Dhule: अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना धुळे शहरातील मिल परिसरात काल (4 फेब्रुवारी) सायंकाळी घडलीय. याप्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य दोन जणांना अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.


निखिल पाटील असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. निखिल पाटील हा मयूर शार्दुल याचा खास मित्र होता. दोघांची मैत्री संपूर्ण परिसरात चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच मयूर शार्दुल याला कळले की, निखिल पाटील यांचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहे. याचाच डोक्यात राग ठेवून शार्दुलनं आणि त्याच्या दोन्ही भावांनी निखिल पाटील याला भेटण्यासाठी बोलावलं. त्यावेळेस मयूर शार्दुलनं आपल्या दोघा भावांसह निखिल याला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर निखिलच्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डाक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. 


याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयूर शार्दुलसह त्याच्या दोन भावांनाही पोलिसांनी अटक केलीय, अशी माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यानी दिलीय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha