मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पिझ्झा, बर्गर, नुडल्स, कोल्ड्रिंक्स, बिस्किट, केक असं जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. विक्री झाल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासन जबाबदार राहिल, असा निर्णय सरकारने जारी केला आहे.


सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता शाळांच्या उपहारगृहांमध्ये भाताचे विविध प्रकार, इडली, सांबर, वडा अशा प्रकारचे पदार्थ ठेवावे लागतील. विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि इतर आजारांचं प्रमाण वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

जंक फूड शाळांच्या उपहारगृहात आढळणार नाही, याची काळजी शाळा प्रशासनाला घ्यावी लागेल. शिवाय पोषक पदार्थांचं सेवन केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्याची जबाबदारीही शासनावर असेल.