय होते 2013 मधील ठराव?
- शिवसेनाप्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते, म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेनाप्रमुखी संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख संज्ञा गोठवण्यात येत आहे
- शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल, शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत पाच वर्षासाठी असेल
- शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे
- आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत.
- शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील
- पक्ष घटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील. पक्ष घटनेच्या अकराव्या कलमानुसार पक्ष संदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रक्षप्रमुखांकडे असतील.
- शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या 31 असेल त्यापैकी 21 जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित दहा जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील.
- शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशातील कार्यरत असतील. युवासेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे. युवासेना व युवासेना प्रमुख यांचा पक्ष घटनेच्या बाराव्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या