एक्स्प्लोर
पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅल्यू अॅडेड टॅक्समध्ये (व्हॅट) प्रति लीटर दीड रुपयांनी वाढ केली आहे. सुमारे 600 कोटींचा अतिरिक्त महसूल या वाढीव व्हॅटमधून अपेक्षित असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'पीटीआय'ला सांगितले. राज्य सरकारने डिझेलवरील व्हॅटमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. कारण महाराष्ट्राने डिझेलवर व्हॅट वाढवला तर शेजारील राज्यांची विक्री वाढेल या भितीने डिझेलवर व्हॅटवाढ केली नाही. जूनमध्ये ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने पेट्रोलच्या दरात सुधारणा झाली होती. मात्र, आता व्हॅट वाढल्याने पेट्रोलच्या दरातही फरक पडणार आहे. पेट्रोलवरील व्हॅट वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्याच्या सीमेवरील भागातील किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होईल, असे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्रा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.
Before You Go
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















