मुंबई : मुंबईतील चर्चगेट येथील हुतात्मा चौकाच्या नावात बदल करण्यात आले आहे. ‘हुतात्मा चौक’ हे नाव बदलून आता ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) मुंबई महापालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी हुतात्मा चौकाच्या नावात बदल करण्याची सूचना महापालिका सभागृहात मांडली होती. दिलीप लांडे यांनी मांडलेली सूचना सभागृहात मंजूर झाली. त्यामुळे आता ‘हुतात्मा चौक’चं ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे नाव झाले आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदलणार आहे. नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. एलफिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ तर छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं नामकरण होणार आहे.