Live Updates Raj Thackeray:  राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार? खेडमधील सभेचे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स...

Raj Thackeray:  राज ठाकरे यांच्या खेडमधील सभेचे लाईव्ह अपडेट्स....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2023 08:36 PM

पार्श्वभूमी

Raj Thackeray:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये (Raj Thackeray in Khed) पार पडत आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी पक्ष बांधणी, विस्तारासाठी कोकण दौरा केला...More

Raj Thackeray Khed Rally: कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा

Raj Thackeray Khed Rally: इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय आपण असे राज ठाकरे म्हणाले.