Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर या निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंड होण्यास आता केवळ 36 तास उरले आहे. त्यामुळे उरलेल्या वेळात अधिका-अधिक जनसंपर्क साधण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ होतांनाचे चित्र आहे. तर त्याकरिता आता पक्षातील दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरत जाहीर सभांमधून अखेरचा 'मास्टर स्ट्रोक' मारणार आहेत. अशातच महायुतीच्या (Mahayuti) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पाठोपाठ राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सभेला मोठी मागणी असल्याची माहिती पुढे आली आहे.
आता पर्यंत फडणवीसांनी पूर्व विदर्भात 20 सभा घेतल्या असून आगामी काळात 125 सभांचे नियोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यभरात या सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारांना साद घालण्याची कुठलीही संधी सोडत नसल्याचेही बघायाल मिळत आहेत. तर दुसरीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोलचे कामही फडणवीस करत असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या सभेला महायुतीत सर्वाधिक पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसो पारचा नारा देत भाजप आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा हा संकल्प तडीस नेण्यास महायुतीमध्ये सर्व स्थरातील नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कमला लागल्याचा दावा करण्यात येतोय. अशातच भाजपचे स्टारप्रचारक आणि देशाचे पंतप्रधानांच्या खालोखाल देवेंद्र फडणवीसांना प्रचारार्थ सभेसाठी महायुतीत मोठी डिमांड असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक मतदारसंघात उपमुख्यमंत्र्यांची एकतरी सभा व्हावी, अशी गळ महायुतीतील उमेदवारांकडून घालण्यात येत आहे.
125 हून अधिक सभांचे नियोजन
एकीकडे पूर्वविदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 20 सभा घेतल्या आहेत. तर आगामी काळात 125 हून अधिक सभांचे नियोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विदर्भात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरात तळ ठोकणार आहेत. आगामी दिवसात नागपुच्या नरखेड, सावनेर येथे सभा घेऊन राम जन्मोत्सवाच्या दिवशी जिल्ह्यातील राम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये दिग्गज नेते 'फिनिशर'ची भूमिका वठवतांना बघायला मिळत आहे.
राज्यात शरद पवारांच्या सभांचाही धुरळा
दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या देखील सभांचा धुरळा सध्या राज्यात सुरू आहे. तर आगामी काळात शरद पवार हे 50 हून अधिक सभा घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 18 एप्रिल ते 11 मे पर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्वांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात सर्वाधिक सभा या माढा लोकसभा मतदारसंघात तर रावेर मध्ये 5, साताऱ्यात 5, बीडमध्ये 3, अहमदनगर मध्ये 5 तसेच उर्वरित ठिकाणी या सभा घेण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या