एक्स्प्लोर
पुणे-सोलापूर हायवेवर बसचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी आहेत.
हैदराबादवरुन मुंबईला येणाऱ्या लक्झरी बसला आज सकाळी पाच वाजता अपघात झाला. इंदापूरजवळील पायल धाबा परिसरात हा अपघात झाला आहे. एम्पायर ट्रॅव्हल्सची ही बस असून जखमींवर इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या लक्झरी बसचा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही, तसंच अपघातातील मृतांची ओळखही पटलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement