मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आठवड्याभरातच राज्याच्या तिजोरीत 600 कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जो पैसा आजपर्यंत साठवून ठेवला होता तो पैसा हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्यानंतर बाहेर पडू लागला आहे.


थकलेले कर भरण्यासाठी लोक पालिकेच्या दारात उभे आहेत. त्यामुळे एकेकाळी खडखडाट असलेल्या पालिकेच्या तिजोऱ्या मालामाल झाल्या आहेत. शिवाय, सरकारी केंद्र, बँकांमध्ये हजार-पाचशेच्या नोटा घेतल्या जात असल्याने यामुळे राज्याची तिजोरी भरू लागली आहे.

नोटाबंदीचा निर्णय

 

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधातील लढाईला अधिक बळ मिळावं, यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. अनेकांनी पालिकेत जुन्या नोटांनी कर भरण्यासाठीही रांगा लावल्या.