एक्स्प्लोर

Lockdown | लॉकडाऊनची जगात काय परिस्थिती? कोणता देश किती दिवसांपासून बंद

येत्या 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊनची मर्यादा संपत आहे. मात्र, हे लॉकडाऊन वाढण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची सुत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जगात लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात 21 दिवसांच लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. येत्या 14 एप्रिलला या लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात लॉकडाऊन संपणार की वाढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांसोबत एक बैठक घेतली. त्यात लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी चर्चा झाली. भारताप्रमाणेच जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. भारताच्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉकडाऊनची काय परिस्थिती पाहुया.

देशातील अनेक राज्यांनी आता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात अगोदर तेलंगाणा सरकारने लॉकडाऊन तीन महिने वाढवले आहे. तीन जूनपर्यंत तेलंगाणामध्ये लॉकडाऊन असणार आहे. तेलंगाणा पाठोपाठ आता महाराष्ट्रातही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका : 26 मार्चला 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर 9 एप्रिलला तो 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला.

न्युझीलँड : 25 मार्चपासून पूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे.

सौदी अरेबिया : 25 मार्चला राजधानी रियाध आणि दोन धार्मिक शहरं लॉकडाऊन केली. 29 मार्चला जेद्दाह लॉकडाऊ केलं. 6 एप्रिलपासून सगळ्या महत्त्वाच्या शहरात लॉकडाऊन आहे

कोलंबिया : 70 पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी राष्ट्रव्यापी क्वारंटाईन 24 मार्चला सुरु केलं.. आता त्यांना मे च्या अखेरच्या आठवड्यापर्यंत घरातून बाहेर पडू नका असं बजावलं आहे.

भारत - भारतात 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता जास्त आहे.

यु. के. : 23 मार्चपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अजूनही लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचार नाही.

ऑस्ट्रेलिया : 23 मार्चपासून अत्यावश्यक नसलेल्या सेवा पूर्ण देशात बंद आहेत.

चीन : जानेवारीच्या शेवटाला चीननं देशातील 16 महत्त्वाची शहरं लॉकडाऊन केली होती. त्यातलं वुहान तब्बल 76 दिवसानंतर आता सुरु झालं आहे.

जॉर्डन : 21 मार्चपासून जॉर्डनमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे. 25 मार्चपासून थोडी शिथिलता करण्यात आली आहे. पण लॉकडाऊन कायम आहे.

अर्जेंटिना : 21 मार्चपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. पण 29 मार्चला लॉकडाऊनचा कालावधी 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

इस्राईल : 19 मार्चपासून अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. परदेशी लोकांना एन्ट्री बंद करण्यात आली. 25 मार्चपासून पूर्ण लॉकडाऊन सुरु आहे.

बेल्जीयम : 17 मार्चपासून बेल्जियममध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. 22 मार्चला लॉकडाऊनचा कालावधी सरकारनं 19 एप्रिलपर्यंत वाढवला.

Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी : सूत्र

फ्रान्स : फ्रान्सनं 16 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. 27 मार्चला तो 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला. रॉयटर्सच्या बातमीनुसार आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढलाय.

स्पेन : 14 मार्चपासून स्पेननं देशात लॉकडाऊन जाहीर केला. आता त्यात 25 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

इटली : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीत 13 मार्चपासून लॉकडाऊन आहे. आतापर्यंत तिथं 19 हजार लोकांचा जीव गेलाय

कुवैत : 13 मार्चला कुवेतमध्ये दोन आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केला. 6 एप्रिलला त्यात वाढ करुन आता 26 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार.

आयर्लंड – 27 मार्चपासून आयर्लंडमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय लिओ वराडकर यांनी जाहीर केला.

लॉकडाऊन हटवण्याची घाई महागात पडेल, WHOचा इशारा

नोर्वे : नॉर्वेत 12 मार्चला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन होता. 24 मार्चला तो ईस्टरपर्यंत वाढवण्यात आला. 20 एप्रिलपासून थोडी शिथिलता देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

डेन्मार्क : डेन्मार्कनं 11 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर सरकारनं 13 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

जर्मनी : जर्मनीत मार्च महिन्यापासून 16 राज्यात लॉकडाऊन सुरु होता.. सरकारनं त्याचा कालावधी 19 एप्रिलपर्यंत वाढवला आहे.

मलेशिया : 16 मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सरकारनं 28 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला.

चेक प्रजासत्ताक : चेक रिपब्लिकनं मार्च 16 पासून लॉकडाऊन जाहीर केला होता. गेल्या मंगळवारपासून थोडी शिथिलता दिली आहे. काही व्यवसाय सुरु झालेत.

पोलंड : 13 मार्चपासून देशातील सगळे महत्त्वाचे उद्योग आणि परदेशी वाहतूक आणि अत्यावश्यक नसलेल्या सेवा बंद करण्यात आल्या. 19 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला.

Lockdown | पनवेलमध्ये लॉकडाऊन असूनही बर्थ डे पार्टी करणाऱ्या भाजप नगरसेवकावर गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget