एक्स्प्लोर

लोणावळा दुहेरी हत्याकांड : दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या

पुणे : लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या. लोणावळ्यातून रविवारी एका आरोपीला अटक केल्यानंतर, आज आग्र्यातून दुसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांची हत्येचा अखेर उलगडा झाला. अडीच महिन्यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची कबुली एका आरोपीने दिली. सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसंच तपासाला गती मिळत नसल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशाराही दिला होता. यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अखेर या तपासाला यश आलं आहे. आरोपीने चोरीच्या उद्देशानं ही हत्या केल्याचं दारुच्या नशेत कबूल केलं आहे. दरम्यान, या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीला 40 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पीएसआय गिजे आणि पोलिस कॉन्स्टेबल अमित ठोसर यांनी या हत्याकांडाचा छडा लावला. काय आहे प्रकरण? सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. ‘लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा’ तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती. हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते. मात्र सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे थेट मृतदेहच सापडले. विवस्त्र करुन तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या होत्या. दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या होत्या. लोणावळा हत्याकांडाचा घटनाक्रम 1 एप्रिल 2017 – श्रुती लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या हॉस्टेल मधून बाहेर पडली 2 एप्रिल 2017 – सायंकाळी श्रुती आणि सार्थक लोणावळ्यातील एम्बी व्हॅली रोडवर एका मित्राला दिसले 3 एप्रिल 2017 – दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरात आढळले 4 एप्रिल 2017 – महाविद्यालयातील आणि हॉस्टेलमधील दोघांच्या मित्रांची कसून चौकशी सुरु झाली. दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला. 1 मे 2017 – सार्थकचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि 20 दिवसात आरोपींना अटक करण्याची मुदत देत, रास्ता रोकोचा इशारा दिला 3 मे 2017 – एका महिना उलटून ही पोलिसांच्या हाती काही न लागल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला 6 मे 2017 – तपासासाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली 3 जून 2017 – दोन महिन्यानंतर हात रिकामे, रास्ता रोकोच्या भीतीने पोलिसांनी नातेवाईकांना आणखी मुदत वाढ घेतली 11 जून 2017 – एक आरोपी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. तर एक फरार झाल्याचं उघड. अटक आरोपी मूळचा लोणावळ्यातला असून दारूच्या नशेत त्याने काहींच्या समोर हत्या केल्याची कबुली दिली. खबऱ्यांकडून ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या एका कर्मचारीपर्यंत पोहचली. त्यानुसार 3-4 दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आली. 12 जून 2017 - दुसऱ्या आरोपीला आग्र्यातून अटक संबंधित बातम्या लोणावळ्यात तरुण-तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला महिन्याभरानंतरही लोणावळा दुहेरी हत्याकांडातील मारेकरी मोकाटच लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा, चोरीच्या उद्देशानं हत्या

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Nagpur Crime: नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget