एक्स्प्लोर
नागपुरात एक कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण
आग्रेकर यांच्या दोन मित्रांवर पोलिसांना संशय आहे, जे कालपासून गायब आहेत.

नागपूर : खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. व्यापारी राहुल आग्रेकर (वय 34 वर्षे) यांचं एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं. आग्रेकर यांच्या दोन मित्रांवर पोलिसांना संशय आहे, जे कालपासून गायब आहेत. राहुल आग्रेकर काल सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास दारोडकर चौक परिसरातील त्यांच्या घरातून निघाले. एक ते दीड तासात परत येतो, असं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं. मात्र, ते दुपारपर्यंत परतले नाही. दुपारी राहुल यांच्याच फोनवरून आग्रेकर कुटुंबीयांना राहुलचं अपहरण केलं आहे, त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्या, अशी मागणी करणारा फोन आला. आग्रेकर कुटुंबीय घाबरले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र, संध्याकाळी त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशन गाठून राहुल बेपत्ता असून खंडणीसाठी फोन आल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हापासून पोलिसांच्या अनेक पथकांनी राहुल आग्रेकर यांच्या शोधासाठी खूप प्रयत्न केले. मात्र अद्यापपर्यंत यश आलेलं नाही. दरम्यान काल रात्रीपासून राहुल यांचा मोबाईल, ज्याच्यावरून अपहरणकर्ते संपर्क साधत होते. तो फोन बंद आहे. त्यामुळे आग्रेकर कुटुंबीयांची काळजी वाढली आहे. राहुल घरातून निघाल्यानंतर घरापासून काही अंतरावर एका बुलेरो जीपमध्ये बसून ते गेल्याचं परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना सांगितलं आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















