एक्स्प्लोर
Lockdown 3 : सोलापूर शहरात दारुबंदी कायम; 17 मे पर्यंत ‘हे’ नवे नियम लागू
सोलापुर शहरात 17 मेपर्यंत बँका 8 ते 12 याच वेळेत सुरू राहणार आहेत. तर भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी सकाळी सात ते अकरा या वेळेतच करता येणार आहे.
सोलापूर : दिवसेंदिवस सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. सोलापुरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल दिवसभरात 14 जणांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 128 वर पोहोचली आहे, तर 193 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यापैकी 6 जणांचा आधीच मृत्यू झाला आहे. 19 जणांना डिस्चार्ज दिलं आहे. उर्वरित 103 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकंदरीतच सोलापुरात आकडा हा वाढतचं आहे. त्यामुळे सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरासाठी लॉकडाऊन 3 संपेपर्यंत काही कडक निर्णय घेतले आहे.
सोलापुर शहरात 17 मेपर्यंत बँका 8 ते 12 याच वेळेत सुरू राहणार आहेत. तर भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी सकाळी सात ते अकरा या वेळेतच करता येणार आहे. दरम्यान राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून रेड झोनमध्येही काही नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबई, पुण्यात देखील वाईन शॉप सुरू राहणार आहेत. मात्र, मॉल, हॉटेल, रेस्टोरेंट्स मध्ये दारू मिळणार नाही. पण सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारच्या दारु विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे याबबातचे आदेश दिले आहेत.
सोलापुर शहरात लॉकडाऊन 3 साठी नवे नियम
- सोलापूर शहरातील बँका उद्यापासून 8 ते 12 या वेळेत सुरू राहतील
- सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान दूध वाटप व दूध खरेदी
- जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे दुकाने सोडून सर्व प्रकारची दुकाने मॉल मनोरंजन केंद्रे सिनेमागृह हे सर्व बंद राहील.
- भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी सकाळी सात ते अकरा
- खते बी-बियाणे तसेच शेती विषयक सर्व खरेदी सकाळी सात ते अकरा या वेळेत
- सर्व प्रकारच्या दारूविक्रीस बंदी
- हात गाडीवरून भाजी विक्रीला बंदी
- शाळा महाविद्यालय बंद तसेच जिल्हांतर्गत आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी (परवानगी धारकांना सूट)
- किराणा दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहतील
- बेकरी पदार्थ विक्री तसेच अंडी मटण मांस विक्रीसाठी सकाळी सात ते अकराची वेळ
- घरगुती गॅसची होम डिलिव्हरी सकाळी सात ते बारा या वेळेत
- सलून दुकाने पूर्णपणे बंद राहतील
- प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी सात ते अकराची वेळ
- प्रतिबंधित क्षेत्रातील दवाखान्याची ओपीडी म्हणजेच बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार
- प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना सायंकाळी सात ते सकाळी सात घराबाहेर पडण्यास मनाई
- प्रतिबंधित क्षेत्रातील 65 वर्ष वयाच्या व्यक्तींना, गरोदर स्त्रियांना तसेच दहा वर्ष खालील मुलांना मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई
- सोलापूर शहरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रम सण-उत्सव मिरवणुका यांवर पूर्णपणे बंदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement